दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने
आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो

बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
तुम्ही ती निर्माण करू शकत नाही, कारण नोकरी करून फार तर दहा वीस हजार कमावण ह्यापुढे तुमची मजल जाऊच शकणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे।

बाबा रामदेव यांचं कौतुक करायला जमत नसेल तर नका करू निदान त्यांचे पाय तरि नका ओढू। कारण सव्वाशे कोटींच्या देशात एकच माय का लाल निपजलाय ज्याने
कोलगेट, नेस्ले, प्रोक्टर अँड ग्याम्बल अशा अनेक दिग्गज मल्टी नॅशनल कंपन्यांची झोप उडवलीय।

अवघ्या 10 वर्षात 163 कोटींवरून 20 हजार कोटींवर आणि आता चक्क 23 हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या पतंजलीने जागतिक मंदीच्या काळात जी नेत्रदीपक कामगिरी केलीय ती पाहून बडे बडे उद्योगपतीही अवाक झालेत.
500 पेक्षा जास्त उत्पादनं असलेली पतंजली आता अवघ्या 12 देशात पोहोचलीय। 45 सौंदर्य प्रसाधनं आणि 30 खाद्य पदार्थ शिवाय 300 औषधी उत्पादनं करणारी पतंजली येत्या काळात जेव्हा चीनमध्ये आपलं बस्तान बसवेल तेव्हा करोडो देश- वासीयांसाठी ती अभिमानास्पद घटना असेल।

पतंजलीचा पसारा दिवसेंदिवस
वाढतच चाललाय। 5000 आउटलेटस आणि ऑनलाईन विक्रीमुळे एकट्या पतंजलीने 5 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळवून दिलाय। इतर किती असतील याची गणती नाही। रिलायन्स रिटेल, फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून विक्री वाढतेय। येत्या काळात रेल्वे स्टेशन्स आणि एअरपोर्टसवर विक्री केंद्रे असतील। देशातील करोडो
तरुणांची कपड्यांची आवड लक्षात घेऊन केवळ कुर्ता पायजमाच नव्हे तर जीन्सच्या उत्पादनाचीही तयारी सुरु आहे। *येत्या काळात पतंजली एक लाख कोटींचा व्यवसाय करेल याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही।* चला तर आपणही एखादी अशी कंपनी काढूया आणि मल्टी नॅशनल कंपनीना टक्कर देऊया। जमेल का हे कुणाला ?
नाहीच जमणार। त्यापेक्षा बाबा रामदेवच्या नावाने टिंगल करणं अधिक सोपं आहे,असं वाटतं ना...

विचार बदला,स्वत:ला पहिलं बदला.समाज व देश अपोआप बदलेले...!

आणि हो मूर्खाचा विरोध पतंजलीला नाहीये,भगवे वस्त्र नेसून व्यवसाय करणाऱ्या बाबाला आहे,कारण देशात अशी एक मानसिकता आहे की संन्यासी
लोकांनी फक्त मठ मंदिरे स्थापन करून गांजा ओढावा.

माझा सरळ एक प्रश्न आहे ,स्वतःला विचारा बाबाची पतंजली 50000 कोटी जरी कमावते तरी ते पैसे कुठे विदेशी बँकेत जात आहे? कोणता परिवार बायका मुले आई वडील आहे बाबाला जे त्यांच्या नावाने बॅलन्स टाकत आहे?

हा सगळा पैसा राष्ट्रसेवेत लावला जातो
गोशाळा,वृद्ध आश्रम,गुरुकुल, आचार्य कुलम,आयुर्वेदिक रिसर्च सेंटर,योगा प्रचार प्रसार,शिबिरे अशा एक ना अनेक हजारो राष्ट्रीय सेवेत हा पैसा लागू होत आहे

लोग अपने दुःख से उतने परेशान नहीं है जितने की वो दुसरे के सुख से परेशान है.
देश भक्ति करो, देश के लिए जीना सीखो, राष्ट्र धर्म ही सबसे उच्च धर्म है ये याद रखो.

#WA
लेखक अनामिक.
पण विचार करावा असं...
You can follow @jayant_rokade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: