मुली जन्मतः च परक्या नसतात त्यांना सोयीस्करपणे परकं वागवलं जातं..काही घरात ताटातल्या पोळी पासून सुरुवात होते ,काही घरं पोळी पासून जरी सुरुवात करत नसले तरी शिस्तीच्या
आडून आडून या गोष्टीं करतात,जगाला दाखवायचं बघा आम्ही मुलींना शिकवतो, पण कुठं शिकवायचं ,किती वर्षे शिकवायचं अन काय शिकायचं याचे हक्क मात्र काढून घेतात
"ती खपत नाही हो , तीचा रंग जर फिका आहे,फार जाड आहे मुलगी, उरकून टाकायचं ,चष्मा न चेहऱ्याचा शो जातो,लग्ना आधी एवढी तब्येत बरी नाही दिसत, किती वर्षे शिकणार,"आणि अश्या किती तरी रोजचे हे व्यवहारी जगाचे व्यवहारी टोमणे ऐकत असतो आम्ही..
अश्या किती तरी गोष्टीमुळं रोज परकी केली जाते मुलगी सोयीस्करपणे...आम्ही कधी मुलींवर हात उचलला नाही म्हणणारे मुलीच्या शब्दाला किंमत देतात??तीला स्कुटी घेऊन दिली म्हणणारे कारण न विचारता गल्लीच्या बाहेर तरी जाऊ देतात का ???
ज्या घरात तुम्ही जन्म घेतला त्या घरासाठी तुम्ही परके
असता ,मग ज्या घरात तुम्ही जाणार ते घर तरी कितपत आमचं असतं??"आम्ही आमच्या मुली सारखं समजतो तीला " या वाक्यवर तर माझा विश्वासच नाही, मुलीला स्वयंपाक येत नसेल ,साडी नेसणं,रांगोळ्या काढणं,अगदी गणपतीची आरती सुद्धा येत नसेल ,अश्या सुनेला मुलगी
सारखीच आहे असं कोणी म्हणून तीला कोणी संभाळून घेणार नाही आणि घ्यावं तरी का ? अपवाद असतील या सगळ्या गोष्टींसाठी काळ बदललाय म्हणतात,पण ज्यांच्या साठी हा काळ बदलला नाही त्यांच्या तरी वाट्याला आलेलं आयुष्यभराचं परकेपण अधून मधून डोके वर काढत असतं
आम्ही कुठं जायचं ,कधी यायचं ? कुणाशी बोलायचं,कसं बोलायचं काय घालायचं , सगळं ठरवणार ती लोकं, समाजआधी आमच्या घरातली लोकं ,ते ही संस्कार या नावा खाली,मुलीचं सुख नाही तीच्या संस्कार वर भर
असतो.या गोष्टी अन त्यात भर म्हणून महिन्याचे चार दिवस ,हा सगळा पसारा आवरल्यावर आमचा माणूस म्हणून struggle सुरू होतो.सवय होऊन जाते या आयुष्याची पण इतकंच वाटतं की हा सगळा परकेपणा जाणत्या वयात मिळाला असता तर बरं असतं
, लहान वया पासून जर ही संस्कारच्या लोणचं आमच्या आयुष्यत मुरवलं नसतं तर बरं झालं असत, या बाई असण्याच्या struggle चा शेवटचा बिंदू हा आमचा आमच्याच शरीरातल्या गर्भावर हक्क नसण्यापशी येऊन संपतो..
You can follow @MEENALE11.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: