#Thread

११९१ मध्ये मोहम्मद घोरीला तराईन युद्धात पराभव झाला होता हे आपणास माहीत आहे. पण ११९१ च्या १४ वर्षे आधीच त्याने एका राजपूत राणीने त्याला धूळ चारली होती. त्या राणीचे नाव होते... नाईकी देवी सोळंकी...
गोव्याच्या कदंब राजा महामंडलेश्वर परमाडी ह्यांची नाईकी देवी ही मुलगी. त्यांचा विवाह गुजरात मधल्या सोळंकी राजवंशाच्या अजयपाल सोबत झाला. अजयपाल फक्त ४ वर्षे गादीवर बसला. आणि ११७५ साली त्याचा मृत्यू झाला.
इकडे गझनीचा सुलतान मोहम्मद घोरी भारतावर हल्ला करण्यासाठी आला. ११७५ साली मुलतान व सिंध प्रांत बळकावून तो दक्षिणेकडे कच्छ, काठीयावड आणि सौराष्ट्र कडे वळला. मग रस्त्यात येणारे प्रांत घेत घेत तो आता सोळंकी राजवंशाची राजधानी "पाटण" (गुजरात) पर्यंत आला.
तत्पूर्वी राजा अजयपालचा मृत्यू झाल्यावर आपला मुलगा " मुलराजा -२ " याला गादीवर बसवून नाईकी देवीने राज्यकारभार सुरू केला. एक बाई आणि तिचा लहान मुलगा आपल्याला हरवू शकणार नाहीत त्यामुळेच मोहम्मद घोरीने पाटण वर हल्ला केला.
पण त्याला हे माहीत नव्हते की नायकी देवी ह्यांनी तलवार, घोडदळ, सैनिकी रणनीती, मुत्सद्देगिरी आणि राज्यातील इतर सर्व विषयांचे उत्तम प्रशिक्षण घेतले होते.त्यामुळे जेव्हा हल्ला होणार तेवढ्यातच त्यांनी पृथ्वीराज चौहान,परमार,गुर्जर-प्रतिहार व इतर अनेक महत्वाच्या राज्यांना मदत मागितली
मदत यायला वेळ लागणार व आपल्या कडे सैन्य कमी त्यामुळे आपल्या परीने आपण काही तरी करायला पाहिजे म्हणून नाईकी देवीने रणनीती आखली.
१) युद्धक्षेत्रासाठी डोंगराची निवड केली ( आत्ताचे माउंट अबूच्या पायथ्याशी वसलेले कसरहादा गाव)
२) त्यामुळे फायदा असा झाला की जागा छोटीशी आणि सैन्य जास्त.
जेव्हा घोरीचे सैन्य कासरहादा येथे पोचले तेव्हा राणीने प्रचंड ताकदीनिशी हल्ला केला त्यामुळे घोरिचे सैन्य पळू लागले. स्वतः घोरी तर खूप घाबरला होता. राणी नायिकी देवी त्याच्यासाठी मृत्यूचे एक रूप बनली होती.राणीने तलवार फेकली आणि घोरीवर हल्ला केला.
राणी नायिकी देवीची तलवार घोरीच्या पाठीवर आदळली, या मारहाणीने घोरीचे प्राण वाचले पण तलवार ही पार्श्व भागातून आत घुसून पुढच्या गुप्तांगापर्यंत गेली होती.

घोरी महारानीचे शौर्यरूप पाहून तो इतका घाबरला की जखमातून रक्तस्त्राव होऊनही तो घोड्यावरून खाली उतरला नाही. तो मुलतानला परतला
आणि घोड्यावरून खाली आला. घोरी मुलतानला पोचला तेव्हा तो पूर्णपणे रक्तबंबाळ झाला होता. त्याला समजले की त्याने आपले जननेंद्रिय आणि गुदद्वार कायमचा गमावला आहे आणि तो आता कायमचा नपुसंक बनला आहे.
पुढील १४ वर्षे घोरी भारतावर हल्ला करू शकला नाही. पुढच्या वेळेस ११९१ साली त्याने खैबर खिंडीतून पेशावर, लाहोर,पंजाब मार्गे भारतावर आक्रमण केले.

स्त्रोत
१) मिन्हाज- ई- सिराज
२) प्रबंध चिंतामणी
३) Women in Ancient India - Trupti Sharma
४) Wikipedia
You can follow @Theprasad_2001.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: