#Thread: हाथरस आणि राजकारण !

आपल्या देशातल्या लोकांची एक वाईट खोड आहे कि कोणत्याही बातमीचा पाठपुरावा करायचा नाही आणि त्यावर स्वतःचे निर्णय थोपवून द्यायचे आणि काहीही करून भाजप आणि RSS ला वेठीस धरायचं,नुकतंच हाथरस ची केस हे वरील वाक्याचे उदाहरण
(1/18)
.केस होताच,काही क्षणात योगी आदित्यनाथांवर,मोदींवर टीका करायला सुरवात केली आणि हळू हळू करत या संपूर्ण गोष्टीला जातीयवादी वळण दिले.ज्या क्षणाला या गोष्टीला जातीयवादी वळण दिले गेले त्याच ठिकाणी समजलं कि इथे काहीतरी खोट आहे,
(2/18)
कारण जातीयवाद हा एक असा हातचा आहे,जो काहीही ठोस केस नसताना,सहानभूती मिळवण्यासाठी वापरला जातो.जे त्या मुलीसोबत झालं ते वाईटच झालं,आणि ज्यांनी केले आहे त्यांना शिक्षा हि झालीच पाहिजे,पण त्या सोबत सत्य सुद्धा बाहेर आलं पाहिजे.
(3/18)
यात काडीचीही शंका नाही कि या संपूर्ण केस ला खतपाणी घातलं ते दलाल पत्रकारांनी,अनेक पत्रकारांचे ट्विट पहिले ज्यात #dalitlivesmatter हा हॅशटॅग दिसला आणि सगळ्या उच्च वर्णीय(तथाकथित) लोकांना शिव्या घालायला सुरवात झाली,पण हेच लोक मूगगिळून गप्प असतात,
(4/18)
जेव्हा असेच कृत्य एक तथाकथित शांतीप्रिय,अल्पसंख्याक व्यक्ती करतो.हळू हळू करत ह्या सगळ्या गोष्टी राजकीय गोटात पसरल्या आणि चिरतरुण राहुल गांधी आणि इंदिरांसारखे नाक असलेली प्रियांका घटना स्थळी पोहोचण्याचे नाटक करू लागले.
(5/18)
आता या गोष्टीचा विचार करावा,कि याना खरंच,त्या व्यक्तीच्या आणि तिच्या घरच्यांबद्दल सहानभूती आहे कि राहुल गांधींना पुन्हा एकदा launch करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे ?हे सगळं होत असताना,राहुल गांधी बरोबर गर्दीत गेले,त्यांच्या सोबत त्यांचे १० १५ फोटोग्राफर असतानाच बरोबर
(6/18)
,पडल्याचे नाटक केले,आणि तो क्षण त्या फोटोग्राफर ने टिपला.राहुल गांधींच्या PR टीम ला मानलं पाहिजे,कि अनेकांच्या मनात काही क्षणासाठी का होईना संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले,परंतु जेव्हा क्लिप बाहेर पडली तेव्हा यांचं सत्य सुद्धा बाहेर आलं.
(7/18)
या नंतरचा केविलवाणा प्रकार हा कि राहुल गांधींची लाला लजपत राय यांच्यासोबत तुलना ? कोणत्या दृष्टीने हा माणूस लाला लजपत राय यांच्या जवळ तरी येतो ? असो ! यात राहुल गांधींच्या चाहत्यांचा मूर्खपणा स्पष्टपणे दिसला.
(8/18)
TMC चे खासदार डेरेक ओ ब्रिन यांनी सुद्धा राहुल गांधींसारख्या स्टंट करायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांची PR टीम हि गांधींपेक्षा सरस ठरली नाही.आता विषय येतो,राहुल गांधींना जर खरंच एक माणूस म्हणून त्या हाथरस केस मधील मुलीची काळजी वाटत होती,
(9/18)
तर त्यांनी बालरामपूर मध्ये झालेल्या केस च्या घरच्यांना सुद्धा भेट दिली पाहिजे होती ? पण ती दिली का ? नाही ! कारण आता इथे कृत्य करणारा एक शांतीप्रिय समाजातील सुसंस्कृत मुलगा होता ! राजस्थान मध्ये जेव्हा अशीच एक केस घडली तेव्हा राहुल गांधी सोडा
https://twitter.com/balrampurpolice/status/1311364632125169670?s=20
(10/18)
पण काँग्रेस च्या कोणत्याही बड्या नेत्याने या गोष्टीकडे वळून पण पहिले नाही ! कारण एकच, तिथे राजकीय गुण गमावण्याच्या धोका मोठा होता कारण तिथे सरकार काँग्रेस ची आहे ! आता येउयात महाराष्ट्रात बसून योगींच्या नावाने खडे फोडणाऱ्या व्यक्तीला.
https://www.timesnownews.com/india/article/rajasthan-2-influential-youths-repeatedly-rape-19-year-old-girl-for-over-4-years/662151
(11/18)
टीका कराच,लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला तो हक्क आहे,परंतु निवडक टीका का? अश्या किती तरी केसेस महाराष्ट्रात रोज घडत आहेत,आणि हे मी नाही पण बातम्या सांगत आहेत. एक नाही तरी अनेक अनेक ठिकाणी या गोष्टी घडत आहेत,तेव्हा का नाही केली टीका ?
(12/18)
खरंच तुम्हाला अश्या व्यक्तींबद्दल सहानभूती असेल तर मग टीका सर्वत्र करा,सरकार मग ते कोणतेही असो,जाब विचारच,पण सध्याच्या राज्यसरकारच्या भीती मुळे तुम्ही प्रश्न विचारायचे टाळत आहात? कि तुम्हाला तुमची 'hairstyle ' जास्त प्यारी आहे ?
(13/18)
आज राज्यसरकारची एकही चूक दाखवली कि एक तर महाराष्ट्रद्रोही म्हणतात किंवा मग त्यांचे कार्यकर्ते 'आडनावावरून' शिव्या घालतात.एवढ्या सगळ्या केसेस महाराष्ट्रात घडल्या,पण एका तरी केस ची जबाबदारी राज्यसरकार CBI कडे सोपवली ?
https://www.opindia.com/2020/09/palghar-lynching-case-maharashtra-govt-submits-affidavit-in-sc-opposes-cbi-investigation/
(14/18)
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास नाही, पण सरळ सरळ पुढे दिसत आहे कि उत्तर मिळत नाहीये तर द्यायला पाहिजे होती ना CBI कडे चौकशी ! साधूंच्या केस बद्दलही तेच आणि इतर केसेस बद्दल सुद्धा ! प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष आवडतोच,परंतु तो पक्ष चुकत आहेत हे न सांगणं किती योग्य ?
(15/18)
हाथरस,बालरामपूर,राजस्थान,महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी आपल्या आया बहिणींवर बलात्कार होत आहेत,आणि या गोष्टीला राजकीय वळण देऊन चार राजकीय गुण मिळवण्यासाठी जर तुम्ही काम करत असाल,तर तुमच्यातला माणूस जिवंत आहे कि हैवान हे स्वतःलाच विचारा !
(16/18)
वरील सगळ्या गोष्टींचा जर निष्पक्ष पणे विचार केला तर अनेक गोष्टी पटतील देखील, इथे सर्वांसमोर मान्य करा असं मी मुळीच म्हणत नाही,पण जर मान्य असेल तर कमीत कमी तुमच्या आतल्या मनुष्य अंशाची माफी मागा !जे सत्य असेल ते समोर येउदेत
(17/18)
आणि पीडितांना न्याय मिळूदेत एवढी इच्छा बाळगू. शेवटी राजकीय गुण मिळवण्यासाठी ह्या अश्या केसेस ला वेगळे रूप दिले जाईल आणि याला पत्रकार खतपाणी घालतील यात काडीची शंका नाही ! हे सगळं वाचल्यावर आज अनेक जण मला पुन्हा एकदा 'मराठी भैय्या म्हणून घोषित करतील हे निश्चित'
(18/18)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: