आज #जागतिक_संगीत दिनानिमित्त एक #थ्रेड

मागच्यावेळी आपण तबल्यातील #घराणी व त्यांचा इतिहास पहिला होता.
आज आपण #गायन_प्रकार कोणते ते बघू.
१)गजल
२)ठुमरी
३)ख्याल
४)ध्रुवपद
५)भजन
६)तराणा
७)होरी
८)चतुरंग #म #मराठी
@MarathiRT #रिम

गजल म्हणजे काय?
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten"> https://twitter.com/Shivrajjadha_v/status/1274621862090346497">https://twitter.com/Shivrajja...
१)गजल:- हा पारशी /उर्दू भाषेतील गीत प्रकार आहे.शृंगार हा गझलचा प्रमुख रस आहे. प्रेमिकांचे प्रेम उद्गारhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="❤" title="Rotes Herz" aria-label="Emoji: Rotes Herz">, विरहhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="💔" title="Gebrochenes Herz" aria-label="Emoji: Gebrochenes Herz"> ,दुःख इ.भाव यात असतात.गझल मध्ये अर्थ दडलेला असतो. ही गीते पश्तो, दीपचंदी इ.तालात गायली जातात.तसेच काफी,खमाज,पिलू इ.रागात गायली जातात. तुम्हाला आवडणारी एखादी गजल https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
कंमेन्ट मध्ये सांगू शकता.

२)ठुमरी:- शृंगार रसात गायली जाते.प्रतिष्टीत समाजाने याला दुयय्म लेखले आहे.पूर्वी श्रेष्ठ कलाकार मोठ्या कार्यक्रमात गात नसत.
तवायफसारख्या संगीत व्यावसायिक स्त्रिया प्रामुख्याने ठुमऱ्या गात.ठुमरी गायन हे तसे कौशल्याचे काम असते.दिपचंदी,अद्धा या तालात.
३)ख्याल:-जैनपुरचा सुलतान हुसेन शर्की याने प्रथम या गायनास लोकप्रियता मिळवून दिली. तसेच सदारंग-अदारंग या गायकांनी ख्यालच्या हजारो रचना केल्या.ख्याल गायकी रंजक व डौलदार असून विस्तारक्षम असते.यात अस्तई व अंतरा हे दोन भाग असतात.विलंबित त्रिताल, एकताल, तीलवाडा झुमरा इ.तालात गातात.
४)ध्रुवपद:-हा एक प्राचीन,भारदस्त व शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त गीतप्रकार आहे.याचा उगम निश्चित पणे सांगता येत नाही.
मात्र उत्तरेत साडेपाच वर्षांपासून हा प्रकार लोकप्रिय आहे.अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक हे या प्रकारातील होते तानसेन त्यापैकी एक. स्वामी हरिदासhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
बयजु मिया तानसेन,चिंतामणी मिश्र यांच्या रचना ऐकायला मिळतात.१२व्या शतकानंतर ख्याल गायनामुळे याला उतरतीकळा लागली. यात वीर,शृंगार,शांत रसाला प्राधान्य असते. भाषा उच्च दर्जाचे असते.चौताल,सुलफाक झंपा,तिव्रा, ब्रह्म,रुद्र, तालात गायले जाते.
५)भजन:- संतांनी लिहिलेले अभंग जेव्हा वैयक्तिक किंवा सामूहिक रित्या गायले जातात तेव्हा त्यास भजन म्हटले जाते.संगीताच्या माध्यमातून ईश्वराला भजने म्हणजे भजन. महाराष्ट्रातील हा एक पारंपारिक व अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे.भजनातून रागाचे कठोर पालन अपेक्षित नसते तर भाव महत्त्वाचा.
केरवा, दादरा धुमाळी अशा तालात भजने गायली जात असली तरी भजनी ठेका हा यातला सर्वात प्रमुख ठेका. संत ज्ञानेश्वर, नामदेव,एकनाथ तुकाराम,जनाबाई ,चोखा मेळा ,गोरा कुंभार, सावता माळी अशा महाराष्ट्र सोबतच कबीर सूरदास मीराबाई तुलसीदास इ. संतांनी असंख्य अभंग लिहिले आहेत.
६)तराणा:- १३व्या शतकात अमीर खुसरो निर्मिती केली असे मानतात.हा अर्थहीन शब्दांनी युक्त असा विचित्रपूर्ण गीत प्रकार आहे.अनेक ख्याल गायक हा प्रकार गातात.शब्दांना विशेष महत्त्व नसते.मैफीलीत चैतन्य निर्माण करण्यासाठी तराणा उपयुक्त असतो.बहादूर खा न्थुखा यांचे तराणे प्रसिद्ध आहेत.
७)होरी:- कृष्ण गोपिकांच्या लीलांचे वर्णन असते.धमार तालात गातात शब्दरचना उच्च दर्जाची नसते.हा एक अवघड गीत प्रकार आहे.दमदार बुलंद व मधुरआवाज उच्च दर्जाचे स्वरज्ञान यासाठी आवश्यक असते.होळी या सणाशी संबंधित आहे. प्रणयप्रधान, प्रियकराची आठवण श्रावणातील विरह या गीतातून प्रकट केला जातो.
८)चतुरंग:- या प्रकाराचे चार भाग पडत असल्याने असे नाव पडले आहे. पहिल्या भागात गीताचे शब्द असतात दुसऱ्या भागात तराण्याचे शब्द असतात तिसऱ्या भागात या रागात चतुरंग असेल त्याची सरगम असते व अंतिम भागात मृदुंगाचे बोल किंवा छोटीशी परन असते.
वरील प्रकारासोबतच टप्पा, त्रिवट हे देखील गायन प्रकार आहेत.(वरील माहिती संक्षिप्तरुपात पण महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.)
संदर्भ:-पुस्तके.
सर्वांगीण तबला- आमोद दंडगेhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
तबला-पं.अरविंद मुळगावकरhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
हिंदुस्थानी संगीत पद्धती-पं.भातखंडेhttps://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
व काही माझ्या पदविकेतील नोट्स.

समाप्त:-
You can follow @Shivrajjadha_v.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: