#शेक्सपिअरचा_आजा
मराठी ट्विटर वरील इंग्लिश मध्ये पारंगत, निष्णात, खतरनाक शेक्सपिअरच्या आज्याची आत्मकथा, त्यांनी सांगितली तशी शेम टू शेम सादर

आम्ही लहान असताना आमच्या इंग्लिश च्या मास्तरांनी 'bock board ' वर एक शब्द लिहिला
"Nature" आणि आम्हाला वाचायला सांगितला
आम्ही उत्साहाने, छाती फुगवत वाचले "नाटूरे"
आमचे मास्तर रागावले आणि बोलले, उद्या वडिलांना घेऊन शाळेत ये नाहीतर उद्यापासून यायचं नाही

आम्ही दुसऱ्या दिवशी पप्पांना घेवून शाळेत गेलो, तर मास्तर संतापून बोलले , तुमच्या मुलाचं "फुटूरे" खूपच खराब आहे, त्याला साधे साधे
इंग्रजी शब्द उच्चारता येत नाहीत
तर असे "gret" शिक्षक आम्हास भेटल्याने आमची इंग्लिश सुद्धा "महा gret" झाली

ट्विटर वर आल्यावर तर त्याला बहर आला, आम्ही लोकांची "saykoloji" अगदी " karekkt" ओळखून "thred" लिहायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता "fallowars" वाढायला लागले
आम्ही "how to incrij fallowars" आणि "dikshnaris" वाचून आमची इंग्लिश "impruv" केली
पण काही "kanning" लोकांमुळे आम्हाला त्याची "prize" मोजावी लागली

पण आमच्या "fallowars" नी मात्र आमचे "talant" ओळखून आम्हाला योग्य "price" दिली

आता आम्ही "dobal" "enthujiastik" होऊन लिखाण करतो
टीप- वरील वृत्तांत spelling सह त्यांनी सांगितला तसाच लिहिला आहे
#तिरकस
"इंग्रजांच्या आणि इंग्रजीच्याही" भावना दुखाविण्याचा हेतू नाही
You can follow @nanachi_tang202.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: