पँथरच्या प्रेमाचा प्रोटेस्ट सांगणारा 'मसान'

मसान माझ्याही आवडता सिनेमा. लय वेळा बघितलाय आणि बघतच राहीन. कारण जेव्हा जेव्हा ह्या सिनेमाला पाहतो तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन मिळत राहतं. काल परत एकदा पाहायला घेतला आणि ही फ्रेम मिळाली. दोन तीन सेकंदांसाठी ही फ्रेम स्क्रीनवर राहते
ज्यात फोरग्राउंडवर शालू आणि दीपक आहेत तर बॅकग्राउंडवर पिवळ्या भिंतीवर 'पँथर' हा शब्द दिसतोय. यावरून नीरज घैवान त्याच्या चित्रपटातील Semiotics (प्रतीकं) वर किती सूक्ष्म काम करतो हे लक्षात येतं. प्रतीकांचा वापर त्यांची 'भाशा' (ष षटकोनाचा पोर्टलछाप समीक्षक वापरतात) हा चित्रपटाच्या
सौन्दर्यशास्त्रामधला तसा महत्वाचा भाग. ही चित्रपटातील प्रतीकं, चिन्ह न बोलता लय काय काय सांगून जातात.
आंबेडकरी चित्रपटांनी त्यांचं Culture, Assertion, Protest, War cry दाखवण्यासाठी ज्या प्रकारे चिन्हांचा वापर केलाय तो वापर स्वतःच्या बामणी सिनेमाला 'भारतीय सिनेमा' म्हणवणाऱ्या आणि
बॉम्बे सिनेमाला 'बॉलीवूड' म्हणणाऱ्या लोकांनी केला आहे का ? ( हे प्रश्नचिन्ह ष ची भाशा शिकवनाऱ्या पोर्टलछाप समीक्षकांसाठी विचारलेला प्रश्न आहे.)
नागराजचा सैराट, फँड्री, मारी सेल्वराजचा परियरम पेरूमल, पा रंजीथचा काला, मद्रास आणि अजून बऱ्याच अशा चित्रपटांनी वापरलेले रंग, झेंडे,
भिंती, पोश्टर, कपडे, कलाकारांची, जागांची नावं हे चित्रपटकलेच्या क्षेत्रातील बामणी चिन्हव्यस्थेला लावलेला सुरुंगय भाऊ. सोप्प काम नाय. तुमच्या ब्राह्मणी सौन्दर्यशास्त्राच्या चिन्हशास्त्राला डायरेक ओपन चॅलेंज केलंय आंबेडकरी सौन्दर्यशास्त्राने.

Prashant Usha | @PantherTalks
You can follow @ApurvKurudgikar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: