कांजूरमार्गच्या मिठागराची जागा आपल्याच मालकीची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला परंतु, मेट्रो कारशेड कांजूरला नेण्यास ३१ जुलैलाच होकार केंद्राने होकार दिला आहे. आता यु-टर्न घेतल्याने केंद्र सरकारची किंबहुना दुटप्पी #भाजप ची #महाराष्ट्रद्वेष्टी भूमिका उघड झालीच अखेर...
महाविकास आघाडी सरकारने आरे जंगलातील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईकर सुखावले... पर्यावरण प्रेमींनी आणि आरे वाचावा आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने देखील राज्य सरकारचे आभार मानले होते. मात्र याला खोडा घातला #महाराष्ट्रद्वेष्टीBJP ने...
मात्र आता भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण आता मोदी सरकारचीच पोलखोल झाली आहे. मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गला उभी करण्यासाठी मोदी सरकारने ३१ जुलैलाच अधिकृत होकार दिला होता. यासाठी मिठागर आयुक्तांना केंद्राच्या मंजूरीचं अधिकृत पत्रही देण्यात आलं होतं.
यासाठी मिठागर आयुक्तांना केंद्राकडून मंजूरीचं अधिकृत पत्र देखील देण्यात आलं होतं. तसेच कारशेडसाठी MMRDA सोबत सूचना देखील देण्यात आल्या होता. विशेष म्हणजे आठवडाभरात ४३.७६ हेक्टरच्या सर्व्हेचे आदेश देखील देण्यात आले होते.
आदरणीय मुख्यमंत्री #UddhavThackeray ji यांनी कारशेडसंदर्भात ११ ऑक्टोबरला निर्णय घेतला होता, पण त्याच्या काहीच दिवस पूर्वी केंद्राकडून कांजूरमार्गला कारशेड बनविण्याच्या विरोधात मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन याचिका दाखल करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार तसेच विधी आणि न्याय विभाग, जिल्हाधिकारीसुद्धा या माहितीपासून अनभिज्ञ होते... मुख्य म्हणजे उठसुठ पत्रकार परिषदा घेणारे भाजपा महाराष्ट्रचे प्रसिद्धीलोलुप नेत्यांनी बाळगलेली गोपनीयता...
या महत्त्वपूर्ण याचिकेबद्दल वाच्यता न करणेच पुरेसे बोलके आहे.. मनातले पाप स्वयंस्पष्ट!
#महाराष्ट्रद्वेष्टीBJP ने हे जाणीवपूर्वक केले असून मेट्रो कारशेड कांजुरमार्गला स्थलांतरित केल्याने मुंबईकरांना झालेला आनंद आणि मविआ चे यशच त्यांच्या डोळ्यात खुपले हे पुन:श्च सिद्ध झाले.
You can follow @AnaghaAcharya.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: