'आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत दाभोळकरांचे नकोत' अशा आशयाचे ट्विट भाजपाचे अधिकृत पदाधिकारी अवधूत वाघ यांनी केले आहे. आता ह्या पक्षाचा पॅटर्न सांगतो तुम्हाला. समाज जेवढा जाती धर्मात दुभंगलेला असेल तेवढा भाजपला राजकीय फायदा जास्त होतो. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि बहुजनांच्या (१)
सुदैवाने गांधी, आंबेडकर, नेहरू अशा असंख्य विचारी नेत्यांमुळे भारताचे संविधान अजूनतरी ह्यांच्या डोक्यावर आहे. संविधानाची चौकट उघडपणे मोडणे अजूनतरी संघ किंवा भाजपला शक्य नाही. मग असे आश्रित आणि उपकृत लोक शोधायचे की ज्यांना फुटकळ पदं दिल्यावर ते समाजात त्यांच्या पक्षाचे धार्मिक,(२)
जातीयवादी, सांस्कृतिक अतिरेकी असे विषारी विचार समाजात पेरत राहतात. बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढा शिकलेला माणूस असं अतार्किक कसं काय बोलू शकतो? अवधूत वाघ ह्यांचा bio तुम्ही चेक केला तर तुम्हाला समजेल की VJTI, JBIMS अशा नामांकित संस्थामध्ये ते शिकलेत, मग तरीही असे(३)
गैरजबाबदार विधान कसे काय ? तर त्याचे उत्तर आहे की अशा गोष्टी ठरवून , समजून , उमजून केलेल्या असतात. कशा ? तर गम्मत अशी आहे की, बऱ्यापैकी लौकिक यश मिळालेली एखादी व्यक्ती शोधायची आणि तिला एखादं छोटमोठं नाममात्र पद, लाभ देऊन राजमान्यता द्यायची. सामान्य लोकांनाही वाटतं की हा माणूस (४)
एवढं शिकलाय/यशस्वी आहे इ. म्हणजे काहीतरी sense असलेलंच बोलेल, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आधीच्या लौकिक यशाने एक approval मिळतंच थोडं का होईना . ह्या लोकांना पक्षाने दिलेलं छोटं मोठं पद हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करते. भारतीय मुस्लिम समाजाबद्दल किंवा (५)
दलित समाजाबद्दल, अगदी सर्व धर्मीय-जातीय स्त्रियांबद्दलही हे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते हिंसक, भेदभावाचे विचार प्रकट करतात."ए मौलाना पाकिस्तान जा" म्हणणारा संबित पात्रा बघा, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नसताना त्यांची भाषणं पहा किंवा गिरीराज सिंगची भाषणं बघा, (६)
दुसऱ्या फळीत असताना अतिरेकी बोलणारे नेते पहिल्या फळीत प्रमोशन झाल्यावर शक्यतो संवैधानिक भाषा बोलताना दिसतात कारण आहे संविधानाची अपरिहार्यता. अशा Tier II लोकांचं विधान जरी पक्षाच्या अंगलट येतंय असं दिसलं तर ह्या छोट्या मोठ्या प्याद्यांना लगेच बाजूला करणे शक्य असते.(८)
'ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही' असं म्हटलं की विषय लगेच संपतो. आणि ह्या लोकांचा on ground politics मधे काहीच उपयोग नसतो त्यामुळे पक्षाचं अगदी काहीच नुकसान होत नाही असं म्हटलं तरी चालेल. शिवाय एखाद्या जातीधर्माबद्दल, स्त्रीच्या आधुनिकतेवर द्वेष असणाऱ्या सामान्य माणसाला आतून (९)
अशा विधानांनी आनंदच होतो. निवडणूक जिंकायला हे असं दुटप्पी धोरण बरं असतं. मुख्य नेत्याच्या प्रतिमेला अशा विधानांनी कोणताच धक्का पोहोचत नाही. Cow lynching होतंय म्हणून ह्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कठोर भूमिका कधीच घेतली गेली नाही. खोटी विधाने अशा छोट्या पदाधिकाऱ्यांकडून (१०)
सर्रास पसरविली जातात. खोटं पडतंय असं दिसलं की नामानिराळे व्हायचे मात्र हे सगळं होइपर्यंत सामान्य लोकांनी अशा गोष्टींवर आधीच विश्वास ठेवलेला असतो. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी जी लोकं काम करतात त्यांचेच चारित्र्यहनन अशाच लोकांमार्फत केले जाते (११)
आणि हा हजारो वर्षांचा उपक्रम आहे बरं का. ह्यातून ना पुरोगामी ब्राह्मण वाचले (संत ज्ञानेश्वर, डॉ. दाभोळकर, आगरकर), ना क्षत्रिय वाचले (छ. शाहू महाराज, छ. शिवाजी महाराज), ना दलित वाचले (डॉ. आंबेडकर), ना वैश्य वाचले (गांधी), ना स्त्रिया वाचल्या(गौरी लंकेश). मग ही काय भानगड आहे ?(१२)
तर तुम्ही जातीने कुणीही असा ज्या क्षणी तुम्ही पुरोगामी बनता, समतेचा प्रसार करायला लागता, लोकांना तुमचा विचार पटायला लागतो त्याक्षणी समाजातली एक अदृश्य शक्ती तुमच्या मागे हात धुवून लागते. (१३)
जात आणि धर्माचे अंतिम ध्येय हे संस्कृतीच्या नावाखाली समाजाच्या सर्वच आर्थिक साधनांवर ताबा ठेवणे आणि बहुजनांचे शोषण करणे हेच असते बाकी संस्कृती, वंशशुद्धी, घरवापसी, जातीचे पावित्र्य वगैरे हे आपल्यासारख्या खुळ्यांसाठी केलेली खेळणी आहेत. (१४)
जर तुम्हाला थांबवायचे असेल तर पहिल्यांदा तुमचे चारित्र्यहनन होते, खोट्या बातम्या पसरवल्या जातात. Fake news हजारो वर्षांपासून भारतात आहे btw. तुम्ही परंपरेच्या चौकटीत राहून समता आणू लागला की तर मग तुमच्या जीवाला धोका आहे असे समजा. Fake news ची काही उदाहरणे खालीलप्रमाणे : (१५)
उदा. महात्मा फुले ख्रिस्ती धर्म प्रचारक होते, ज्या फुलेंना मूलबाळ नव्हतं म्हणून ब्राह्मण विधवेच्या मुलाला ज्यांनी दत्तक घेतलं त्यालाही मूलबाळ नव्हतं; मात्र तरीही फुलेंचे वंशज म्हणे संघात जात होते, गांधीजींच्या लैंगिक आयुष्यावरही ह्यांनी अपप्रचार केला, छ. संभाजीराजे (१६)
ह्यांच्याबद्दलही जातीयवादी लोकांनी अपप्रचार केला, जेम्स लेन प्रकरण तर त्याची साक्षच आहे, संत तुकारामांच्या बाबतीतही हेच केलं गेलं, दाभोळकर आपल्या डोळ्यासमोर गेले.
सांगायचा मुद्दा हाच की बहुजन समाजाला हा खोटा अपप्रचार ओळखता आला पाहिजे. (१७)
खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी तुम्हाला काही किमान गोष्टी माहिती पाहिजेत. प्रपंच-व्यवहार सांभाळत तुम्हाला सामाजिक बांधिलकी आणि पुढच्या पिढीसाठी त्यांच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत म्हणून किमान गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत. (१८)
हा खऱ्या इतिहासाचा विचार लहान थोर, अडाणी सुशिक्षित, स्त्री पुरुष सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे , आपण तो विचार तळागाळात घेऊन गेलं पाहिजे. ही छोटी अपेक्षा मित्रांनो..!
(१९)
ज्यांनी छ. शिवरायांना शूद्र आहेत म्हणून राज्याभिषेक नाकारला त्याच जातीयवादी लोकांच्या वैचारिक वंशजांनी आज छत्रपतींच्या नावाखाली असंख्य संघटना उभ्या करून बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत; भीतीच्या माध्यमातून सामान्यांच्या श्रद्धेला विकृत केले. (२०)
आंबेडकरांना संस्कृत शिकायला परवानगी नव्हती, ज्ञानेश्वराला वाळीत टाकलं गेलं, अस्पृश्यता निवारण कायदा आणतायत म्हणल्यावर गांधीवर बॉम्ब हल्ला केला , तुम्हाला गांधींवर ७ वेळा जीवघेणा हल्ला झालाय हे सांगितलं गेलं नाही. (२१)
फाळणी केली म्हणून मारलं असा काहीतरी थातुरमातुर इतिहास सांगितला गेलाय आपल्याला, छ. संभाजी महाराज आदर्श पुरुष होते हे कधीच सांगितलं नाही, छ. शिवरायांनी कधीच धार्मिक राजकरण केलं नाही उलट समता, न्याय, प्रामाणिकपणा ह्या गोष्टींच्या आधारावर जीवाला जीव देणारी (२२)
सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्र केली आणि स्वराज्य स्थापन केलं.
तुमच्यासाठी ज्यांनी एवढ्या खस्ता खाल्या , जीव दिले त्यांचा खरा विचार , खरा इतिहास समजून घ्या. लोकशाहीला बळकट करा.

- चंद्रशेखर जगदाळे

समाप्त
You can follow @C_D_Jagadale.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: