जिथे आपले रुग्ण ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रेम्डीशिवर इंजेक्शन मिळवण्यासाठी आता गोंधळून घाबरून जाण्याची गरज नाही.

इंजेक्शन मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :
१. आपल्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन झालाय (आता कुठं तो कार्यान्वित झाला ती गोष्ट वेगळी)

२. जिल्हाधिकारी कक्षातून सगळ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलला Annexure A & B असे फॉर्म मिळालेले आहेत.
३. त्यानुसार आपले हॉस्पिटल किंवा आपले Treating Doctor आपल्या पेशंटच्या चालू कंडिशन वरून नक्की किती रेम्डीशिवर लागतील हे ठरवून आपल्याकडून केवळ Annexure B हा फॉर्म भरून घेतील (Annexure A हॉस्पिटल स्वतः भरेल).
४. असे करून Annexure A आणि B हे दोन्ही भरलेले फॉर्म हॉस्पिटल स्टाफ स्वतः ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याला इंजेक्शन मिळावे ह्या हेतूने आपल्या इतर कागदपत्रांसाहित (कॉविड रिपोर्ट, HRCT Report, हॉस्पिटल चे प्रिस्क्रिपशन,आधार कार्ड इ.) जिल्हाधिकारी कार्यालयात
पाठवण्याची व्यवस्था करेल इतकंच नाही तर याचा follow up सुद्धा हॉस्पिटल स्टाफ यांच्याकडेच असेल.

५. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकदा आपली इंजेक्शन ची request आल्यावर ते 60% प्रमाणे आपला कोटा FDA अधिकारी आणि रेम्डीशिवर चे अधिकृत विक्रेता यांचे मार्फत आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची
व्यवस्था करतात.

६. आणि म्हणूनच आपण कोणीही त्रास घेऊ नका जो काही त्रास घ्यायचा आहे तो हॉस्पिटलचा स्टाफ घेईल.

७. ईथुनपुढे जर हॉस्पिटलमधून तुम्हाला रेम्डीशिवर आणण्यासाठी त्रास देत असतील तर खाली दिलेल्या फोन नंबर वरून त्यांची लेखी आणि तोंडी तक्रार जिल्हाधिकारी यांना करावी.
८. शेवटचं,
आता या सगळ्यात आपल्याला जर काही करायचे असेल तर आपले #पालकमंत्री आणि #जिल्हाधिकारी ह्यांच्या नाकात दम आनेपर्यंत त्यांचा Followup घ्या, त्याना सळो की पळो करून सोडा, लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना जितक पळवाल जितका फोन करून, मेल करून, msg करून त्रास द्याल
तितके ते तुमच्यासाठी सजग राहून सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि जितके तुम्ही गाफील रहाल तितके ते गाफील राहतील बाकी निर्णय तुमचा आहे.

माहितीसाठी / तक्रारीसाठी हेल्पलाईन खालीलप्रमाणे :

१. मुंबई जिल्हा - 022-22664232

२. मुंबई उपनगर : - 022-26556799 , 26556806
३. ठाणे जिल्हा : - 022-25301740 022-22027990

४. रायगड जिल्हा : - 02141-222118 02141-222097

टीप : हा msg copy paste करू शकता आणि आपल्या आपल्या जिल्ह्यातील लोकांसाठी पाठवू शकता. @iMoinAli
@MaheshZagade07 @SaurabhBG @Atarangi_Kp @Shrirekha27 @DrVidyaDeshmukh @surgeon_sheel07
You can follow @EmkayTalks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: