#Thread : अर्णब गोस्वामी,नाईक आणि मुंबई पोलिस! एक थक्क करणारा अहवाल! (Opindia @UnSubtleDesi च्या अहवालाचा मराठी अनुवाद)

४ नोव्हेंबर २०२० रोजी संपूर्ण देशाने पाहिले कि रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या निवासस्थानावरून पोलिसांनी अटक केली
(1/n)
आणि अटक करते वेळी त्यांना २० पोलिसांनी शब्दशः फरफटत नेले.
केस होती, २०१८ साली झालेल्या अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची आणि सुसाईड नोट मध्ये अनेक नावांपैकी एक नाव होते अर्णब गोस्वामी यांचे.ह्या अटक मोहिमेचे नेतृत्व करत होते एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे,
ज्यांना पुन्हा एकदा पोलीस फोर्स मध्ये १६ वर्षांनी दाखल केले गेले होते,
१६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर 'कस्टोडियल मृत्यू' चा आरोप लागला होता. या १६ वर्षांच्या काळात सचिन वझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता परंतु कमिश्नर परमबीर सिंग यांनी कोरोना वायर्स महामारी साठी लागणाऱ्या
ज्यादा पोलिसांची कुमक भरून काढण्यासाठी म्हणून वझे यांना बोलावले गेले.
अर्णब गोस्वामींना जेव्हा त्यांच्या घरातून अत्म्हत्येच्या आरोपाखाली फरफट नेले जात होते तेव्हा त्यांना त्यांचे बूट सुद्धा घालू दिले नाहीत आणि सिद्ध झालेल्या गुन्हेगारासारखे
त्यांना पोलीस वॅन मध्ये टाकून अलिबाग पोलीस स्टेशन ला नेले गेले.
अर्णब गोस्वामी च्या ऍफिडेव्हिट प्रमाणे पोलीस स्टेशन मध्ये त्याला बेदम मारण्यात आले,बुटाने मारले, त्याच्या घश्यात मुद्दामहूम त्यांचा श्वास रोखण्यासाठी म्हणून पाणी ओतले गेले आणि
त्याच्या हातावर ६ इंच लांब खोल जखमेचा निशाण सुद्धा आहे असे त्याने सांगितले आणि दाखवले देखील.
त्याची पोलीस कस्टडी ला जेव्हा नकार मिळाला तेव्हा त्याला गोपनीय पद्धतीने मुंबई जवळील तळोजा जेल मध्ये हलवण्यात आले.अर्णब यांच्या अटकेनंतर ९ दिवसांनी सुप्रीम कोर्टाने त्यांची बेल मंजूर केली
आणि त्यांच्या अवैध अटकेबद्दल पोलिसांना खडेबोल सुनावले
आणि हायकोर्टाच्या देखील त्यांना लवकर बेल का दिली नाही यामुळे कठोर शब्दात टीका केली.
आश्चर्याची बाब हि होती कि अन्वय नाईक आत्महत्या केस २०१८ सालीच पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि कोणत्याहीप्रकारे कोर्टाची परवानगी न घेता
पोलिसांनी अचानक हि केस पुन्हा उघडली आणि
यावर मॅजिस्ट्रेट ने सुद्धा अर्णब च्या न्यायालयीन कोठडी च्या वेळेस पोलिसांना सुनावले. ज्या केस चा वापर करून महाराष्ट्र सरकारने अर्णब ला अटक करण्याचा प्रयत्न केला त्या केस चा
'क्लोजर रिपोर्ट' त्याच पोलीस अधिकाऱ्याने २०१८ साली फाईल केला होता ज्याने आत्ता अर्णब ला अटक केली,
नक्कीच काहीतरी गौडबंगाल इथे आहे.ते पुढे स्पष्ट होईल.
ऑपइंडिया ने ARG आऊटलायनर मीडिया एशियानेट प्रायव्हेट लिमिटेड(ARG ) ,CPDL (अन्वय नाईक ची कंपनी) आणि नाईक यांच्या पत्नी आणि मुलीमध्ये( जे या केस चे नेतृत्व करत आहेत) झालेल्या संभाषणाचा तपास घेतला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार अर्णब नेच अन्वय आणि त्यांच्या आईला आत्महत्या करण्यास भाग पाडले जे 'CPDL ' चे डायरेक्टर होते.
सुसाईड नोट आणि कुमुद नाईक (अन्वय यांची आई) यांची (तथाकथित) आत्महत्या.
५ मे २०१८ ला अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद हे त्यांच्या कावीर,अलिबाग येथील फार्महाउस मध्ये मृतावस्थेत सापडले. त्या वेळेला त्याच फार्महाउस मधून एक सुसाईड नोट सापडली.
सुसाईड नोट मध्ये तीन लोकांची नावे होती :
१. अर्णब गोस्वामी :- नाईक आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अर्णब ने काँकॉर्ड डिझाइन्स pvt .ltd च्या डायरेक्टर (अन्वय नाईक आणि कुमुद नाईक) यांचे ८६ लाख रुपये द्यायचे होते.
२.फिरोज शेख : - रुपये ४ कोटी.
३. नितेश सारडा :- रुपये ५५ लाख.
या सुसाईड नोट बद्दल एक चित्तवेधक गोष्ट अशी आढळली कि यावर फक्त अन्वय नाईक यांचीच सही होती.त्यांच्या आई ज्या देखील मृतावस्थेत सापडल्या त्यांचे हस्ताक्षर या सुसाईड नोट वर नव्हते किंवा त्यांनी दुसरी कोणतीही सुसाईड नोट लिहलेली आढळून आली नाही.
याच दिवशी या केस बद्दल FIR फाईल केली गेली ज्यात तीन व्यक्तींचा उल्लेख होता त्यातील एक म्हणजे अर्णब गोस्वामी.
या नंतर लगेच पोलीस अर्णब च्या ऑफिस वर चौकशीसाठी म्हणून गेले आणि त्यांनी अर्णबचे आणि त्याच्या कंपनीचे आर्थिक अहवाल (FINANCIAL REPORT ) द्यायला सांगितले.
८ मे ला CFO एस सुंदरमन आणि रिपब्लिक CEO विकास खानचंदानी यांनी रिपब्लिक च्या ऑफिस चे आर्थिक अहवाल, व्हिसिटर लॉग, फोने रेकॉर्ड अलिबाग पोलिसांकडे सुपूर्त केले.
टाइम्स ऑफ इंडिया च्या ६ ऑगस्ट २०१८ च्या रिपोर्ट प्रमाणे,
अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईचा खून केला आणि मग पुढे लगेचच त्यांनी आत्महत्या केली.
हि गोष्ट स्पष्ट होती कि कुमुद नाईक यांचा खून झाला आहे कारण लगेचच मर्डर केस सुद्धा रजिस्टर करण्यात आली होती.तत्कालीन मिळालेल्या पुराव्यानुसार अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईचा खून केला आणि
मग पुढे आत्महत्या केली असा विश्वास पोलिसांना बसला.अहवालात नमूद केलेल्या एकाच पुराव्यामुळे असे सिद्ध झाले कि अन्वय नाईक आणि कुमुद नाईक सोडून या फार्महाउस वर इतर कोणीही नव्हते.
१६ एप्रिल २०१९ ला अलिबाग पोलिसांनी एक संक्षिप्त अहवाल दाखल केला ज्यात त्यांनी नमूद केले कि अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांविरोधात कोणतेही पुरावे सिद्ध झालेले नसून हि केस बंद करण्यात येत आहे.
५ मे २०१८ आत्महत्येच्या दिवसापासून,१६ एप्रिल २०१९ आणि केस पुन्हा चालू करण्याच्या दिवसांमध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या ?
ऑपइंडिया यांनी केलेल्या तपासत एक गोष्ट स्पष्टपणे आढळून आली कि ARG आऊटलायनर मीडिया एशियानेट प्रायव्हेट लिमिटेड(ARG )
आणि अक्षता आणि आद्य नाईक (अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीमध्ये) बऱ्याच भेटीगाठी झाल्या.पुढे असेही चर्चेत आली कि असा कोणता मार्ग शोधता येईल का,ज्यातून ARG , CPDL (अन्वय नाईक यांची कंपनी) च्या विक्रेत्यांना कायदेशीर पद्धतीने पेमेंट करू शकेल,
पण असा कोणताही मार्ग आजपर्यंत मिळालेला नाही.हाती लागलेल्या पत्र व्यव्हारावरून एक गोष्ट सिद्ध होते कि हि केस दिसते तितकी सोपी अजिबात नाही आणि यात अनेकांचे वयक्तिक फायदे आहेत हेही सिद्ध होते. आता आपल्यासमोर असलेले समज गैरसमज हे पत्रव्यवहार वाचल्यावर निश्चितपणे दूर होतील.
पत्र १ : १२ एप्रिल २०१९
१२ एप्रिल २०१९ ला ARG PVT . LTD ने काँकॉर्ड डिज़ाईन्स PVT . LTD , अक्षता नाईक (अन्वय नाईक यांच्या पत्नी ),आद्या नाईक (अन्वय यांची मुलगी) आणि तपास अधिकारी मिस्टर.डी.एस.पाटील यांना एक पत्र लिहले.
या पत्रावरून एक सिद्ध झाले कि ARG , नाईक आणि CPDL च्या सब कॉन्ट्रॅक्टर मध्ये ARG ने CPDL ला दिलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी अनेक बैठका झाल्या.
या पत्रामध्ये ARG च्या अधिकाऱ्यांनी नाईक यांना सांगितले कि दिलेल्या कामाचा बहुतांश भाग पूर्णकारण्यासाठी
म्हणून ARG ने स्वतःच कॉन्ट्रॅक्टर ची नेमणूक केली आहे. राहिलेल्या कामांच्या रक्कमेची पूर्तता केल्यावर, CPDL ला ARG ने ३९,०१,७२१ रुपये द्यायचे आहे असे पत्रात नमूद केले आहे . ARG चे अधिकारी म्हणतात हि रक्कम CPDL ला देण्यात यावी आणि
म्हणतात हि रक्कम CPDL ला देण्यात यावी आणि पुढे आधीच्या व्यवहारांसाठी वापरलेला बँक अकाउंट चे डिटेल नमूद केले आहेत.
आश्चर्याची गोष्ट अशी कि CPDL ने नेमलेल्या सब कॉन्ट्रॅक्टर चे पेमेंट CPDL च्या अधिकाऱ्यांनी केले नाहीत म्हणून ते सब कॉन्ट्रॅक्टर थेट ARG कडे एक दोनदा त्यांचे
पेमेंट मागणीसाठी म्हणून गेले
त्यामुळे,या पत्रामधून दोन,दोन विनंत्या केल्या गेल्या :
१. CPDL च्या अधिकृत व्यक्तीच्या नावाची पुष्टी करणे.
२. CPDL च्या नावाने ARG ने सब कॉन्ट्रॅक्टर ला केलेले पेमेंट,हे ARG ने CPDL ला दिल्या जाणाऱ्या(३९,०१,७२१ रुपये)यातून केली आहे याची पुष्टी करावी
क्लोजर रिपोर्ट एप्रिल - २०१९ - जो मुख्य न्यायालयीन मॅजिस्ट्रेट एल.जी.पाचचे यांनी १६ एप्रिल २०१९ ला स्वीकारला.
एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे कि या केस चा सारांश सांगणारा अहवाल एप्रिल २०१९ मध्ये फाईल केला गेला होता.
क्लोजर रिपोर्ट प्रमाणे,जे पोलीस अधिकारी या केस वर काम करत होते त्यांना अर्णब गोस्वामी,फिरोझ शेख आणि नितेश सारडा यांच्यात कोणीतही कडी सापडली नाही. असा कोणताही पुरावा आढळला नाही ज्यात असे सिद्ध होते कि या तिघांनी अन्वय नाईक यांचे जगणे मुश्किल केले आणि
म्हणून त्यांनी आत्महत्या केली. रायगड मधील पोलीस जे या केस वर काम करत होते त्यांनी एप्रिल २०१९ मध्ये मॅजिस्ट्रेट समोर हा अहवाल सादर केला आणि तो त्यांनी स्वीकारला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि 'सारांश अहवाल' तेव्हाच सादर केला जातो जेव्हा पोलिसांकडे आरोपींविरुद्ध
म्हणावेतसे पुरावे नसतात आणि याच्याने पोलिसांना अरोप्याच्या विरोधात चार्जशीट दाखल करता येत नाही.
"सुसाईड नोट मध्ये लिहलेल्या तिघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही कारण तिघे वेगवगेळ्या ठिकाणी राहतात,काम करतात आणि कोणत्याही प्रकारची कडी चालू असलेल्या तपासाच्या आधारावर सापडलेली नसून.
..असा कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्याच्या आधारावर आम्ही असा निष्कर्ष काढू शकू कि एकट्याने,किंवा तिघांनी मिळून मृताचे(अन्वय नाईक) जीवन असहनीय केले आणि त्यांनी याला कंटाळून आत्महत्या केली,
म्हणून पुराव्याचा अभावी हा 'सारांश अहवाल' स्वीकारून हि केस बंद करण्यात यावी" या क्लोजर रिपोर्ट मधील एक परिच्छेद.

या रिपोर्ट मध्ये पुढे असे लिहले," तपासावरून असे आढळून आले कि कोनोकोर्ड लिमिटेड (अन्वय नाईक यांची कंपनी)ची आर्थिक अवस्था गेल्या सहामहिन्यात प्रचंड बिकट आहे आणि
अनेक आर्थिक तोटे सहन करत आहे,या कारणाने अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक हे मानसिक तणावाखाली अहेत. अन्वय यांची आई या कंपनी मध्ये भागीदार असल्यामुळे अन्वय ने त्यांचा गळा घोटून खून केला,सुसाईड नोट लिहली आणि मग त्यांनी फाशी घेतली"
क्लोजर रिपोर्ट मध्ये असे सुद्धा नमूद केले आहे कि काँकॉर्ड लिमिटेड ने (अन्वय यांची कंपनी) अनेक क्लायंट ची कामे अर्धवट ठेवली आहेत, ज्यात सुसाईड नोट मध्ये नमूद केलेल्या तिघांची कामे सुद्धा आहेत.
"सुसाईड नोट मध्ये असलेल्या तिघांनी राहिलेली कामं स्वतःच पूर्ण करून विक्रेत्यांना स्वतःच्या खिश्यातुन पैसे दिले आहेत असे पोलीस रिपोर्ट नमूद करतो". हा क्लोजर रिपोर्ट मुख्य न्यायालयीन मॅजिस्ट्रेट एल.जी.पाचचे यांनी १६ एप्रिल २०१९ ला स्वीकारला.
खरंतर, इंडियन एक्सप्रेस ने CPDL चा ( नाईक यांची कंपनी) वैधानिक अहवाल ( statutory report ) पडताळाला आणि असे दिसून आली कि CPDL वर २६.५ कोटी रुपयांचे कर्ज २०१६ च्या आर्थिक वर्षात होते,आश्चर्याची गोष्ट अशी कि लगेचच हि कंपनी निष्क्रिय झाली आणि फायनान्शिअल रिपोर्ट सबमिट करणे बंद केले.
पत्र २ : ११ जून २०१९
११ जून २०१९ ला ARG ने आद्या नाईक आणि अक्षता नाईक यांना आणि CPDL ला दुसरे पत्र पाठवले आणि हे पत्र फक्त स्पीड पोस्ट आणि कुरिअर ने नाही तर अक्षता नाईक यांच्या whatsapp वर देखील पाठवले.
या पत्रात सुद्धा त्यांच्या 'बैठकांच्या' उल्लेख होता ज्यात CPDL च्या सब काँट्रॅक्टर्स ला ARG आणि ARG च्या अधिकाऱ्यांकडून त्यांचे उरलेले पेमेंट मिळावे असा आशय होता. ARG ने या पत्रात असे सांगितले कि त्यांनी
CPDL कडून नुकसानभरपाईचे पत्र मागितले होते ज्याच्यामुळे ते सब काँट्रॅक्टर्स ला पेमेंट देऊ शकतील, परंतु आद्या आणि अक्षता नाईक आणि CPDL च्या अधिकाऱ्यांकडून त्यांना कसलाही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे कि आद्या आणि अक्षता नाईक 'अन्वय नाईक' यांचे वारस म्हणून ARG ला भेटत होते जेव्हा त्यांची CPDL मध्ये कसलीही भागेदारी नव्हती.
या पत्रात असे नमूद केलेले आढळून येते कि CDPL ने त्यांच्या सब काँट्रॅक्टर्स ला 'रिपब्लिक स्टुडिओ' च्या कामाचे
पैसे अजून दिलेले नव्हते आणि आता हे सब कॉन्ट्रॅक्टर त्यांचे पेमेंट थेट ARG कडून मागत होते. आणि याच कारणाने ARG ला CPDL कडून नुकसानभरपाईचे पत्र हवे होते जेणेकरून थकबाकी(३९,०१,७२१ रुपये)असलेल्या रकमेतून CPDL च्या सब काँट्रॅक्टर्स चे पेमेंट देऊन टाकून पुढे काही अडचणी येणार नाहीत
या पत्रात पुढे असे लिहले गेले कि ,"CPDL किंवा नाईक दोघंही नुकसानभरपाईवर काही प्रतिक्रिया देत नसल्याने त्यांना CDPL च्या बँक अकाउंट मध्ये ( STATE BANK OF INDIA ) ते राहिलेली रक्कम ट्रान्सफर करत आहेत ,ज्याच्या मधून अन्य पेमेंट केल्या गेल्या. या पात्राच्या शेवटी ARG ,
CPDL ला नुकसानभरपाई साठी १० दिवस देतात आणि तसे काही नाही झाल्यास ते CPDL च्या खात्यात थेट रक्कम जमा करतील असे नमूद करून पत्र संपवतात"इथे लक्षात घेतले पाहिजे कि ARG ने CPDL ला ३९,०१,७२१ रुपये देणे होते न केलेल्या कामाचे पैसे
कापून परंतु ARG ने या आधीच CPDL ला ५.२० कोटी रुपये दिले होते

इथे एक प्रश्न CPDL ला विचारावासा वाटतो कि जर आधीच ५.२० कोटी ARG ने दिले असतील तर मग CPDL ने त्यांच्या विक्रेत्यांचे पैसे का नाही दिले होते आणि या वेळेला CPDL चे डायरेक्टर नुकसानभरपाईचा दावा का करत नव्हते ?
जर नाईकांना ARG नेच विक्रेत्यांचे पेमेंट द्यावेसे वाटत होते, जे CPDL देऊ शकले नव्हते ५.२० कोटी रुपये असून सुद्धा, तर या संधीचा वापर त्यांनी नुकसानभरपाईचा दावा करून, सगळ्यांची पेमेंट देऊन या काव्यातून सुटका करून घेण्यासाठी का नाही केला ?
पण असे काहीही झाले नाही आणि आद्या किंवा अक्षता नाईक यांनी ARG ला काहीही प्रतिसाद दिला नाही.

पत्र ३ :१५ जून २०१९, अक्षता नाईक यांनी ARG ला लिहलेले पत्र :
१५ जून २०१९ ला अक्षता नाईक यांनी ARG ला एक रागात लिहलेले पत्र पाठवले, ज्यात त्यांनी लिहलेले मुद्दे :
१.अक्षता नाईक यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा ARG सोबत असलेल्या कॉन्ट्रॅक्ट (६.४५ कोटी रुपये ) मध्ये ५% धारणा दर होता. त्यांच्या म्हणण्यानुसार एकवर्षाचा कालावधी एप्रिल २०१८ मध्ये संपलेला असून
ARG कोणत्याही रूपाने अपूर्ण कामाचे पैसे कापू शकत नाही आणि ARG ने त्यांना द्यायची रक्कम ८१ लाख आहे ३९ लाख नाही जे ते दावा करत आहेत.
२.त्या म्हणतात वर्ग मुद्दामहून ला CPDL ( कंपनी) च्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत आणि आम्हाला ( त्यांच्या वारसांना) नाही कारण त्यांना माहित
आहे कि कंपनीच्या दोनीही डायरेक्टर्स नि (अन्वय आणि कुमुद) यांनी अर्णव गोस्वामी ला कंटाळून आत्महत्या केली आहे.

३.त्या पुढे जाऊन अर्णब वर दोष लावतात कि अर्णब मुद्दाम CPDL कडून नुकसानभरपाई करून घेत आहे कारण त्याला माहित आहे कि कंपनीचे दोनीही डायरेक्टर आता नाहीत.
४. अर्णब वर पुढे आरोप लावत त्या म्हणतात,"अर्णब ची लक्षणं सुवातीपासूनच नीच आणि CPDL ला फसवण्याचा होती"

५.त्या पुढे लिहतात ," आम्ही दोघीनी, अन्वय आणि कुमुद यांच्या आत्महत्येनंतर सहन केलेल्या कष्टाची तुम्हाला जण असताना सुद्धा तुम्ही आमचे पेमेंट केले नाहीत आणि
आम्ही तुम्च्याकडे तेव्हाच आलो जेव्हा आम्हाला आमच्या सब काँट्रॅक्टर्स ने त्यांच्या मजुरांचे पेमेंट द्यायसाठी पैसे नाहीत आणि त्यांना पैसे लागत आहेत असे सांगतले. हे तुम्हाला सांगितले गेले होते, आणि तुम्ही मजुरांची पेमेंट दिली याचे कारण तुम्हाला लक्षात आले कि लेबर कायद्याच्या
अंतर्गत तुम्हाला क्लीन चिट मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही घाईघाईने हे पत्र(पत्र १) लिहून स्वतःला निर्दोष आणि स्वच्छ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे"

६.त्या पुढे धमकी देत म्हणतात," पहिल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे एकतर्फी व्यवहार तुम्ही केले तर तुम्हाला
आणि अर्णब ला खटल्याचा सामना करायला मी भाग पाडेन आणि CPDL शी गद्दारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल"

या वेळेला अक्षता नाईक यांच्या भावनिक दृष्ट्या लिहल्या गेलेल्या पात्रातून बाहेर पडून न्यायचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
पहिल्यांदा लक्षात घेतले पाहिजे कि CPDL हि एक प्रायव्हेट कंपनी होती आणि प्रायव्हेट कंपनी कायम चालू राहते, अचानक डायरेक्टर च्या आत्महत्येच्या काही दिवस आधी बंद पडत नाही.
अक्षता नाईक इथे ठाम पणे सांगत आहेत कि CPDL कंपनी अकॉउंट मध्ये पेमेंट घेऊ शकत नाही आणि नुकसानभरपाई सुद्धा देऊ शकत नाही म्हणून ARG ने थेट पैसे सब काँट्रॅक्टर्स ला द्यावेत. पण हे खरे नाही !
हि केस प्रचंड किचकट केस आहे कारण एकाच वेळेला दोघंही डायरेक्टर चा मृत्यू झाला आहे, जर कोण्या एकाच धरून चला आईचा मृत्यू झाला असता तर अन्वय (मुलगा) कंपनीचा मुख्य डायरेक्टर झाला असता आणि ANUAL MEETING बोलवून दुसऱ्या डायरेक्टर ची नेमणूक करण्यात आली असती.
पण इथे दोघांचाही मृत्यू झाला असल्या कारणाने हि केस हाताळायला दोन कायदेशीर मार्ग आहेत.
पहिला मार्ग : अन्वय नाईक यांचे वारस (आद्या आणि अक्षता) यांनी कंपनी ला ते अन्वय यांचे वारस आहेत हे सिद्ध करणारे पुरावे देणारे पत्र लिहावे,
त्या नंतर कंपनी अन्वय नाईक यांच्या नावाने असलेले शेअर्स या दोघींकडे सुपूर्त करतील, एकदा शेअर सुपूर्त केले कि कंपनीला Extraordinary General Meeting (EGM) बोलवावी लागेल ज्यात दोन नवीन डायरेकटर्स ची नियुक्ती करावी लागेल
ज्या नंतर ते बँकेकडे जाऊन बँक अकाउंट स्वतःच्या ताब्यात घेऊन थकबाकी असलेले पैसे या खात्यात स्वीकारू शकतील.

दुसरा मार्ग :जर कंपनी वर खूप मोठं कर्ज असेल आणि अक्षता आणि आद्या नाईक यांना त्यात कोणत्याही प्रकारची भागेदारी नको असेल तर त्यांनी काहीही न करता
कंपनीला पैसे दिलेले लोक जो पर्यंत कोर्टाकडे जात नाहीत तो पर्यंत शांत बसावे.या प्रसंगात, कायदेशीर वारसांनी आमचं याच्याशी काहीही देणं घेणं नाही असं म्हणून सुद्धा स्वतःचे नाव बाजूला करून घ्यावे.
जर कंपनी कडे कर्ज मिटवण्यासाठी मालमत्ता नसेल तर त्यांनी कोर्ट त्यांना ROC अकॉउंट ओपन करायला सांगेल आणि कंपनीला ज्यांनी म्हणून पैसे द्यायचे आहेत त्यांच्याकडे जाऊन कर्ज मिटवण्याची प्रक्रिया चालू करता येईल.
म्हणजे कोणत्याही मार्गाने आद्या आणि अक्षता नाईक अन्वय नाईक संबंधातील पैसे स्वतःच्या अकॉउंट मध्ये जमा करू शकणार नाहीत, कायदेशीर वारस असले तरी.जर त्यांनी पहिला मार्ग अवलंबला असता तर पैसे कधीच मिळाले असते.दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला असता तर त्यांनी कंपनीवरील कर्ज पण मिटवले असते.
पण अक्षता नाईक यांना कायदेशीर मार्ग स्वीकारायचा नव्हता आणि त्याना पैसे थेट त्यांच्या अकाउंट मध्ये हवे होते किंवा ARG ने थेट सब काँट्रॅक्टर्स चे पैसे द्यावेत असे हवे होते जे दोनीही बेकायदेशीर मार्ग होते.थोडक्यात नाईकांना कंपनीचे डायरेक्टर व्हायचे आहे,
त्यांना त्यांचे पैसे हवे आहेत पण कंपनी वर असलेल्या कर्जाचा बोजा स्वीकारायचा नाहीये जे बेकायदेशीर आहे.
अक्षता यांच्या म्हणण्या नुसार अर्णब ने जर अन्वय यांना आत्महत्या कार्य्ण्यास प्रवृत्त केले असते तर पोलिसांना एकतारी पुरावा सापडला असता परंतु तसे काहीही आढळून आलेलं नाही
पण आधी दिलेल्या क्लोजर रिपोर्ट मध्ये सांगितले आहे आणि या बद्दल अजून खुलासे खाली होतील.....

पत्र ४ : ६ नोव्हेंबर २०१९ , ARG ने अक्षता यांनी केलेल्या आरोपांचे खंडन.
हे पत्र ARG ने अक्षता आणि आद्या नाईक यांना ६ नोव्हेंबर ला पाठवले होते,
ज्या १५ जून ला पाठवलेल्या पात्रातील प्रत्येक आरोपावर एक एक करत उत्तर दिले होते.

पत्रानुसार ARG ने CPDL सोबत 10/12/2016, 8/03/2017 आणि 26/05/2017 ला वर्क ऑर्डर दिल्या होत्या,कॉन्ट्रॅक्ट ARG आणि CPDL मध्ये असल्यामुळे कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीला ते पेमेंट देऊ शकणार नाहीत,
थेट CPDL सोडलं तर. पुढे असे नमूद केले आहे कि अन्वय आणि कुमुद यांच्या मृत्यू नंतर नवीन डायरेक्टर नेमण्याची कोणतीही प्रक्रिया केली गेली नाहीये. अनेक याचना करून सुद्धा असे लक्षात आले की दोनीही नाईकांना 'या कंपनीचे शेअर होल्डर अथवा स्टेक होल्डर होण्यात कोणताही रस नाही.
आत्ता उद्भवलेली परिस्थिती तेव्हाच सोडवता येईल जेव्हा CPDL नवीन डायरेकटर ची नेमणूक करेल जे ARG च्या कंट्रोल मध्ये नाही"

याच वेळेला ARG नाईकांना सांगतात कि अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या विरुद्ध केलेल्या
बदनामीकारक उद्गार काढण्याची गरज नव्हती.
पहिली गोष्ट कि फक्त अर्णबच एकटा आरोपी नव्हता तर तिघे होते आणि दुसरी गोष्ट अर्णब ला पोलिसांनी निर्दोष सिद्ध केले आहे.

अक्षता यांनी नमूद केलेला 'DEFECT LIABILITY ' चा दावा पूर्ण पणे खोटा आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये असे काहीही नमूद केलेलं नाही.
या पत्रात पुढे लिहले आहे कि ८८ लेखावरून ३९ लाख हि रक्कम आम्ही मुद्दाम कमी करत आहोत हा आरोप देखील खोटा आहे कारण मागे अन्वय आणि कुमुद यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या कामाची रक्कम बाजूला काढून न केलेल्या
कामाची रक्कम देण्याचे ठरले होते आणि हे तुम्हाला माहित नाही कारण तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही नव्हता.

अन्वय आणि कुमुद यांच्या मृत्यूच्या आधी ARG आणि अक्षता/आद्या नाईक यांच्या कोणत्याही प्रकारची बैठक झाली होती हा दावा देखील पूर्णपणे खोटा आहे,
आणि म्हणून त्यांना आधी ठरल्याप्रमाणे पेमेंट हि CPDL च्या अकाउंट मध्येच करावी लागणार होती आणि तिऱ्हाईत व्यक्तीच्या नाही.CPDL चे सब काँट्रॅक्टर्स ARG विरोधात कायदेशीर ऍक्शन घेणार आहेत हा दावा केला आहे तोहि खोटा सिद्ध करत ARG म्हणतात सब कॉन्ट्रॅक्टर स्वतः त्यांच्याकडे गेले होते
आणि त्यांनी तुमच्या अर्थात अक्षता/आद्या नाईक यांचा हा मुद्दा न सोडवण्याचा दृष्टिकोन पाहून आमच्याकडे पेमेंट मागितली. ARG ने आधीच ५.२० कोटी रुपयांची पेमेंट केली आहे आणि म्हणून ARG ला CPDL ला फसवायचे आहे असा दावा सुद्धा खोटा आहे.
आत्महत्येस प्रोत्साहन आणि अर्णब गोस्वामी :
१. आत्ता पर्यंत पाहिलेल्या गोष्टींच्या आधारावर आपण एक गोष्ट निश्चित सांगू शकतो कि ज्या दिवशी अन्वय आणि कुमुद यांचे मृतदेह आढळले त्याच दिवशी FIR दाखल केली होती तर मग अक्षता नाईक असं का म्हणाल्या कि अ
अर्णव चे नाव ऐकताच पोलिसांनी FIR रजिस्टर करायला नकार दिला ? आणि लगेचच थोड्यादिवसात ८ तारखेला पोलीस स्वतः अर्णब च्या ऑफिस वर त्याच्या चौकसशी साठी गेले होते.
वरील दावा आद्या आणि अक्षता या दोघीनी अनेक वेळेला केला आहे पण तो वेळोवेळी खोटा आहे हे पोलीस रिपोर्ट च्या आधारावर सिद्ध झाले आहे.
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: