@rajuparulekar तुम्ही जे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्त्री बलात्कार संबंधी विधानाचा विपर्यास केला त्याबद्दल तुमची अतिशय कीव येते. सर्वप्रथम तुमचे आभार कि तुमच्या ट्विटमुळे मी परवापासून 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक संपूर्ण वाचले. त्यात इ. स. पू. 327 ते 1800 या कालखंडातील भारतीय
इतिहासाचे त्यांनी समीक्षण केले आहे. वाचताना सावरकरांनी जे विधान केले आहे तेही वाचले पण तुम्ही ज्याप्रकारे त्या विधानाचे अर्धसत्य मांडले आहे त्यावर उत्तर देण्याशिवाय राहवत नाही. हजारो वर्षे हिंदू वैदिक धर्मियांच्या स्त्रियांवर जे मानसिक आणि शारीरिक अत्याचार त्यावेळी ग्रीस युरोपियन
किंवा मुसलमान राजांच्या स्वाऱ्यांनी केला त्या लक्ष लक्ष हिंदू स्त्रियांची आर्त हाक कोणती असावी यासंदर्भात हे विधान केलेले आहे आणि त्याच संदर्भात त्यावेळच्या हिंदू राज्यकर्त्यांनी आणि हिंदू धर्मातील ज्या 'सात स्वदेशी बेड्या' त्यांनी नमूद केल्या आहेत त्यांच्यावरही उपरोधिक टीका
केलेली आहे आणि मनुस्मृती मधील त्रुटी यांचे वर्णन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चिमाजी अप्पांच्या स्त्री दाक्षिण्यावर टीका करताना त्यांच्या पराक्रमाची गाथाही या पुस्तकात त्यांनी नमूद केलेली आहेच हे वेगळे सांगणे नको. श्रीकृष्णाने ज्या सहस्त्र स्त्रियांना युद्धानंतर भूपती
म्हणून जबाबदारी घेऊन त्यांच्या रक्षणासाठी त्यांना जो आधार दिला तो याच गोष्टीनां अनुसरून होता कारण श्रीकृष्ण यांना त्या स्त्रियांच्या वेदना जाणवल्या. आणि हो स्त्री दाक्षिण्यावर टीका हीदेखील वर नमूद केलेल्या त्या ऐतिहासिक संदर्भाला अनुसरून होती. पण नाईलाजाने तुम्ही जो विधानांचा
विपर्यास केलात आणि जे मत मांडले ते खूप चुकीचे आहे कारण त्याच पुस्तकात सोनेरी पाचव्या पानाच्या पूर्वार्धात सावरकरांनी त्यांनी लिहिलेल्या मतांबद्दल जे लिहिले ते या पोस्ट सोबत जोडत आहे डोळे उघडून वाचाल ही अपेक्षा. धर्मावरील आक्रमण कसे थोपवता आले असतें त्याचे तत्कालीन उत्तर
कसे समर्पकपणे धार्मिक आक्रमण रोखता येईल त्याच्या एका अनुषंगाला धरून ते विधान होते. बाकीचे पर्याय त्यांनी दिले आहेच. आणि वरील संत रामदासांचे शेवटचे वाक्यही वाचा ते असे जे दिशाहीन टीका तुम्ही करता त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. एखादे पुस्तक ग्रंथ किंवा संपादकीय वाचताना
ते कसे वाचावे आणि उहापोह कसा करावा आणि मतप्रदर्शन कसे असावे हा ज्याचा त्याचा विचार असू शकतो पण एका स्वातंत्र्यवीरांवर जे मराठी मातीतले थोर भारतीय सुपुत्र आहेत त्यांच्यावर असे विधान थोडे तारतम्य बाळगून कराव असं तुम्हाला वाटत नाही का? अशा विधानांमुळे किती चुकीचा संदेश जाऊ शकतो
याच पुस्तकातील काही अजून उतारे मी जोडत आहे ज्यात तत्कालीन स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने त्यांचे मन कसे विषन्न झाले तेही सांगेल. मी बऱ्याच मराठी माणसांना या पोस्टवर रिप्लाय दिलेले पहिले नाईलाजाने स्थानीय नेत्यांनी शिकविलेले उपराष्ट्रवादाचे सिद्धांत आपली राजकीय हानी कशी करत
आहेत हेही आपल्या डोळ्यासमोर आहे. मान्य त्यांचा ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुकार तुम्हाला मान्य नाही विचार वेगळे असू शकतात कि, पण संपूर्ण पुस्तकाचा संदर्भ न समजता मोजकी विधाने करून वैचारिक विपर्यास का करावा? हे अनाकलनीय आहे. अपेक्षा याच विषयाला अनुसरून सांगोपांग उत्तर द्याल.
You can follow @WizRavi0709.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: