फडणवीस चुका मान्य करा..
होय फडणवीस आपण नुसतेच अपयशी मुख्यमंत्री नाही तर अपयशी राजकारणीसुद्धा आहात..
कारण..
● आपण नगरसेवकापासून अगदी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतलीत पण कधी कोणाची जात काढली नाहीत कि कोणावर वैयक्तिक टीका केली नाहीत. असं कोणी करतं का?
● नैसर्गिक आपत्तीवेळी आपण +
घरात बसून केंद्राकडून पैसे हवेत असा घोष लावला नाहीत जरी आपल्याच पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी. उलट कायद्यात बदल करून नुकसानभरपाईची रक्कम वाढवून संबंधितांच्या खात्यात वर्ग केलीत. असं कोण करतं? जनतेला आशेवर झुलत राहायची सवय आहे. तसंच झुलवत ठेवायचं असतं देवेंद्रजी. +
हेच आपल्या राज्याने आत्तापर्यँत पाहिलंय आणि द्यायचं म्हटलंच तर रुपायातले १०-२०पैसे फेकायचे काही जणांच्या तोंडावर उपकार म्हणून.. तेही आपल्याला जमलं नाही.
● मुख्यमंत्री झाल्यावर बायकोला चार भिंतीच्या आडच ठेवायचं असतं. तिचं स्वतंत्र अस्तित्व नाकारायचं असतं, हा ह्या पुरोगामी +
महाराष्ट्रातील काही अतिहुशार विचारवंतांनी ठरवून दिलेला नियम आपण मोडलात. अजून मोडताय..
● टीका ही वरवरचीच करायची असते. त्याला अभ्यासाची जोड द्यायची नसते. वडाची साल पिंपळाला जोडून जर टाळ्या मिळत असतील आणि चहा-बिस्कीटवाले खुश होत असतील तर तेच करायचं असतं. हे बाजूला ठेवून, +
अभ्यासपूर्ण वक्तव्याची माळ लावून, आपण अजून एक गंभीर चूक केलीत. त्यातही खंड अजून नाही पडलेला.
● २०१४ पर्यंत दरवर्षी भारनियमन नित्यनेमाने आम्ही अनुभवले. किंबहुना आता त्यात खंड पडणार नाहीत अशीच आमची मानसिकता असताना आपण एका रुपयाचा वाढीव भार नं लावता हे भारनियमन कमी कसं केलं? जे
इथं अर्धशतक राजकारणात घालवून ज्यांना जमलं नाही ते आपण केलंत, ही अजून एक मोठी चूक.. आशेवर जनतेला झुलवायचं असतं, ती आशा पूर्ण नं करता..
● एवढे प्रकल्प, एवढ्या योजना आपण एवढ्या पारदर्शी पद्धतीने केल्या कि त्याचा इतर संबंधितांना भयंकर त्रास व्हावा?.. पुरावे हातात नाहीत, किंबहुना +
ह्या अश्या गोष्टींचे पुरावे नसतात म्हणून कोणाची नावे घेता येत नाहीत.. ह्या त्रासाचे काय?
● मराठवाडा, विदर्भ हा बाय-डिफॉल्ट दुष्काळीच आहे. हा तिथल्या जनतेचा फॉल्ट आहे. तिथे पाणी येऊच शकत नाही, तिथली परिस्थिती बदलूच शकत नाही, असे आत्तापर्यँतच्या शेतकऱ्यांचा तथाकथित कैवार +
घेणाऱ्या सरकारांचे म्हणणे असताना आपण "जलयुक्त शिवारामार्फत" तिथल्या लोकांच्या मनात आशेची किरणं जागवलीत, ह्यापेक्षा तर मोठी चूक असूच शकत नाहीये.
● देवेंद्रजी तुम्हाला सूड उगवता आला नाही.
● देवेंद्रजी तुम्हाला संस्थांना तुमच्या मनाने पाहिजे तसं, प्रसंगी कायद्याला वाकवून, वागवता +
आलं नाही.
● गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही म्हणत होता की "मी परत येईन". हे कितपत योग्य? जिथे इतर पक्ष केवळ मोक्ष मिळवण्यासाठीच निवडणूक लढवतात. पवारसाहेबांचे अध्यात्मिक राजकारण तर त्रिखंडात प्रसिद्ध आहे, प्रसंगी ते भिजलेसुद्धा. त्यामध्ये निवडणूक जिंकून परत येण्याचा +
लवलेशसुद्धा नव्हता नै? ठाकरे आणि गांधींबद्दल तर काय बोलावं? त्यांच्याबद्दल बोलताना मराठी भाषेतले ४८च्या ४८ वर्ण सुद्धा कमी पडतात, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
● राज्यातले चॅनेल्स तुमच्या विरोधात आग ओकताना त्यांना कुठे अडकवावे, असे आपण काही केल्याचे ऐकिवात नाही.+
किती चुका दाखवून देऊ अजून? हातात भिंग घेतले तर अजून कोपर्या कोपर्यात पडलेल्या चुका नक्कीच दिसतील.
"बहुमताने निवडून दिलेली युती" ही जनतेने निवडून दिलेली नव्हती तर त्यात मोडतोड करून "तीन पायांचे सरकार हा खरा जनतेचा आशीर्वाद" असतो. हे तुम्हाला कळत नाही, म्हणून कोरोनाच्या महामारीत +
आपण राज्यभर दौरे काढत होता. राज्याने पैसे कसे उभारावे ह्यासंदर्भातले कायदे, योजना, वेगवेगळे मार्ग आपण अजून सुचवता. त्याकडे घरकोंबड्याने का लक्ष द्यावे?
असल्या चुका जनता उघड्या डोळ्याने पाहात आहे. त्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.. किंबहुना अधून मधून येत असेलच..+
बाकी काही हुशार, तत्वज्ञ, तटस्थ, विचारवंत, लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा वगैरे वगैरे असणाऱ्या जाणकार विश्लेषकांना ह्या पोस्टमध्येसुद्धा आपले कौतुकच दिसेल म्हणा. कदाचित त्यांना आपल्या अजून "असल्या" चुका माहित असतील.
बाकी.. देवेंद्रजी, ह्या चुका आपल्यापर्यंत किती पोहोचतील हे माहित नाही+
तरीही हे इथे लिहिण्याची एक चूक मी करत आहे..

धन्यवाद,
चेतन दीक्षित
You can follow @chetandixit9.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: