आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर..

राज्य ज्या परिस्थितीतुन जातोय त्यासाठी निश्चितच देवेंद्रजीं सारखा खमका कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री म्हणुन असायला हवा होता

मी केवळ भाजप समर्थक म्हणुन नव्हे तर कोरोनाला जवळुन बघितलेला एक व्यक्ती म्हणुन हा थ्रेड लिहितोय

१/९
मार्च २०२० पासुन कोरोनाचे संकट सुरु झाले.
काही दिवसातच निसर्ग चक्रिवादळ रायगड जिल्हावर येऊन धडकलं.
पुर्व विदर्भलापण जोरदार अतिवृष्टीने झोडपले.

हे सगळं चालु असताना मुख्यमंत्री त्यांच्या आलिशान बंगल्यातुन कारभार बघत होते.

जमीनीवर कोण होतं... देवेंद्र फडणवीस 👇

२/९
कोरोनाला न जुमानता देवेंद्रजी बिनधास्त कोविड हाॅस्पिटल्स/सेंटर्सला भेट देत होते.

रुग्णांच्या समस्या, त्यांच्या सुचना, त्यांच्या व्यथा प्रत्यक्षात जाणुन घेत होते.

स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींना मदतीच्या सुचना जारी करत होते.

तेव्हा मुख्यमंत्री घरी बसुन फेसबुक लाईव्ह करत होते

३/९
४ - विरोधीपक्ष नेत्याच्या व एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या नात्याने देवेंद्रजी प्रशासनाला देखिल सुचना देत होते.

मुख्यमंत्री घरा बाहेर पडत नाही आणि प्रशासन जवळजवळ विरोधीपक्ष नेताच सांभाळतोय ह्या भीतीने तुघ्लकी फर्मान जारी झाले.

फडणवीसांना Entertain करु नये.

४/९
असल्या नीच राजकारणाला बळी न पडता देवेंद्रजींनी त्यांच्या दौऱ्यांचा सपाटा चालुच ठेवला.

पुर्व विदर्भाचा, रायगड जिल्हाचा दौरा केला.

जनतेने त्यांच्या मनातला मुख्यमंत्री भेटायला आलाय ह्या हक्काने आपल्या व्यथा मांडल्या.

काही माऊलींचे अश्रु आजही डोळ्या समोरुन जात नाहीत

५/९
दुसरीकडे जनतेच्या बोकांडी बसवलेला मुख्यमंत्री फक्त व्हिडिओ काॅन्फरन्स करुन परिस्थिती जाणुन घेत होता.

बोंबाबोंब झाल्यावर बाहेर पडले.. कुठे आलिशान जहाजातुन प्रवास करुन अर्ध्या तासात दौरा आटोपला तर कुठे पुलावर ग्रीन कार्पेटवर उभे राहुन पाहणी करुन परतले.

६/९
आज १ वर्षानंतर कोरोनाने परत डोकं वर काढलंय.
▪️रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय
▪️बेड मिळत नाहीये
▪️ॲाक्सिजन अभावी रुग्ण दगावताहेत
▪️रेमडेसिविरचा काळाबाजार चाललाय
▪️स्मशानात जागा शिल्लक नाहीये, लाकडं कमी पडताहेत

तरी मुख्यमंत्री एकाही रुग्णालयाला भेट देताना दिसले नाही.

७/९
स्वतः काम करणार नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही.
मग काय तर सत्तापक्षातले वाचाळवीर नेते ॲक्टिवेट करायचे.
▪️संजय राऊत
▪️नवाब मलिक
▪️नाना पटोले
▪️आव्हाड
▪️अनिल परब

मित्रहो विचार करा, ह्या पैकी एकानेतरी तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा काही काम केलंय असं वाटतं का?

८/९
तात्पर्य इतकंच की आपण सर्वांनी खुप मोठे पाप केले असावे म्हणुन ह्या संकट समयी असा माणुस मुख्यमंत्री म्हणुन आपल्या पदरी पडलाय

परमेश्वरा,एकतर हे संकट लवकरात लवकर शमु दे किंव्हा देवेंद्रजींच्या रुपात महाराष्ट्राला धीर देणारा मुख्यमंत्री त्या जबाबदार खुर्चीत विराजमान होऊ दे
९/९

🙏🙏
You can follow @MaharashtraMaz6.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: