#Thread

"मंदिरं काय ? तुमची पोटं भरण्यासाठी चालू केलेली फॅक्टरी" असे वाक्य मी अनेक वेळेला अनेकांकडून ऐकले आहे,आता मला भटकंतीची आवड असल्यामुळे बऱ्याच मंदिरांमध्ये जाणं होतं आणि बऱ्याच गोष्टी निरीक्षणास येतात.एक एक करत किती लोक मंदिरावर अवलंबून असतात हे आपण पाहुयात.
(1/19)
आपण गाडी घेऊन जातो आणि पार्किंग ला लावताना एक माणूस तिथे बसलेला असतो,त्याच्या हाती आपण १० किंवा २० रुपये देऊन पावती फाडतो आणि आपली गाडी लावून पुढे जातो.धरून चला दिवसाला इथे ५०० गाड्या आल्या,म्हणजे ५०० गुणिले २० = १००००/- दिवसाचे,
म्हणजे महिन्याचे ३ लाख,सगळा खर्च वगैरे जाऊन त्याला त्यातून पगार मिळत असेल हे तर निश्चित? म्हणजे मंदिरामुळे पहिला लाभ झाला तो पार्किंग करून घेणाऱ्या माणसाला.गाडी लावून झाली कि आपण आत मध्ये चालत जाऊ लागतो,आजूबाजूला अनेक अनेक दुकाने दिसतात.
काही ठिकाणी देव देवतांच्या मुर्त्या विकल्या जात असतात तर काही ठिकाणी फ्रेम,काही ठिकाणी लहान बाळांची खेळणी तर बऱ्याच ठिकाणी दागिने सुद्धा. काही ठिकाणी स्वयंपाक घरातील सामान विकले जात असते तर काही ठिकाणी प्रसाद.
आता या सगळ्या गोष्टीकडे नीट लक्ष देऊन पहिले तर दिवसात येणाऱ्या १००० भाविकांपैकी १०० भाविक जरी इथे थांबून काही विकत घेऊन गेले तर कमीत कमी एक व्यापारी १००० रुपये तरी कमावेल,म्हणजे महिन्याला ३० हजार.
खर्च वगैरे सगळं जाऊन २०००० हजार त्या व्यक्तीला मिळत असतील ? म्हणजे दुसरा लाभार्थी झाला व्यापारी.
आता पुढे जात जात आपण येतो प्रसाद आणि मंदिरात लागणाऱ्या विविध सामानाच्या दुकानाकडे.
कोणी पेढे विकतं तर कोणी गाठी,काही जण फुलं विकतात तर काही जण तेल,मीठ,अंगारे,धुपारे,असे विकत असतात.म्हणजे हेही मंदिरामुळे लाभार्थी झाले ? बरोबर ! आता अशी अनेक मंदिरे आहेत जिथे पेढे विकणारे लोक परंपरेने दुकाने चालवतात,जमल्यास श्री कृष्ण पेढेवाले, नरसोबा वाडी ला जाऊन या.
आपण आपल्या हातात सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जात असताना,आपल्याला दिसतो तो चपरासी.आपण आपल्या आणि आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना घेऊन आलेल्या लोकांच्या चपला त्या व्यक्तीच्या हाती स्वाधीन करतो आणि १० ते १५ रुपये अशी पावती,देऊन पुढे दर्शनास जातो.
पुढे जात जात समोर येतात लहान मुलं ज्यांच्या हातात असतो गंध. ते आपल्या मागे लागतात गंध लावून घेण्यासाठी आणि न राहून आपण गंध लावतोच आणि आपल्याकडे असलेले १० ते १५ रुपये आपण त्यांना देतो.म्हणजे हेही मंदिरामुळे लाभार्थी झाले ?
आपण पायऱ्या उतरत किंवा चढत मंदिराच्या इथे पोहोचतो...
,पुढे सरकत सरकत आपण रांगेत लागतो,रांगेत लावण्यासाठी तिथे चार पाच गार्ड थांबलेले असतात, आता ते काही फुकट तर निश्चितच काम करीत नसतील,ते देखील पगारावर काम करतात,म्हणजे तिथे उभे असलेले गार्ड देखील या मंदिर परिसंस्थेचे लाभार्थी झालेच ना ?
आता आपण गाभार्या पर्यंत येतो,गाभाऱ्यात आपल्याला पुजारी/ब्राम्हण दिसतात,त्यांच्या हाती आपण देवाला अर्पण करायला आणलेल्या गोष्टी देतो,नमस्कार करतो आणि पुढे निघून जातो आणि कळत ना काळात आपण पेढे ज्या पाकिटतात आणले होते ते खाली टाकून देतो,आता इथे काम सुरु होते ते सफाई कर्मचाऱ्याचे ?
जो देखील पगारावर काम करत असतो ! म्हणजे हाही झाला मंदिराचा लाभार्थी ?
पुढे टेबल मांडून अजून काही लोक बसलेले असतात देणगीचे कागदपत्र घेऊन,ज्यांची इच्छा असते ते देतात,ज्यांची नसते ते नाही देत,आता दिलेली देणगी हि थेट ब्राम्हणाच्या पोटात जाते म्हणणार्यांनी
गार्ड,सफाई कर्मचारी,आत मध्ये बसलेला पुजारी यांचा पगार आणि ,त्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करायला लागणार खर्च,आजूबाजूच्या छोट्या मोठ्या मंदिरांची देख रेख,भाविकांना दिला जाणारा महाप्रसाद याचा विचार कधी केला आहे आणि अन्य गोष्टींचा कधी विचार केला आहे ?
आता एका ब्राह्मणाला किती पैसे मिळतात,हा प्रश्न जर तुम्ही एखाद्या तिथल्याच ब्राह्मणाला विचारला तर तो उत्तर देईल भाविक देतात तो शिधा आणि ट्रस्ट कडून मिळतो तो पगार,काही ठिकाणी पगार चांगले असतात पण बहुतांश ठिकाणी पगार हे १० हजार ते २५ हजाराच्या घरात असतात.
म्हणजे जेवढे सामान्य माणसे कमावतात तेवढाच ना ?
आपण दर्शन करून पुढे येतो,आपण आपली चप्पल घेतो,बाहेर पडतो,बाहेर पडल्यावर तासंतास थांबल्यामुळे भूक लागलेली असते आणि मग आपण मंदिराच्या परिसरातील एका हॉटेल मध्ये बसून खातो.म्हणजे तो हॉटेल मालक सुद्धा या मंदिर परिसंस्थेचा लाभार्थी झाला.
आता या सगळ्यात मंदिर म्हणजे फक्त ब्राह्मणांचे पोट भरण्याची फॅक्टरी आहे हे म्हणणे किती योग्य ठरेल ?
जे असे बोलतात ते बोलायचे म्हणून बोलतात पण अगदी बुद्ध विहार असो,शीख गुरुद्वारा असो किंवा जैन मंदिर असो तिथे देखील अश्याच रचनेमध्ये कार्य .
तर शेवट करताना पुन्हा एकदा पाहुयात कि मंदिरामुळे कोणाकोणाचा फायदा होतो ते?
गाडी पार्किंग वाला,फळ,प्रसाद,वस्तू विकणारे,चपरासी,गार्ड,पुजारी,सफाई कर्मचारी,मंदिराचा जीर्णोद्धार करणारा गवंडी आणि त्याचे सहकारी,गंध लावणारे मुलं,आणि हॉटेल मालक ! अजून कोणी राहिले असेल तर यात सांगा.
म्हणजे मंदिराचा लाभ हा चातुर्वर्णातील सगळ्या लोकांना होतो ना ? कि नाही ?
पण,मंदिर म्हणजे ब्राम्हणाचे पोट भरणारे कारखाने असे म्हणताना शंभर वेळा विचार करा !
आणि फक्त एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात अनेक मोठं मोठ्या देवस्थानांची विविध प्रकारची मदत केली,आता असं म्हणू नका ती मदत फक्त ब्राह्मणांपर्यंत पोहोचली ! उदाहरणं द्यायला अनेक आहेत,परंतु घोड्याला तळ्यापर्यंत मार्ग दाखवू शकतो,पाणी प्यायला नाही शिकवू शकत.
(19/19)
https://twitter.com/prahappy/status/1316239730053275649?s=20
https://twitter.com/AmolSiddham/status/1316239853902721025?s=20
https://twitter.com/DharnePrasad/status/1316243994112741382?s=20
https://twitter.com/D_Akshay_/status/1316360564080140288?s=19
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: