कोणी ‘राजकारण करू नका’ असं म्हणत असेल, तर त्याचा अर्थ सरकारला प्रश्नच विचारू नका, त्यांच्या कोणत्याही चुकीबाबत त्यांना जाब विचारू नका असा होतो, हे नीटच लक्षात घ्यायला हवं. अनेकांना त्यातली ही गोम समजत नाही. याचं कारण त्यांच्या मनातली राजकारणाची प्रतिमा. ती आता बदलली पाहिजे... 1/4
सत्तालालसेपायी जे चालतं त्याला राजकारण म्हणणं चूकच. ते निव्वळ सत्ताकारण. त्यात गल्लत करता कामा नये. आपण हे समजून घ्यायला हवं, की काळ संकटाचा, आपत्तीचा असो की सर्वसाधारण, प्रश्न विचारलेच पाहिजेत. राजकारण केलंच पाहिजे. समर्थांच्या शब्दांत सांगायचं, तर ‘राजकारण बहुत करावें’! 2/4
लोकांना हल्ली ‘पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह’ हवं असतं सारं. सरकारचं चांगल्या कामासाठी कौतुक जरूर करावं. त्याला ‘पॉझिटिव्ह’ वगैरे म्हणावं, हे ठीक. त्यासाठी खुद्द सरकार, त्यांच्या जनसंपर्क यंत्रणा आणि जल्पकांचे जत्थे राबतच असतात. तेही विरोधी पक्षांनीच करावं असं म्हणणं हे जरा अतिच झालं. 3/4
हे प्रोपगंडातंत्र आहे. विरोधक सतत राजकारण करतात असं सांगायचं. राजकारण व सत्तालालसा, समाजात भेद निर्माण करणारी कारस्थानं वगैरेंचं समीकरण जुळलेलं असतं लोकमानसात. त्याबद्दल घृणा असते त्यांना. ती घृणा विरोधकांच्या दिशेने वळवायची. यातून त्यांचा प्रश्नाचा अधिकारच धोक्यात येतो. 4/4