#Thread : सासवडचा पुरंदरे वाडा.
पुण्याजवळील सासवड शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू आहेत. खरंतर, काही काळासाठी मराठा साम्राज्याचा कारभार हा सासवड मधून चालू होता. यामुळे सासवड मधील ऐतिहासिक वस्तूंचे महत्व मोठे आहे. अश्याच ऐतिहासिक वास्तूंमधील एक वास्तू म्हणजे पुरंदरे वाडा.
(1/15)
थोरले बाजीराव पेशवे यांच्या वडिलांच्या काळापासून पुरंदरे घराणे मराठा साम्राज्याचे निष्ठवंत सेवक होते. अंबाजी पंत पुरंदरे हे थोरल्या बाजीराव पेशवे यांचे सल्लागार होते. पेशवे-पुरंदरे घराण्याचे संबंध अत्यंत जवळचे. सुपा-सासवड भागाच्या सुभेदार पदाची जबाबदारी एकेकाळी पुरंदरेंवर होती.
सुमारे १७१० च्या आसपास पुरंदरे वाडा बांधला गेला.
या वाड्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची. पेशवे, त्यांचे सैनिक असे अनेक जण अनेक ऐतिहासिक मोहिमांच्या आधी राहायला म्हणून इथे यायचे. पुरंदरे वाडा अत्यंत भव्य दिव्या आहे. सासवड मधील काळभैरवनाथ मंदिराच्या मागे हा वाडा ऊभा आहे.
(3/15)
वाड्याच्या परिसरात एक गणपतीचे मंदिर आहे जे अंबाजी पुरंदरे यांनीच बांधले होते. वाड्याचा दरवाजा हा शनिवारवाड्याच्या दरवाज्यासारखाच आहे. प्रचंड मोठ्या दरवाजाकडे पाहताना आपण फारच लहान आहोत असे जाणवते. या दरवाज्याला दिंडी दरवाजा आहे.
(4/15)
हा दिंडी दरवाजा ओलांडून आपण जेव्हा आत मध्ये पाऊल ठेवतो, त्या क्षणी आपल्या डोळ्यात मावणार नाही, असा भव्य वाडा आपल्या समोर ऊभा राहतो.
आत गेल्या गेल्या डाव्या हाताला कधीकाळी इथे अंगण होते, असे तिथल्या एका माहितगाराने सांगितले.
(5/15)
थोडं पुढे चालत गेलो कि आपण चौकात येतो. जिथे आपल्याला पुष्करणी दिसते. वाड्याचा परिसर पाहता, आत मधल्या बऱ्याच वास्तू इतक्या काळानंतर सुद्धा टिकल्या आहेत. वाड्याच्या तळमजल्यावर बर्याचश्या जागा या सार्वजनिक कारभारासाठी वापरल्या जात असाव्यात असा अंदाज येतो.
(6/15)
चौक, ओसरी, स्वयंपाक घर, हौद, विहीर असे सगळे तळमजल्यावर आहे
तर वरील माजले हे वयक्तिक वापरासाठी आहेत हे दिसून येते कारण इथे खोल्या आहेत आणि त्या खोल्यांमध्ये त्या काळातील काही वस्तू आजही आढळून येतात. पहिल्या मजल्यावर संगीताचा जलसा आहे. इथे द्यूत आणि इतर खेळांचे अवशेष दिसून येतात.
दुसऱ्या मजल्यावर धान्यकोठारामध्ये ७ स्त्रियांचे चित्र दिसून येते. माहितगाराप्रमाणे, हे चित्र विधवांचे आहे. त्याचे महत्व काय, किंवा ते चित्र इथेच का काढले ह्या बद्दल माहिती नाही.वाड्याच्या उत्तरपश्चिम दिशेला मोठी विहीर आहे.
(8/15)
हि विहीर फक्त पुरंदर्यांसाठी राखीव होती असे तिथल्या माणसाने सांगितले. वाड्याच्या चारीही बाजूंना पहारा देण्यासाठी जागा आहे. वाड्याला तळघर आहे, पण तिथे जाणे शक्य नाही , कारण भिंती पडल्या आहेत. पण असे म्हंटले जाते कि जाधवगडाला जोडणारा भुयारीमार्ग या तळघरातून आहे.
किती रहस्य दडली आहेत देव जाणे. अश्या ऐतिहासिक ठिकाणी आल्यावर मला आश्चर्य वाटतं ते आपल्या अज्ञानाचे. ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेले हे वाडे, किल्ले, वास्तू ह्या दिवसागणिक संपत चालल्या आहेत.
(10/15)
क्षुल्लक राजकारणासाठी म्हणून आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत आणि आपला इतिहास गमावत आहोत. इतिहास घडवायच्या आधी इतिहास जपणं महत्वाचं आहे.

हा वाडा पाहिल्यावर मी विचार केला कि इथे कधीतरी पेशवे आले असतील, इथे अनेक यवनांच्या विरोधात झालेल्या लढाईची रणनीती ठरवली गेली असेल.
(11/15)
इथे वाद विवाद मिटले असतील, नवी नाती जुळली असतील ! मराठा स्वराज्याचे, साम्राज्यात रूपांतर होताना या वाड्याने पाहिले असेल. वाड्यातील ओसरी वर बसून हा विचार करत असताना डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या हे कळलंच नाही !
(12/15)
पुरातत्व खात्याला ह्या जागांचे माहात्म्य केव्हा कळेल देव जाणे ! यावास्तूचे संवर्धन करून जर इथे पुरंदरे museum बांधले, जिथे इतिहासाचे प्रदर्शन भरवले तर काय हरकत आहे.
(13/15)
पैस्यापरी पैसे मिळेल, आजूबाजूच्या लोकांना रोजगार मिळेल, इतिहासावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना समाधान मिळेल आणि माझ्या सारख्या भटक्याला, आपला इतिहास पुढच्या पिढी कडे सुखरूप पोहोचला जाईल या विचाराने आनंद होईल !
(14/15)
कधी सासवड ला आलात, तर हि वास्तू पाहायला विसरू नका ! अश्या अनेक वास्तूंचा अभ्यास आणि प्रवास आपण येत्या दिवसात करूया ! हा थ्रेड कसा वाटला ते अवश्य कळवा.धन्यवाद.
Photo Credits : Shreyasee Shinde.
Information : पुरंदरे दफ्तर भाग 1,2
This Photo was clicked by : @vastuchitra
(15/15)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: