#Bollywood चा घाणेरडा प्रताप

निषेध !! निषेध !! निषेध !!
#बॉलिवूड चा त्रिवार निषेध !!!

आत्तापर्यंत आपण भारतीय सिनेमा मध्ये बरेच असे प्रकार पहिले असतील जिथे ते हिंदूंना बदनाम करायची एकही संधी सोडत नाहीत. जसे की अमिताभ देवाशी बोलताना "जा मी तुला नाही मानत" असे म्हणतो पण

+
दंडाला 786 चा बिल्ला लावून फिरत असतो....

PK नावाच्या पिक्चर मध्ये अमीर खान हिंदूंना कसे ज्ञान देतो की मंदिरात पिंडीवर दूध टाकण्या पेक्षा गरिबांना द्या...

OTT वर आश्रम नावाच्या series मध्ये बॉबी देओल
"गुरुजी" कसे वासना पीडित असतात वगैरे वगैरे..

हिंदू धर्माला बदनाम करायला

+
तर हे बॉलिवूड वाले अग्रेसरच असतात असे माझे स्पष्ट मत आहे आणि आता त्यात आणखी एक भर टाकली आहे ती म्हणजे "मुंबई सागा" नावाच्या सिनेमाने.

हा सिनेमा म्हणे सत्य घटनेवर आधारित आहे. ह्यात 'भाऊ' नावाची व्यक्ती जी मुंबई वर राज्य करत असते.

"कपाळावर टिळा आणि गळ्यात माळा" घालून

+
मराठी भाषा, मराठी माणूस असे बोलणारा मुंबईचा राजा म्हणजे "भाऊ".(महेश मांजरेकर)

भाऊ ची माणसे पोलिसांमध्ये पण असतात आणि गुंड सुध्धा असतात...असे मी नाही सिनेमा सांगतो.

ह्यात , सुरुवातीला एकदम साधा माणूस असून नंतर परिस्थितीमुळे गुंड होणारा अमर्त्य राव (जॉन अब्राहम) आहे
+
आणि नावाचा कर्तबगार पोलीस म्हणजे सावरकर (इम्रान हाश्मी) पण आहे.

घाबरु नका , मी काही सगळा पिक्चर सांगणार नाही पण , एकदम थोडक्यात...

दोघे एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात कारण, "भाऊ".
आपलाच माणूस असून त्याचे वर्चस्व कमी करायचे म्हणून पोलीस इम्रान हाश्मी उर्फ सावरकर ला भाऊ

+
भाऊ सांगतात की त्या साध्या दिसणाऱ्या John ला संपव. कार्यकर्ते लागले लगेच कामाला.

आता मला पुढे जे सांगायचे आहे ते खूप महत्वाचे आहे.

सिनेमात ठीक १ तास ४५ मिनिटे आणि काही सेकंद नंतर जोशी नावाचा पोलीस (मिलिंद अधिकारी) , अमर्त्य(जॉन अब्राहम) आणि

+
नारी खान (गुलशन ग्रोवर) हे बोलत असतात. त्यात जोशी पोलिस सांगतो की तो आणि "सावरकर"(इम्रान हाश्मी) लहानपणापासून भाऊ च्या पार्टी मध्ये काम करत होते. ते दोघे त्या पार्टीत शाखा प्रमुख होते...आणि मग तो जोशी पोलीस , अमर्त्य ला काही फोटो देतो.

ते सगळे फोटो त्यांचेच म्हणजे भाऊच्या

+
पार्टी कार्यकर्त्यांचे असे सांगून तो ते देतो...
तर ते फोटो चक्क चक्क "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचे गणवेशातील फोटो असतात ते सुध्धा हातात दंड आणि प्रणाम करताना.
तुम्हीच पहा.
इथे मी story थांबवतो....पण,मला ह्या बॉलिवूड दिग्दर्शकाला (संजय गुप्ता) ला, हा प्रश्न +
विचारायचा आहे की संघ स्वयंसेवकांचे फोटो त्यांनी कोणाला विचारून वापरले आहेत ? त्यांना हे करण्याचा हक्क कोणी दिला?

झोपलेल्या वाघाला उठवू नका असे सांगणारा आणि मुंबई वर राज्य करणारा "राष्ट्रसेना पार्टी" चा भाऊ , त्यांचे पोलीस आणि गुंड दोघांशि असलेले संबंध आणि त्याच्या +
पार्टी मधील कार्यकर्ते इथपर्यंत सर्व ठीक होतं...पण , राष्ट्रसेना पार्टीचा कार्यकर्ता हा संघाचा गणवेश कधी पासून घालायला लागला?
संघ स्वयंसेवकांचे फोटो दाखवणे हे किती उचित आहे ?

आणि ,ही जर सत्य घटना असेल तर तुम्ही सगळेच सत्य का नाही दाखवत ? भाऊ आणि त्याची राष्ट्रसेना पार्टी +
म्हणजे आत्ताची कुठली पार्टी हे सिनेमा पाहणाऱ्याला नक्की कळते. मग दिग्दर्शकाने बेधडक त्यांचीच खरी नावं का नाही घेतली ? संघाचे स्वयंसेवक तेव्हढे खरे आणि बाकी सगळे खोटे असे का ?

सिनेमा पाहणाऱ्या नागरिकांनी सुध्दा ह्या गोष्टीचा विचार करावा असे मला वाटते.

जय हिंद
जय महाराष्ट्र 🙏
You can follow @paramvaibhav.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: