महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.

काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇

◆ सर्वात+
पहिल्यांदा दि. 2 जानेवारी 2021 रोजीच्या अगोदर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी यांनी एक ट्विट करून सांगितलं की, आपण लस मोफत देणार आहोत, (त्यावेळी फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू झाले होते)
◆ मग त्याच ट्विटचा दाखला देत 2 जानेवारी2021 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश+
टोपे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्टेटमेंट दिलं की राज्यातील गरिबांसाठीही कोरोनाची लस मोफत द्या.
( लिंक - )

◆ दि. 7 जानेवारी 2021 रोजी गरीब व मध्यमवर्गीयांना मोफत लस देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार द्यावा अशी देवेंद्रजी फडणवीस यांनी मागणी केली.+
(लिंक - )

◆ केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या टप्प्यात वय वर्षे 60 च्या जास्त व 45 वर्षाच्या जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांना मोफत लस देणार अशी घोषणा केली. हे लसीकरण 1 मार्च 2021+
पासून सुरू झाले.
( लिंक - )

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या एका व्हिडीओ च्या माध्यमातून दि. 7 मार्च 2021 रोजी सरकारी दवाखान्यातून मोफत लसीकरण सुरू असल्याची माहिती दिली.
( लिंक - )

◆ त्यानंतर दि. 24 एप्रिल 2021 रोजी+
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी यांनी माहिती दिली की, आम्ही सिरम कंपनीकडून लस खरेदी करून राज्याला मोफत देऊ.
( लिंक - )

◆ दि. 25 एप्रिल 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या मन की बात मध्येही मोफत लसीकरणासंदर्भात माहिती दिली.+
( लिंक - )

वरच्या एकूण सर्व स्टेटमेंटवरून असं स्पष्ट होतं की, केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देणार आहेच, तशी घोषणाही केली आहे. मात्र राज्यांना वाटले तर राज्यही खरेदी करू शकते याची मुभा दिली आहे, मात्र इथे उद्धव ठाकरे सरकारने केंद्र+
आपल्याला काहीच देत नाही, आपणच मोफत लस देणार आहोत अशाप्रकारची एकंदरीत बातमी पेरून पुन्हा वाईट राजकारण सुरू केलं आहे. यावरून महा वसुली आघाडीच्या अंतर्गतही अनेक घडामोडी घडत आहेत, काही मंत्र्यांचे स्टेटमेंट आणि ट्विट हे विरोधाभास निर्माण झाल्याचे दाखले देत आहेत, आता काही+
बोलघेवड्यांनी ते डिलीटही केले आहेत.😆
पण केंद्र सरकारने फार पूर्वीच जाहीर करूनही राज्य सरकार पुन्हा पुन्हा मोफत लस आम्ही देत आहोत अशी टिमकी का वाजवत आहे? आज राज्याला ऑक्सिजन पाहिजे तर केंद्र ऑक्सिजन एक्स्प्रेस पाठवत आहे, व्हेंटिलेटर लागले तर केंद्र सरकार व भाजपा नेते व्हेंटिलेटर+
मिळवून देत आहेत, रेमडीसेवीर लागले तर केंद्र मोठ्या प्रमाणात रेमडीसेवीर पाठवून देत आहे. आता ऑक्सिजन प्लांटही उभारण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहेच. हे इतकं सगळं केंद्र करत असताना मात्र उद्धव ठाकरेंनी या काळात नेमकं काय केलं याची माहिती अजूनपर्यंत तरी मिळू शकली+
नाही, असेल तर ती पुराव्यासह द्यावी, की हे उद्धवजींचे धोरणात्मक काम आहे. पण राज्य सरकार रोज उठून तीन टाइम मोदीजींच्या व केंद्र सरकारच्या नावाने विधवा विलाप करत राहिले तरीही त्याने केंद्राला व मोदीजींना काही फरक पडत नाही, उलट त्यांचे काम हे शुभ्र आहे, सामान्य माणसांना कामाचा माणूस+
ओळखू येतोच. मोदीजींवर दृढ विश्वास आहेच.
पण प्रश्न हा उरतो की, जर राज्य सरकारला या काळात राजकारण करायचे वावडे आहे तर, केंद्र देत असलेल्या मोफत लसीची माहिती न देता राज्य सरकार मोफत लस देत आहे अशी टिमकी का वाजवत आहेत? क्रेडिट घेण्यासाठी एवढा आटापिटा का करत आहे? आता त्यावर भाजपाच्या+
नेत्यांनी पूरव्यासह ठासली तर पुन्हा राजकारण करता म्हणून ठो ठो करायला मोकळे....!😷

- विकास विठोबा वाघमारे
You can follow @WaghamareVikas.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: