पुण्यात आलो तेंव्हा खिशात जास्त पैसे नव्हते पाच जण सांगुन सात जण राहायचो.
चाकण, तळेगाव, पिरंगुट, शिरवळ, भोसरी तल्या MIDC मधल्या सर्व सिक्योरिटी गार्ड लोकाना भेळ, वडापाव खाण्यासाठी कागद पुरवायचो त्याला अम्ही रेज्युमे म्हणायचो.
आमचा अपमान करून pmt कंडक्टर ना मनशांती मीळावी,त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा केवळ या उदात्त हेतुने PMT ने प्रवास केला.
कधीतरी भेळेचा कागद पुढे सरकला अणी अचानक जॉब लागला पहिला पगार 8000 सगळ कट होउन एखादी सुट्टी असेल तर हातात 6500 पर्यंत येत असत रुम भाड 1500 मेस 2000
रुम पासुन कंपानी बस पर्यंत जायला एक मित्र गाडीवर घेउन जात असे त्यामुळे पैसे वाचत असत मग रोज किंवा एक दिवसाआड नाश्टा करण्याची श्रीमंती आली.
रविवारी मेस ला सुट्टी असायची शेजारी एक हॉटेल होत हॉटेल गुरुदत्त
मित्राला त्याच मेन्यूकार्ड पाठ होत कोण किती रोटी खाणार हे ठरवल की प्रतेकी किती कॉंट्री एणार हे अधिच चेक केल जायच.
90 ते 100 पर्यंत यायची ती स्वतःला दिलेली ट्रीट होती.
ते दिवस कधी विसरणार नाही.
पुढे जॉब सुरु झाला रूटीन सुरु झाला एक दिवस मात्र आयुष्य थोड बदलल.
मेक्यानिकल कंपनी मधे मुली तश्या कमीच असतात पण ती जॉइन झाली.
तिला स्पेन ला जायची संधी घरच्या नकारामुळे हुकली म्हणुन किंवा माझ्याशी लग्न व्हायच होत म्हणुन.
घरचा विरोध म्हणुन आळंदी ला जाऊन लग्न केल
3100 रुपया मधे लग्न झाल अणी 1000 रूपयाचे फोटो.
पुढे एक वर्ष कंपनी पॉलीटिक्स मुळे तिथे काही कळु न देता सोबत राहण म्हणजे थ्रील होत नंतर तशी एक सिरियल पण आली.
माझी मुलगी जन्माला आली त्या दीवशी मी जॉब राजीनामा दिला अणी स्वत: चा बीजनेस सुरु केला.

मी मुळचा पुणेकर नाही माझे रेफरंसेस एवढे डिटेल नसतीलही.
पण विसर्जन मिरवणूकित नाचलोय
तिलक चा चाहा
पाहाटे स्वीकार चा नष्टा
सिंहगड, खडकवासला, goodluck,FC रोड काय काय नाव घ्यावीत

एक दिवस तिलक ला चाहा पित बसलो होतो तेंव्हा सहज म्हटल आपण नाटक करु सरळ भरत नाट्य ला गेलो तर तिथे भरत नाट्य स्पर्धे चे फॉर्म होते काहीच माहीत नसताना फॉर्म उचलला.
ग्रुप जमवला वाटल बैकस्टेज करु बाकी काही जमणार नाही पण डायरेक्टर ने स्क्रिप्ट हातात ठेवली

अणी वाच म्हणाला काही समजायच्या आत मी स्टेज वर होतो पुढे काही वर्ष मला कधी अपेक्षित नसलेल्या जगात वावरलो.
लक्ष्मी रोड जवळ गोगटे स्कूल मधे संध्याकाळी रिहर्सल चालायची
आजही कधी डेक्कन पासुन जाताना बस स्टॉप वर रिहर्सल संपल्यावर बसलेला पाठीवर बैग असलेला मी कधी कधी मला दिसतो.

पुण्यान सर्वकाही दील घर,जोडीदार, काम,आयुष्य

I came to pune as a kid full of dreams in eyes and fear in mind, Pune made me man,strong and gentle.
अस माझ साध आयुष्य त्यात कोणाला स्वारस्य असायच काही कारण नाही पण ज्या पुण्यान अधी थोरल्या छत्रपतींचे बोबडे बोल अणी नंतर शाहिस्तेखानाची किंकाळी ऐकली
बाजीराव पेशव्याची विजय मिरवणुक पाहिली
टीळकांची गर्जना ऐकली अणी सावरकरांनी पेटवलेली विदेशी कपड्यांची होळी बघितली
ते पुणे माझ घर आहे ही सुखावणारी गोष्ट आहे खरी
म्हणतात ना
heart is where the home is.
You can follow @aapalacolumbus.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: