NDTV - दूसरी बाजू
भाग १.

२००९ लोकसभेचे निकाल लागले होते. एका मोठ्या मीडिया कंपनी च्या मालकाला एकाने मुलाखती मध्ये प्रश्न विचारला, या निकालानंतर मीडिया ने काय शिकले?. त्यावर उत्तर दिले की, गरिबी, बेरोजगारी इत्यादी मुद्यांवर लक्ष केंद्रित होत नाही कारण हे मुद्दे breaking news
सारखे खळबळजनक बनवता येत नाही.
हे सांगणारा त्या न्यूज चॅनेल चा मालक होता जो आज स्वतःला राष्ट्रीय हिताचे मुद्दे जसे बेरोजगारी, शिक्षा, गरिबी इत्यादीचे पैगंम्बर समजत सरकार सहित इतर मीडियाला दोष देतात. ज्यांनी ९० च्या दशकापासून देशात वादग्रस्त मुद्देच उचलून धरले
आणि पतिव्रता चे पदर ओढून जगत आहे. तो न्यूज चॅनेल आहे NDTV आणि तो मालक होता प्रणव रॉय.

देशात एकमेव tv चॅनेल होते, सरकारी दूरदर्शन. त्यावर दिवसातून 3 वेळ समाचार चालत. एका जागी बसून, दिवसभर घडणाऱ्या घडामोडी तोंडी सांगितल्या जात. नवे तंत्रज्ञान आलेले नव्हते. दिसून येते.
तशात विदेशातून शिकून एक बंगाली युवक भारतात येतो. नाव होते प्रनोय रॉय. काही वेळातच तो tv वर दिसू लागला. निवडणुकींचे भाकीत करू लागला. एकूणच निवडणूकींचे breaking news मध्ये रूपांतर झाले. सुत्रधार होता प्रनोय रॉय. पूर्ण देशाला मूर्ख बनवणाऱ्या राजकीय पक्षांना सुद्धा
मूर्ख बनवणारा उगवला होता.

प्रनोय रॉय म्हणजे JNU फेम, स्वयंघोषित गरिबांची आवाज, नक्षली हितेशी, कश्मीरी फुटीरतावाद्याची आवाज सुप्रसिद्ध वामपंथी अरुंधती रॉय चा चुलत भाऊ. त्याची पत्नी म्हणजे राधिका रॉय,
मार्कसवादि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची वामपंथी वरिष्ठ नेत्री वृंदा करात ची सखी बहीण. दोघांनी मिळून 1988 साली एका प्रोडक्शन कंपनी ची स्थापना केली नाव होते, NEW DELHI TELEVISION म्हणजेच NDTV. ह्याचे काम होते दूरदर्शन ला बातम्यां पुरवणे. आठवड्यात एकदा त्यांचा
the world this week हा शो सुरू झाला. वर्षभरात 1989 ची निवडणूक होती. त्यात पाहिल्यादा देशात NDTV ने लाईव्ह कव्हरेज सुरू केले. प्रनोय रॉय निवडणुकीचे विश्लेषण आणि भाकीत करू लागला. राजकीय पक्ष ह्या नव्या तर्हेने आश्चर्यचकित झाले. प्रनोय रॉय प्रसिद्ध झाला.
दूरदर्शन च्या भरवश्यावर, जनतेच्या पैसाने NDTV मोठी होत होती. अंदाजे त्याकाळचे 2 लाख रुपये त्यांना प्रत्येक शो साठी दिले जात होते. त्या काळी ही मोठी रक्कम होती. मात्र प्रनोय रॉय ने असे काही खेळ खेळले की कुणीही यावर बोलले नाही.
प्रनोय रॉय जन्मजात बुद्धिजीवी असेल यात दुमत वाटत नाही. NDTV उभे करताना त्याने एक हातखंडा वापरला. तो म्हणजे सर्व मोठ्या स्तरातील लोकांना जवळ केले. मग राजकारणी असो, नेते मंत्री असो, सेना मधले अधिकारी असो, IAS IPS असो, एकूण सर्वच थरातले मोहरे त्याने जमवले.
जे पुढे त्याच्या फायद्याचे ठरले. दूरदर्शन सोबत NDTV चे मस्त सुरू होते. त्यावेळी दूरदर्शन चे हेड होते, भास्कर घोष. ह्या भास्कर घोसेंच्या घरात सुद्धा मोठे नाव होते. त्यांच्या दोन बहिणी होत्या. एक अरुंधती घोष ज्या संयुक्त राष्ट्र मध्ये भारतीय प्रतिनिधी सहित अनेक उच्च पदांवर होत्या
आणि दुसरी होती रुमा रॉय ज्या सुप्रीम कोर्ट च्या न्यायाधीश होत्या. तर भास्कर घोष ची मुलगी आहे BBC , times of india, indian express, CNN-IBN मध्ये कार्यरत असलेल्या सागरिका घोष. जिचा नवरा आहे, राजदीप सरदेसाई. तेव्हा दूरदर्शन ने केलेल्या उपकाराची परतफेड करत,
प्रनोय रॉय ने भास्कर घोष च्या जावयाला म्हणजे राजदीप सरदेसाई ला 1994 मध्ये NDTV मध्ये जागा दिली. हा राजदीप तोवर times ऑफ india मध्ये पत्रकार होता. राजदीप NDTV मध्ये नंबर दोन बनला. इथे एक लक्षात घ्या की सर्व मीडिया ही कशी मोठ्या नावांशी जुडून असते. आजही सर्व मीडिया चाळले तर नेते,
मंत्री आणि beaurocrats शी सबंध मिळेल.

तेव्हा केंद्रात काँग्रेस ची सत्ता होती. काँग्रेस च्या हाताखाली सरकार आणि दूरदर्शन ने NDTV वर फार प्रेम ओतले. सरकारी पैश्यावर ndtv मोठी झाली. दूरदर्शन कडे सरकारी पैसे होते. स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून मीडिया चालवता आली असती.
मात्र दूरदर्शन त्याच रटाळ जगात जगत बसली आणि दूरदर्शनच्या भरवश्यावर, सरकारी पैश्यावर NDTV ने स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. सरकारी वरदहस्त चा फायदा घेत, विदेशी गुंतवणूकदार सुद्धा मिळवले. दरम्यान ndtv ने राजकारणी मंत्री नौकरशाह यांच्या नातेवाईकांना ndtv मध्ये
काम देने सुरू केले. ह्या मुळे NDTV चे हितसंबंध जपायला प्रनोय रॉय ला सोपे झाले. ह्या हितसंबंधांच्या मदतीने सर्व सिस्टम ला खेळवले गेले. Ndtv मधला प्रत्येक चेहरा हा मोठ्या नावांशी जडलेले दिसेल. Ndtv मध्ये काम मिळवायला हेच एक गुण बघितले जात की तुमची ओळख कुठवर आहे.
हे या त्यातले आजवरचे काही प्रसिद्ध नाव
बरखा दत्त - एअर इंडिया चे अधिकारी एस पी दत्त आणि हिंदुस्थान टाइम्स ची पत्रकार प्रभा दत्त ची मुलगी

अर्णब गोस्वामी - भाजप नेता आणि पूर्ण सैनिक मनोरंजन गोस्वामी चा मुलगा

राजदीप - वर दिलेले आहे.
सोनिया सिंग - काँग्रेस चे उत्तर प्रदेशातले मोठे नेते, मंत्री , खासदार आर पी एन सिंग च्या पत्नी

निधी राजदान-प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया च्या CEO ची मुलगी आणि ओमर अब्दुल्ला ची खास मैत्रीण म्हणून प्रसिद्ध.

असे अनेक चेहरे NDTV मध्ये आहेत ज्याचे सबंध मोठ्या नावांशी जुडून आहेत.
दरम्यान सरकारी मदत आणि हितसंबंधीच्या मदतीने मोठे आर्थिक हेरफेर करत प्रनोय रॉय श्रीमंत होत होता. ह्याच मदतीचा फायदा घेत, 1997 साली भारतात आपले पाय पसरू पाहणाऱ्या star tv आपल्या सोबत यायला भाग पाडले. Star tv कडे कुठलेच पर्याय नसल्याने,
त्यांनी ndtv शी हात मिळवले आणि star news ह्या tv news चॅनेल ची सुरुवात झाली.
त्याचा सोहळा सुद्धा थेट पंतप्रधान गुजराल च्या सरकारी निवासात पार पडला. किती ती पोहोच होती प्रनोय रॉय ची हे यावरुन दिसून येते.

सौजन्य: @marathimaaj85
भाग 2 लवकरच
You can follow @C_JackMH26.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: