हर्षद मेहता आणि स्टॉक मार्केटमधील सगळ्यात मोठा घोटाळा

हर्षद मेहता यांनी 1990 साली स्टॉक मार्केट मध्ये 4000 कोटीचा घोटाळा केला होता. हर्षद मेहता कोण होते? त्यांनी इतका मोठा घोटाळा कसा केला? हा घोटाळा कोणी व कसा उघडकीस आणला? हर्षद मेहता यांचे नंतर काय झाले? याबाबत हा धागा.. (1/n)
*हर्षद मेहता कोण होते?

हर्षद यांचा जन्म गुजरातचा आणि बालपण मुंबईमध्ये गेले नंतर त्यांनी बी.कॉम चे शिक्षण मुंबईमधे पूर्ण केले. पुढची 8 वर्ष त्यांनी सिमेंट विकणे, हिऱ्यांचा व्यापार यासारखे अनेक उद्योगधंदे केले. त्यानंतर NIACL( New India Assurance Company ) मधे त्यांना नोकरी (2/n)
लागली, तिथे त्यांना स्टॉक मार्केटबद्दल कळाले मग ती नोकरी सोडून त्यांनी 1981 मधे एका ब्रोकरेज फर्ममधे मध्यस्ती म्हणून नोकरी मिळवली आणि इथून पुढे त्यांचा स्टॉक मार्केटचा प्रवास सुरु झाला. पुढच्या 3 वर्षात त्यांनी स्टॉक मार्केटमधले सगळे खाचखळगे समजून घेतले व 1984 साली भावासोबत
(3/n)
मिळून स्वतःची 'Grow More Research and Asset Management' ही ब्रोकरेज फर्म उघडली ज्यात ते त्यांच्या investors ला स्टॉक मार्केट मधल्या गुंतवणूकीबाबत सल्ला द्यायचे. 1990-91 ला हर्षद मेहता हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते, त्यावेळेस त्यांना 'The Big Bull', 'स्टॉक मार्केटचा (4/n)
अमिताभ बच्चन' असे लोक म्हणायचे, मुंबईत 12 हजार sq.ft घर, आलिशान गाड्या अशा प्रकारच एखाद्या सेलिब्रिटीसारख त्यांचं राहणीमान होतं.

*हर्षद यांनी हा घोटाळा कसा केला ?

ज्यावेळेस सरकारला काही पैशांची गरज भासते त्यावेळेस ते एका ठराविक कालावधीसाठी 'government securities' (5/n)
#म #रिम
काढतात,जे लोक हे खरेदी करतात त्यावर त्यांना ठराविक व्याज भेटते व नंतर तो कालावधी संपल्यावर सरकार त्या सिक्युरिटीज पुन्हा खरेदी करते. या सिक्युरिटीजमध्ये बँकांना विशिष्ट प्रमाणात पैसे गुंतवणे बंधनकारक होते. ज्यावेळेस एखाद्या बँकेला पैश्यांची गरज असायची त्यावेळेस त्यांच्याकडे (6/n)
असणाऱ्या सिक्युरिटीज ते दुसऱ्या बँकांना देऊन त्याबदल्यात पैसे घ्यायचे,
या व्यवहारात एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे जमा केल्यावर त्यांच्याकडून 'BR(Bank Receipt)' घ्यायची, या सगळ्या व्यवहाराला Ready Forward Deals (RFD’s) म्हणतात. या सगळ्यात ब्रोकर हे मध्यस्थ म्हणून काम करायचे (7/n)
म्हणजे ज्यांना सिक्युरिटीज विकायची आहेत अशा बँकांसाठी खरेदीदार शोधणे आणि ज्या बँकांना सरकारी सिक्युरिटीज खरेदी करावयाच्या आहेत त्यांना विक्रेते शोधणे ही त्यांची भूमिका होती. हर्षद हे त्यावेळेस नामांकित ब्रोकर होते, याच गोष्टीचा त्यांनी गैरफायदा घेतला. समजा बँक 1 ला त्याच्या (8/n)
सिक्युरिटीज विकायच्या आहेत आणि बँक 2 ला या सिक्युरिटीज विकत घ्यायच्या आहेत, आता हर्षद बँक 1 कडे जाऊन त्यांची सिक्युरिटीज घेऊन खरेदीदार शोधण्यासाठी वेळ मागत असे. त्याचप्रमाणे तो बँक 2 कडे जाऊन त्यांचे पैसे घेई आणि सिक्युरिटीज विक्रेता शोधण्यासाठी वेळ मागत असे. आता हर्षद पैसे (9/n)
तसेच सिक्युरिटीज काही दिवस स्वतःकडे ठेवायचे. पुढे हर्षद यांनी बँकांना खोट्या Bank Receipt देण्यास सुरुवात केली. हा सर्व पैसा ते खूप आक्रमकरित्या एकाच शेअरमधे टाकून त्याला वर नेत व एकदा का त्याची किंमत खूप वर गेली की ते शेअर विकून त्यातून भरपूर नफा मिळायचे आणि दोन्ही (10/n)
#मराठी
बँकामधला व्यवहार नंतर ते पूर्ण करून द्यायचे. हे करताना त्यांनी ACCचा शेअर एका वर्षात 200 वरून 9000वर नेऊन ठेवला होता. बाजार जोपरंत वरच्या दिशेने जात होते तोपर्यंत त्यांनी यात बक्कळ पैसा कमावला पण जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला त्यावेळेस बाजार खालच्या दिशेला गेले ज्यात हर्षद (11/n)
यांना खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना बँकांना त्यांच्या पैशांची परतफेड करता आली नाही.

*घोटाळा कोणी व कसा उघडकीस आणला?

23 एप्रिल 1992 रोजी पत्रकार सुचेता दलाल यांनी टाईम्स ऑफ इंडिया मधे लेख लिहून हा घोटाळा जगासमोर आणला. या बातमीमुळे पुढच्या एका महिन्यात सेन्सेक्स (12/n)
4467 अंकावरून 2529 अंकांवर घसरला ज्यात गुंतवणूकदारांचे अंदाजे 100,000 कोटी रुपये नाहीसे झाले.

*हर्षद मेहता यांचे नंतर काय झाले?

9 नोव्हेंबर 1992 रोजी हर्षद यांना CBI ने अटक केली. त्यांच्यावर 600 दिवाणी कारवाईचे खटले आणि 70 फौजदारी खटले दाखल झाले. SEBI ने त्यांना शेअर (13/n)
बाजारात व्यवहार करण्यास आजीवन बंदी घातली, त्यानंतर त्यांना कारागृहात नेण्यात आले. तिथून आल्यानंतर हर्षद यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिम्हा राव यांच्यावर निवडणूकीवेळी पक्ष देणगी म्हणून 1 कोटी रुपये घेतल्याचे आरोप केले जे नंतर CBIने खोटे (14/n)
ठरवले. हर्षद यांना बऱ्याचदा त्यानंतर तुरुंगात जावे लागले आणि शेवटी ठाणे कारागृहात 31 डिसेंबर 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. (15/n)
या घोटाळ्यावर सुचेता दलाल यांनी 'The Scam' हे पुस्तक लिहिले ज्यावर आधारित असणारी 'Scam 1992: The Harshad Mehta Story' ही वेब सिरीज Sonyliv वर प्रदर्शित झाली आहे, ती एकदा जरूर बघा.
धन्यवाद..😊 (n/n)

@irajratna @MarathiDeadpool @Am_here_DURGA @T_Malvika @PranitP18191471 @Vedanti24
You can follow @TejasAthare.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: