ॲड दिपा चौंदीकर ताईंचा हा लेख खरच मनाला एक वेगळ्या विश्वात घेऊन गेला खूप खूप धन्यवाद ताई...!
" हे खरं #couplechallenges ती होती म्हणुन तो वाचला...!
Story of Jahir n Firdos
"
जहीरभाईचा कोव्हीड पाॅझीटीव्ह अगोदर एकदा आला होता तेव्हा जहीर भाई असिम्टमॅटीक होते तेव्हा
" हे खरं #couplechallenges ती होती म्हणुन तो वाचला...!
Story of Jahir n Firdos

जहीरभाईचा कोव्हीड पाॅझीटीव्ह अगोदर एकदा आला होता तेव्हा जहीर भाई असिम्टमॅटीक होते तेव्हा
इन्सटिट्युशनल क्वाॅरंटाईन होऊन उपचार घेऊन परत व्यवस्थित झाले होते... आणी आता आपण बरे झालोय म्हणुन हा माणुस लष्काराच्या भाकऱ्या भाजण्यात मग्न.... पुन्हा व्हायचा तोच परिणाम झाला मोहरम च्या दिवशी जहीरभाईना प्रचंड थकवा जाणवु लागला ताप आला , जहीरभाई आणी फिरदोस फार्मासिस्ट त्यामुळे
दोघांनाही कळुन चुकल पुन्हा कोव्हीड नी डोकं वर काढलं असणार म्हणुन मग जहीरभाईची कोरोना टेस्ट केली तर पाॅझीटीव्ह आली आता म्हणुन फिरदोस जहीरभाई ना ॲडमीट करण्यासाठी मिशन हाॅस्पिटल मध्ये घेऊन गेली पण तिथे जागाच नव्हती म्हणुन मग तिने दुसरं प्रायव्हेट हास्पीटल गाठलं तिथं कशीबशी एक
प्रायव्हेट रुम मिळाली पण फिरदोसला त्यांच्यासोबत रहायची परवानगी नव्हती म्हणुन फिरदोस नी तिला काही सिमट्म्स नसताना स्वत:ची रॅपीड टेस्ट दिली आणी प्रार्थना करु लागली ती पाॅझीटीव्ह येऊ दे ते फक्त यासाठी की तिला तिच्या नवऱ्यासोबत तिथं राहता यावं दोन तासांनी तिची रॅपीड टेस्ट पाॅझीटीव्ह
आली आणी ती जहीरभाई सोबत तिथे थांबली दुसऱ्या दिवशी तिने स्वॅब टेस्ट दिली ती निगेटिव आली हॉस्पिटलमध्ये दिलेली प्रायव्हेट रुम किती वर्ष उघडली नव्हती देव जाणे तिने पहीला पिपिई किट विकत घेतला, ती खोली साफ केली हाॅस्पिटलच्या क्लिनर्स स्टाफला गाठून त्याच्याकडुन बेडशिट्स आणले आणी तिथुन
तिची खरी लढाई सुरु झाली. प्रायव्हेट रुम मिळाली असली तरी तिकडे कुणीच फिरकत नाही हे तिच्या लक्षात आलं जहीरभाई ना ताप आणी विकनेस तर प्रचंड होता. किमान त्यांना उपचार चालु करण तरी अपेक्षीत होतं तिने तिथल्या नर्सेस ना डाॅक्टर ना विनवन्या केल्या कुणी ऐकुन घेत नव्हतं नंतर कुठे एका
केरलियन डाॅक्टर नी त्यांच्यावर उपचार चालु केले. रेमिडीसिव्हर चालु केलं, उपचार चालु होऊन रात्र कशीतरी गेली पण दुसर्या दिवशी जहीरभाईंची ॲाक्सिजन लेवल ७९ पुन्हा हीची नवर्याला ॲाक्सिजन लावावं लागेल म्हणुन धडपड पण कुणी वेळेवर येईना म्हणुन हीने जिथे ॲाक्सिजन सिलेंडर ठेवले होते तिथे
जाऊन स्वत: ॲाक्सिजन सिलेंडर आणला आणी जहीरभाई ना लावला ( तिने फक्त लांबून पाहील होतं तो कसा लावतात तेवढ लक्षात ठेऊन तो स्वत: लावला होता ) ते करुन जरा श्वास ही घेतीये एवढ्यात जहीरभाईना थुंकीवाटे किंवा उलटीतुन रक्त पडु लागलं आता मात्र फिरदोस प्रचंड घाबरली आणी जहीरभाईनी तर आपण इथुन
परत जात नाही ही खात्रीच करुन घेतली होती पण फिरदोस नी जहीरभाईना सांगीतलं जहीर तु मनाने खंबीर रहा मी तुला सहीसलामत घरी घेऊन जाणाराय माझ्यावर विश्वास ठेव. तिने तिथल्या स्टाफ ला चांगलाच फैलावर घेतला तिने सरळ सांगीतल तुम्ही नाही पेशंट कडे लक्ष दिलत तर मी सरळ डीन कडे तुमची तक्रार करेन
तिथुन मग स्टाफ ताळ्यावर आला .... फिरदोस नी एवढ्यात तिथल्याच तिच्या ओळखीच्या डाॅक्टर ना बोलवुन घेतलं जहीरभाईंची अवस्था दाखवली डाॅक्टर उपचार केले काही काळजी करु नको म्हणुन तिला धीर दिला. ११ दिवसाची झुंज होत ती जहीरभाई एरवी जगासाठी पोशिंदा वाटत असले तरी या ११ दिवसात त्यांच्यातुन
त्राण गेले होते. त्यांना सुप पाजण, घास भरवण, त्यांना टाॅयलेट ला घेऊन जाणं कपडे बदलण हे सगळ एक बायको म्हणुन नाही तर एक आई म्हणुन फिरदोस करत होती नवरा यमाच्या छायेत होता.
जहीरभाई एकटे असते तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही पण फिरदोस नी यमाशी झुंज देऊन ही चंडी जिंकली होती."
जहीरभाई एकटे असते तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही पण फिरदोस नी यमाशी झुंज देऊन ही चंडी जिंकली होती."
" Never underestimate the power of women "
#Hats_off_To_you_Firdos_Bhabiji
@Jahirahamad @SuhasGSpeaks @iSMujawar_IYC @Girish_javeer @Anu57318631 @SaddamM48824047 @MujawarNajir @Manoj2212Khare @Nilesh_P_Z @nileshs03 @AnkkitaMate @Political__SCI @SahilVastad @Ajinkya08011289
#Hats_off_To_you_Firdos_Bhabiji
@Jahirahamad @SuhasGSpeaks @iSMujawar_IYC @Girish_javeer @Anu57318631 @SaddamM48824047 @MujawarNajir @Manoj2212Khare @Nilesh_P_Z @nileshs03 @AnkkitaMate @Political__SCI @SahilVastad @Ajinkya08011289