परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले.
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #सत्यकथा #मराठी १/१८
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता #सत्यकथा #मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
३/१८
त्यांनी एकाचे दोन, दोनाचे तीन आणि पुढे सलग चार ठिकाणी एका मोठ्या कंपनीसाठी जॅाब वर्क करायला सुरूवात केली. हे सर्व ते एकहाती सांभाळत असत. मी त्यांना त्यांच्या दुसऱ्या फॅक्टरीच्या वेळी जे भेटलो ते अगदी आजपर्यंत आमचे तसेच संबंध आहेत. मी खेडेगावातून येऊन मुंबईत हातपाय मारतोय हे
४/१८
४/१८
त्यांना फार आवडायचे.माझे इंग्रजी व मराठीवरील प्रभुत्व त्यांना खुप आवडायचे. माझ्यासोबत बोलताना ते मुद्दामहूनच मराठीत बोलायचे,त्यांच्या मराठीच्या गोडीने मला त्यांच्या गुजरातीकडे आकर्षित केले, आज मला जी काही गुजराती भाषा समजते वा थोडीफार बोलता येते त्यात त्यांचा वाटा सिंहाचा.
५/१८
५/१८
पुढे मी व्यवसाय सुरू केल्यानंतरही बऱ्याच वेळा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. तसा आमच्या व्यवसायाशी त्यांचा फार काही संबंध नव्हता पण दोघांनीही तो जिव्हाळा जपला. ते बऱ्याचदा नव्या मशीन खरेदी करताना माझा सल्ला घ्यायचेच. त्यांची बिनधास्त, बेधडक वृत्ती ही मलाही भूरळ पाडायची.
६/१८
६/१८
गेल्या चारपाच वर्षांपूर्वी परेशभाई ज्या कंपनीचे काम करायचे त्यांनी मोठे एक्सपान्शन केले. त्यासोबतच यांनाही मोठा प्लांट टाकायला सांगितला. परेशभाईंनी स्वत:जवळची सर्व पुंजी लावली. भली मोठी जागा, मोठमोठ्या मशीन्स आणि भव्यदिव्य साजेशी फॅक्टरीही टाकली. अगदी पहिल्या दिवसापासून मी
७/१८
७/१८
त्यांना जी हवी ती मदत करायचो, त्यांची प्रत्येक मशीन मी टेक्निकल क्लियरंन्स दिल्याशिवाय त्यांनी घेतली नाही.
प्रोजेक्ट खुपच मोठा होता पण परेशभाईंचा एकंदर इतिहास पाहता त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल शंका असण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सर्वच निर्धास्त होतो. आमच्या एका
८/१८
प्रोजेक्ट खुपच मोठा होता पण परेशभाईंचा एकंदर इतिहास पाहता त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल शंका असण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सर्वच निर्धास्त होतो. आमच्या एका
८/१८
उपकंपनीकडूनही त्यांनी काही मशीन्स खरेदी केल्या.त्यामुळे आपसुकच आम्हीही जोडले गेलो होतो.
साधारण २०१५ ला संपुर्ण फॅक्टरी तयार झाली, पुजा पार पडली, ट्रायल्स झाल्या. सहा महिने तास दोनच फॅक्टरी चालायची, मी बऱ्याचदा यावर चिंता व्यक्त करायचो पण हे मात्र एकदम आत्मविश्वासाने
९/१८
साधारण २०१५ ला संपुर्ण फॅक्टरी तयार झाली, पुजा पार पडली, ट्रायल्स झाल्या. सहा महिने तास दोनच फॅक्टरी चालायची, मी बऱ्याचदा यावर चिंता व्यक्त करायचो पण हे मात्र एकदम आत्मविश्वासाने
९/१८
“सर्व ठिक होईल” म्हणत दिवस काढत होते, तणाव तर त्यांनाही होताच पण ते दाखवत नव्हते आणि पुढे अचानक पेरेंट कंपनीतील मॅनेजमेंट बदलली, नव्या मॅनेजमेंटने सर्व प्रोसेस स्वत:च्या कारखान्यात (इनहाऊस) करण्याचा बोर्डमिटींगमधे ठराव पास केला आणि परेशभाईंवर समस्यांचा डोंगरच कोसळला.
१०/१८
१०/१८
मुंबईतील पहिले चार युनिट्स, ही महाकाय कंपनी आणि सर्व काही या एकाच कस्टमर भोवती होते... मोठ्या कंपनीच्या आजूबाजूलाही असे दुसरे युनिट नव्हते ज्यांचे हे काम करू शकतील. ते गांगरून गेले. बीपी, शुगर इतकेच काय एक हृदयविकाराचा झटका पण येऊन गेला.... पण नवी मॅनेजमेंट बधली नाही.
११/१८
११/१८
चार पैकी तीन युनिटला टाळे लागले. महाकाय युनिटची तर अवस्था आता पहावत नाही. बॅंकाचे हफ्ते थांबले, त्यांना लोन नवे/जुने केले, सर्व मार्ग वापरले, समाजाकडून घेतलेले कर्ज काही जमीनी/गाळे विकून फेडले. तरीही बॅंकाच्या कचाट्यातून सुटतां सुटका होत नाहीये.
१२/१९
१२/१९
एक युनिट कसेबसे एका शिफ्टवर आप्तस्वकिय, मित्रांच्या आधाराने चालू आहे आणि गेल्या चार वर्षात तर सगळी रयाच गेली, कोण बरोबर, कोण चूक हा प्रश्नच नाही. खरतर त्यांच्या रक्तात ऊद्योग-व्यवसाय पण ते आंधळ्या विश्वासावर राहिले... एकाच कंपनीच्या जीवावर पाच-पाच फॅक्टरीज टाकल्या, खरतर
१३/१८
१३/१८
खुप पुर्वी त्यांनी इतरही काही क्लायंट जोडायला हवे होते.
पण त्यांचे Subconscious Mind निवांत झाले होते. खरतर अशी अवस्थात मुळात धोकादायक असते. त्यांच्याकडे करोडो रूपयांचा प्लांट टाकताना हा फेल झाला तर काय? याची कोणतीच योजना आणि उत्तर नव्हते.
१४/१८
पण त्यांचे Subconscious Mind निवांत झाले होते. खरतर अशी अवस्थात मुळात धोकादायक असते. त्यांच्याकडे करोडो रूपयांचा प्लांट टाकताना हा फेल झाला तर काय? याची कोणतीच योजना आणि उत्तर नव्हते.
१४/१८
मित्रहो, पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला,काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधीकधी त्यात आपण फसतोच.
त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते.
मग ती शेअरमार्केटमधील गुंतवणुक असो, जमिनीशी निगडीत व्यवहार असो वा अशी पेरेंट कंपनी किंवा एकाच बॅंकेतील एफडी.
१५/१८
त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते.
मग ती शेअरमार्केटमधील गुंतवणुक असो, जमिनीशी निगडीत व्यवहार असो वा अशी पेरेंट कंपनी किंवा एकाच बॅंकेतील एफडी.
१५/१८
या सर्वांची परिणीती म्हणून त्यांना आज
एवढ्या कष्टाने बनविल्येल्या सोन्यासारख्या फॅक्टरीरूपी दागिण्यांची विक्री करायला लागली.
आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक वेळी दक्ष राहणे खुप गरजेचे असते.पैशांचे खेळ सोपे नसतात.
आता पुढची गंमत ऐका आमचे परेशभाई शांत होतील का तर कधीच नाही!
१६/१८

DNA च व्यावसायीक वृत्तीचा, एवढ सगळ होऊनही भाई पुन्हा कामावर यायला लागलेत. मला म्हणतात,पेरेंट कंपनीच्या नाकावर टिच्चून ऊभा राहणार. बॅंकेकडून पुन्हा कर्ज घेतलेय,नवी जागा घेतली.
परेशभाई राखेतून भरारी घेतील यात मला काहीच शंका वाटत नाही.
आपले मराठी लोक बुद्धीमत्ता, शिक्षण, कष्ट
१७/१८
परेशभाई राखेतून भरारी घेतील यात मला काहीच शंका वाटत नाही.
आपले मराठी लोक बुद्धीमत्ता, शिक्षण, कष्ट
१७/१८
प्रामाणिकता यात जागतिक दर्जाचे आहेत पण झोकून काम करण्याच्या वृत्तीचा अभाव जाणवतो.
असं मोठं संकट/रिस्क असेल तर आपली मंडळी थोडं मागे सरतात,दुसरं कोणी करावं,आपण सपोर्ट करू असं धोरण पत्करतात.
जग जिंकण्यासाठी ही आपली कार्यसंस्कृती बदलायला हवी!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता
१८/१८
असं मोठं संकट/रिस्क असेल तर आपली मंडळी थोडं मागे सरतात,दुसरं कोणी करावं,आपण सपोर्ट करू असं धोरण पत्करतात.
जग जिंकण्यासाठी ही आपली कार्यसंस्कृती बदलायला हवी!
#SaturdayThread #आर्थिकसाक्षरता
१८/१८