हम कथा सुनाते है...
गोष्ट आहे एका खासदाराची जो तिसऱ्या वेळेस दिड लाख मतांनी निवडून येतो. भारतीय लोकशाहीच्या मंदिरात स्वतःच्या सन्मानासाठी तो तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना एक प्रश्न विचारतो की, 'हे सदन माझा स्विकार करायला तयार आहे का? अन्यथा मी बाहेर पडतो.'
गोष्ट आहे एका खासदाराची जो तिसऱ्या वेळेस दिड लाख मतांनी निवडून येतो. भारतीय लोकशाहीच्या मंदिरात स्वतःच्या सन्मानासाठी तो तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना एक प्रश्न विचारतो की, 'हे सदन माझा स्विकार करायला तयार आहे का? अन्यथा मी बाहेर पडतो.'

दि.12 मार्च 2007 स्थळ संसदेतील लोकसभा सदन.. गोरखपुर, उत्तर प्रदेशचे खासदार योगी आदित्यनाथ यांचे अश्रु समस्त देशाने पाहिले. कारण थ्रेडमध्ये योग्य क्रमाने देणारच आहे.
मराठी भैय्या म्हणतील, उथळ म्हणतील किंवा भक्त म्हणतील. या सर्व टिप्पणींना गृहित धरूनच थ्रेड लिहायला घेतलाय.
मराठी भैय्या म्हणतील, उथळ म्हणतील किंवा भक्त म्हणतील. या सर्व टिप्पणींना गृहित धरूनच थ्रेड लिहायला घेतलाय.

5 जुन 1972 साली फॉरेस्ट रेंजर असणाऱ्या मोहनसिंग बिश्त यांच्या घरी सात अपत्यांपैकी क्रमांक दोनचे अपत्य जन्माला आले. पाच वर्ष मोठ्या बहिणीच्या पाठीवर जन्माला आलेल्या मुलाचे नाव अजय मोहन बिश्त. चार भाऊ तीन बहिणी. सध्या उत्तराखंड मध्ये असणाऱ्या गढ़वाल जिल्हयात राहणारे हे कुटूंब.

हेमवतीनंदन बहुगुणा विद्यापीठात बी.एस्सी. मैथ्स च्या पदवी परिक्षेनंतर अजय सिंह बिश्त अचानक गायब झाले.1990 मध्ये श्रीराम जन्मभुमी आंदोलनातील समावेशाने अजय बिश्त यांना त्यांच्या पुढील जीवनाची दिशा मिळाली. गणितामध्ये हुशार असणारा अजय 1993 मध्ये सापडला पण..

योगी आदित्यनाथ म्हणून. मुंडण, भगवी कफनी आणि संन्यासी अवतारात. स्वतःच्या अस्तित्वाचं गिमीक सापडलेले. संन्यासी अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ. अक्षर ओळख करून देणारी आई आणि कुटूंबात सर्वात प्रिय असणारी जिने शिक्षण आणि इंग्रजी शिकणं सोपं केलं अश्या लाडक्या मोठी बहीणीची अवस्था..

काय झाली असेल आपण विचार करू शकतो.
1993 ला घरी येण्याचं कारण काय होते तर, संन्यास घेतल्यानंतर एकवेळ स्वतःच्या आईच्या हाताने भिक्षा ग्रहण करावीच लागते असा नियम आहे. आणि या नियमाचे पालन करण्यासाठी म्हणून तीन वर्षांनी योगीजी आईसमोर उभे होते. 'माते भिक्षां देही..' म्हणत.
1993 ला घरी येण्याचं कारण काय होते तर, संन्यास घेतल्यानंतर एकवेळ स्वतःच्या आईच्या हाताने भिक्षा ग्रहण करावीच लागते असा नियम आहे. आणि या नियमाचे पालन करण्यासाठी म्हणून तीन वर्षांनी योगीजी आईसमोर उभे होते. 'माते भिक्षां देही..' म्हणत.

अजय सिंह बिश्त ते योगी आदित्यनाथ पर्यंतच्या प्रवासात अ.भा.वि.प., राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रामजन्मभुमी आंदोलन आणि हिंदुमहासभेचे दोन महंत योगी अवैद्यनाथ आणि योगी दिग्वीजयनाथ यांचा संपर्क समाजाप्रतीची, देव, देश आणि धर्माप्रतीची ओढ अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.
वलयांकित

गोरक्षनाथ मठ गोरखपुरचे महंत योगी अवैद्यनाथ यांचे शिष्यत्व पत्करले व एक दिवस नाथ संप्रदायाची संन्यस्त जीवनाची दिक्षा घेऊन योगी आदित्यनाथ म्हणून नवीन जीवनाची सुरवात केली. हे सर्व एका क्षणात दिवसात झाले नाही. स्वतःच्या अस्तित्वाचं कारण शोधतांंना जिथे 'स्व' सापडतो तो क्षण महत्वाचा.

भाजप, संघ परिवार आणि गोरक्ष पीठाच्या अनेक दायित्वांना सांभाळत 1994 मध्ये हिंदु युवा वाहिनीची स्थापना करून आदित्यनाथांचे सामाजिक जीवन सुरू झाले. संघटन कौशल्य आणि जन्मजात बुद्धीमत्तेच्या जोरावर संपर्क वाढवणे सोपे झाले. महंत दिग्वीजयनाथ यांच्यानंतर 1998 साली गोरखपुर मधुन..

50 हजारांच्या फरकाने निवडून येणारे अवघ्या 26 वर्षाचे सर्वात तरूण खासदार म्हणून योगी आदित्यनाथ संसद भवनात प्रवेश करते झाले.
1998,1999,2004,2009,2014 असे सलग पाच वेळेस खासदार राहिलेल्या आदित्यनाथांचा भाजप मधील प्रवेश ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास सहज नव्हता. स्वतःला सिद्ध..
1998,1999,2004,2009,2014 असे सलग पाच वेळेस खासदार राहिलेल्या आदित्यनाथांचा भाजप मधील प्रवेश ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास सहज नव्हता. स्वतःला सिद्ध..

करत प्रसिद्ध केले आहे.अवघ्या 21 व्या वर्षी संन्यासी होण्याची उर्मी आणि हिंदु धर्मासाठी आयुष्य वाहणारे तरूण आदित्यनाथांनी प्रखर हिंदुत्वाची कास धरून केलेले संघटनात्मक काम भाजपाला परवडणारे नव्हते. 1996 मधील अवघ्या 13 दिवसांचं सरकार अनुभवलेल्या भाजपाने हिंदुत्वाची धार सौम्य केली..

होती. ताकही फुंकून प्यायचे होते आणि पक्षही सांभाळायचा होता, वाढवायचा होता. योगींना हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं होतं..आणि ज्या उद्देशाने देव,देश आणि धर्माच्या कार्यासाठी संन्यस्त जीवनाची दिक्षा घेतली तो उद्देशही साध्य करायचा होता.

22 ते 24 डिसेंबर 2006 भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, विहिंपचे अशोकजी सिंघल आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत योगींनी हिंदु युवा वाहिनीच्या समर्पित कार्यकर्त्यांच्या मदतीने विशाल संमेलन गोरखपचर मध्ये घडवून आणले व यशस्वी केले.

उत्तर प्रदेशात भाजपाचा कडवट हिंदुत्वाचा चेहरा उदयास आला तो असा. केवळ हेच नाही तर या संमेलनाआधी भाजपाच्या सौम्य हिंदुत्ववादी विचारांना प्रश्न विचारणारे कामही योगीजींनी केले होते गोरखपुर मधून 2002 च्या निवडणूकीत राधा मोहनदानदास अग्रवाल यांना निवडून आणले होते.कोणाच्या विरूद्ध..?

भाजपाचे कैबिनेट मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याविरूद्ध. एवढंच नाही तर 2007 च्या निवडणूकीत उ.प.विधानसभेसाठी भाजपा विरूद्ध 70 उमेदवार देण्याची तयारी दाखवली होती. 2006 च्या हिंदू संमेलनानंतर योगींची ताकत भाजपाला उत्तरप्रदेशमध्ये मजबुत करेल हा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला.

नेपाळी आणि माओवादी यांच्या संगनमताने देशात दहशतवादी करवाया होत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध केले पण तत्कालीन प्रशासनाने योगिजींवरच कारवाई करत त्यांना अटक केले. याच प्रसंगामुळे संन्यासी आणि कठोर दिसणारे योगीजी स्वतःचे अश्रु लोकसभेच्या सदनात रोखु शकले नाहीत. जो व्यक्ती एकाउदात्त..

भावनेने आयपीएल बघण्याच्या वयात देव, देश आणि धर्म यासाठी आजीवन संन्यस्त होण्याचा निश्चय करू शकतो त्यासाठी खासदारकीचे एक पद कस्पटासमान होते आणि आहे. पण अधर्माविरूद्ध लढण्यासाठी मार्ग सोडून जाणे हा योगिंचा स्वभाव नाही. त्यामुळे कोल्ह्या कुत्र्यांचे कधीही फावणार नाही.

2010 चे विराट हिंदु संमेलन ते 2017 चे स्टार प्रचारक. या काळात योगीजी त्यांच्या भाषणांमुळे, धडक स्पष्टवक्तेपणामुळे कायम विवादीत व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या अनेक भाषणांचे व्हिडीओ अव्हेलेबल आहेत त्यावरून योगिंच्या वैचारिक बैठकीची झलक दिसते. आवश्यक तेथे कठोर होतांना..

योग यत्किंचितही घाबरत नाहीत. 2010 मध्ये महिला आरक्षणास विरोध, एका हिंदु मुलीच्या धर्मांतर बदल्यात 100 मुस्लीम मुलींचे धर्मांतरण किंवा ए हिंदू मारला गेला तर.. 100 मुस्लीम......(हा पॉज तिथे असणाऱ्या गर्दीने पुर्ण केला होता. तुमच्या डोक्यातील उत्तरासह). ..

असे योगी आदित्यनाथ 26 मार्च 2017 रोजी भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनले. ज्या राज्याच्या पुर्वीच्या मुख्यमंत्र्याने शासकीय निवासातील नळाच्या तोट्या चोरून नेल्या त्या भामट्याच्या हातुन येणारे राज्य संपुर्ण रिकाम्या भिक्षापात्रासारखे योगींच्या हाती आले होते.

फक्त पक्षाने दाखवलेला विश्वास आणि स्वतःवर असणारा आत्मविश्वास या जोरावर योगींनी अनेक कामांमधून उत्तरप्रदेशला विकासाच्या मार्गावर आणण्याची करामत करून दाखवली. तिजोरीच्या खडखडातही 87 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पहिला मोठा निर्णय.
सर्वांना विजेचे समान वितरण हा दुसरा निर्णय.
सर्वांना विजेचे समान वितरण हा दुसरा निर्णय.

रोडरोमिओ स्क्वाड, मादक पदार्थ बंदी,गोमांस व गोहत्या बंदी, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 100 तासांचे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत काम करण्याची सक्ती, कुठलीही फाईल फक्त सात दिवसांत निकाली काढण्याची सक्ती अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून...

उत्तर प्रदेश एक उत्तम राज्य बनवण्यासाठी केलेले आणि करत असलेले प्रयत्न आपल्या समोर आहेतच. त्यांच्या कामांबद्दल बोलतांना तुम्हांला कोणी मराठी भैय्या म्हणत असेल तर ती योगींच्या कामाची पावती आहे हे लक्षात घ्या. 2014 पुर्वी आपण गुजराती होतो..आता भैय्ये आहोत. 'आप क्रोनॉलॉजी समझिये'

हाथरस प्रकरणात जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा योगींची प्रतिमा जेवढा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या कितीतरीपट उजळून निघेल.
योगींसारखा व्यक्ती ज्याने फक्त देव, देश, धर्म यासाठी स्वतःच्या परीवाराचाही त्याग केलाय त्यांना मुख्यमंत्री पदाचा मोह तो किती असणार..?
योगींसारखा व्यक्ती ज्याने फक्त देव, देश, धर्म यासाठी स्वतःच्या परीवाराचाही त्याग केलाय त्यांना मुख्यमंत्री पदाचा मोह तो किती असणार..?

पण ज्यांनी फक्त दुसऱ्या च्या श्रेयावर सत्ता मिळवली आहे त्यांना योगी समजणे लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त आपल्या धारणेशी कायम रहा. संन्यास्याच्या अश्रुंची किंमत कोणालाही परवडणारी नसते.
अंधाराशिवाय प्रकाशाच्या शलाकेचे महत्व काहीच नाही.
अंधाराशिवाय प्रकाशाच्या शलाकेचे महत्व काहीच नाही.

Pls read this following one which is more than me.
https://twitter.com/ArmyKaFan/status/1313791621398372353?s=19
@The_NitinD @pandehrushikesh @Amruta39117837 @RakyaDadoos_ @tweeple_rakesh @Nitin_vn46 @imMvyas @girishpophale5 @yuga_v108 @__aninda @pramodN5486 @PuneriKul1 @HCU39189639 @Vedashree_19 @AbePappi
https://twitter.com/ArmyKaFan/status/1313791621398372353?s=19
@The_NitinD @pandehrushikesh @Amruta39117837 @RakyaDadoos_ @tweeple_rakesh @Nitin_vn46 @imMvyas @girishpophale5 @yuga_v108 @__aninda @pramodN5486 @PuneriKul1 @HCU39189639 @Vedashree_19 @AbePappi