ऑगस्ट १९९७ मध्ये प्रणती डेका या उल्फा दहशतवादी महिलेला अटक झाली. ती मुंबईत प्रसूतीसाठी आली होती तिच्या दोन साथीदारांसह. तिची इथली सर्व व्यवस्था केली होती टाटा टी ने. मग नंतर आसामच्या चहा मळ्यांमध्ये आपला व्यवसाय सुरळीत सुरू रहावा म्हणून टाटा टी व्यवस्थापन उल्फाला कशी मदत करतं
ही माहिती पुढे आली. फारसा गाजावाजा न होता प्रकरण दडपले गेले. नंतर अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी याच टाटा टी ने एक सामाजिक मोहीम चालवली - जागो रे. टीव्हीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात त्वेषाने उभे राहणारे तरुण यात चित्रित केले होते. फायदा कुणाला झाला?
टाटा ला सिंगूर मध्ये नॅनो साठी मिळालेल्या जागेवर वाद सुरू झाला आणि ममता बॅनर्जी यांनी मोठं आंदोलन उभं केलं स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी. गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक फोन कॉल केला आणि टाटांनी आपला प्रकल्प सानंद येथे नेला. केवळ धंदा सांभाळायचं
उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. गुजरातमधील जमीन फुकट होती, सिंगुरमध्ये शेतकरी वाजवी मोबदला मागत होते. मुंबईत करोनाची साथ सुरू झाली तेव्हा टाटांनी ताज हॉटेल पालिकेच्या डॉक्टरांसाठी खुलं केलं म्हणून आपण भारावून गेलो. प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव वेगळे आहेत.
इतर हॉटेल्समध्ये त्यांना मिळालेली वागणूक आणि ताज मधली वागणूक यात खूप फरक होता. बरं, ही हॉटेल्स फुकट वगैरे काही नव्हती. सरकारने नेमून दिलेले दर ताज ने घेतलेच. सारांश: टाटा धंदा करतात. Tanishk च्या वादानंतर कुणाचीही बाजू घेण्याआधी विचार करा. आपल्या भावना कुणालाही वापरू देऊ नका.
You can follow @WriterDeepak.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: