॥ पारिजात वृक्ष ॥

पारिजात किंवा पारिजातक हे समुद्रमंथनातुन
निर्माण झालेल्या चौदा रत्नापैकी एक रत्न
आहे.समुद्र मंथनातुन पहिल्यांदा कालकुट
विष,नंतर कामधेनु गाय, उच्चैःश्रवा
घोडा,ऐरावत हत्ती,कौस्तुभ मणी, कल्पद्रुम
ग्रंथ,अप्सरा रंभा,लक्ष्मी,मदिरा,चंद्र , नंतर
पारिजात वृक्ष,पांचजन्य शंख,वैद्य धन्वंतरी,
शेवटी अमृत.यातील काही वस्तु असुरांनी तर
काही वस्तु देवांनी घेतल्या.

इंद्राने ऐरावत, रंभा बरोबरच, पारिजात वृक्ष
घेतला.पारिजात वृक्ष स्वर्गातील नंदनवनात
लावला.
या झाडाची फुले रात्री फुलतात.रात्री फुले तोडत
नसल्याने , सकाळी पुर्ण उमलून फुले खाली
पडलेली असतात किंवा झाड हलवून खाली
पडलेला फुलांचा सडा वेचण्याची पध्दत आहे.
अशी लाख फुले वेचुन, देवाला वाहण्याचा
संकल्प म्हणजे लाखोली वाहण्याचा संकल्प.
ही फुले, लक्ष्मी,भगवान शंकर यांना प्रिय आहेत.
हिंदीमध्ये हरसिंगार म्हणजे देवदेवतांचे
अलंकार असे म्हटले जाते.पारिजात हे सात
पाकळ्यांचे फुल आहे.या फुलांचा दांडा लाल
रंगाचा असतो.या झाडाखाली बसले असता
थकवा दूर होतोे.
.फुलांचा रस ज्वर आणि
वातरोगावर गुणकारी तर फुलांच्या काढ्याने
कंबरेचे दुखणे नाहीसे होत.पारिजाताला प्राजक्त,शेफाली अशीही नांवेही
आहेत.पारिजात हे असे एकमेव फुल आहे ,
की जे जमिनीवर पडले असले तरी,
जमिनी वरून उचलल्यानंतर देवांना अर्पण
केले जाऊ शकते.
स्वर्गातुन पृथ्वीवर आलेली एकमेव वस्तु म्हणजे ,
पारिजात वृक्ष. तो पृथ्वीवर कसा आला त्याची
गोष्ट अशी....
पारिजातकाचे फुल स्वर्गातुन प्रथम नारदांनी
आणले व श्रीकृष्णाच्या कडे घरी भेटायला गेले
असताना ,श्रीकृष्णांना दिले.श्रीकृष्णांनी शेजारी बसलेल्या रुक्मीणीला दिलं
रुक्मिणीला ते फुल
फार आवडले.ही गोष्ट नंतर सत्यभामा समजली.
तिने या फुलाचे झाड आणण्याचा,हट्ट
श्रीकृष्णाकडे केला. श्रीकृष्ण स्वतः स्वर्गात
पारिजात वृक्ष आणण्यासाठी गेले.इंद्रानी वृक्ष
द्यायला नकार दिला.शेवटी आदितीने मध्यस्थी
करून इंद्राला पारिजात वृक्ष ,
श्रीकृष्णाला
द्यायला सांगितला.इंद्राने वृक्ष दिला,पण देताना
या वृक्षाला फळे येणार नाहीत असा शाप दिला.

श्रीकृष्णाने तो वृक्ष आणुन सत्यभामेला दिला.
रुक्मिणीच्या महालात गेल्यावर रुक्मिणीने
विचारले, मला तुम्ही पारिजातक वृक्षाचे एकच
फुल दिले, पण
वृक्ष सत्यभामेच्या दारात
लावला असे का?.श्रीकृष्णाने उत्तर दिले,तुला
वृक्ष कशाला हवा?,तो तेथेच बरा, फुले मात्र
तुझ्या अंगणात पडतील. हे ऐकुन रुक्मीणीचे
समाधान झाले.
या प्रसंगावर आधारित गदिमांनी लिहिलेलं
बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी?
हे सत्यभामेचं मनोगत , माणिक वर्मांनी,
आपल्या आवाजात सादर केलं आहे .
कृ ब निकुंभ यांनी सासरी असलेल्या व
माहेरुन आपल्याला कुणीतरी बोलवायला येईल
याची वाट पाहणा-या नवविवाहीतेची ,माहेरची
ओढ ,आईची आठवण
घाल घाल पिंगा वा-या या कवितेत
परसात पारिजातकाचे सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तु गडे ?
या गीतात सुंदर शब्दात मांडली आहे.विशेष
म्हणजे हे गाणं , सुमन कल्याणपुर व
कालिंदी केसकर यांच्या आवाजात ऐकायला
मिळतं.
You can follow @Amruta39117837.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: