नवीन कामगार कायदा ....

१ . व्यावसायिक सुरक्षा
२ . आरोग्य आणि कार्य संहिता
३ . औद्योगिक संबंध संहिता
४ . सामाजिक सुरक्षा संहिता

या विधेयकात संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे . या मधे EPFO ,ESIC ,
प्रसुती लाभ , कामगारांसाठी ग्रॅच्युईटी आणि असंघटीत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधी चा समावेश आहे .

वार्षिक आरोग्य तपासणी

व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संहिते मधे पहिल्यांदाच विशीष्ठ वया नंतर ही आरोग्य तपासणी द्यावी लागेल . ही तपासणी अनिवार्य असेल . तसेच कामगारांना
ग्रॅच्युईटी मिळणे अत्यंत सोपे झाले आहे .नव्या विधेयका नुसार ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी ची ५ वर्षाची मर्यादा संपुष्टात येईल . ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी कोणत्याही कंपनी मधे किमान ५ वर्ष काम करण्याची मर्यादा होती ती आता १ वर्ष करण्यात आली आहे .

सुट्टी वरील नियमात शिथीलता .

एक कर्मचारी
वर्षाला किमान २४० दिवस काम करावे लागत होते तेव्हा त्याला २० दिवसांनी एक दिवस सुट्टी घेण्याची मुभा होती . आता रजा घेण्यासाठी ची पात्रता २४० दिवसां वरून १८० दिवस करण्यात आली आहे .

अपघातात जास्त नुकसान भरपाई

कर्मचारी जर अपघात ग्रस्त झाला तर मालकावर लावलेल्या दंडाच्या ५० % ऐवढी
कामगारास देण्यात येतील . त्याच बरोबर कर्मचारी घराबाहेर पडल्यास ( कार्यालय अथवा कारखान्याकडे जाताना ) अपघात झाल्यास भरपाई दिली जाईल पुर्वी केवळ कामाच्या ठिकाणी दिली जात असे .

महिलांना रात्रपाळी करताना सुविधा

नव्या विधेयकाने महिलांना प्रथमच रात्रीच्या वेळी त्यांच्या आवडीच्या
कोणत्याही संस्थेत अथवा कंपनी मधे रात्रीचे काम करता येईल . त्याच बरोबर कंपनी ला आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवने बंधन कारक असेल .

ESIC ची व्याप्ती वाढली

सामाजिक सुरक्षा कोड मधे ESIC ची व्याप्ती वाढली आहे . ESIC चे कव्हरेज आता देशातल्या ७४० जिल्ह्यात असेल . असंघटीत क्षेत्र तसेच
१० पेक्षा कमी कामगार असलेल्या संस्थांना ही ESIC ची सुविधा देण्यात येईल . एखाद्या कंपनीत धोकादायक कामासाठी केवळ एक कामगार असला तरी ही ESIC च्या कार्यक्षेत्रात आणले जाईल .

या विधेका मधे ४० कोटी असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष निधी ची व्यवस्था करण्यात
आली आहे . कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना तयार केल्या जातील . कामगारांना अपघात विमा , प्रसुती लाभ तसेच निवृत्ती वेतन देण्याची योजना आखली जाईल .

जॉब सपोर्ट साठी रि-स्किलिंग फंड

एखाद्या कामगाराची नोकरी गेल्यास त्याला पुन्हा नोकरी मिळण्यासाठी रि-स्किलींग फंडाची तरतूद करण्यात
आली आहे . यामुळे कामगारांचे कौशल्य विकास होईल तसेच १५ दिवसांचा पगार देण्यात येईल .

स्थलांतरीत कामगारांची व्याख्या बदलण्यात आली आहे . सर्व कामगार जे रोजगार मिळवण्यासाठी दुसरया राज्यात जातात आणि त्यांचा पगार १५ हजार रूपये किंवा त्याहून कमी आहे असे कामगार प्रवाशी मजूर असतील त्यांना
सरकार च्या कल्यानकारी योजनांचा लाभ घेता येईल . पुर्वी हा लाभ केवळ कंत्राटी कामगारांना मिळत होता .

जास्तीत जास्त लोकांना PF ची सुविधा

ईपीएफ ची व्याप्ती वाढण्यासाठी सध्याच्या काद्यात कंपनी शेड्युल्ड काढण्यात आले आहे . आता सर्व कंपनीत २० किंवा जास्त कामगार आहेत ते सर्व ईपीएफ च्या
कक्षेत येतील त्यांच्या कर्मचारयास PF चा लाभ मिळेल . त्याच बरोबर २० पेक्षा कमी कामगार आणि स्वयंम रोजगार कामगार असलेल्या कंपनी ला सामाजिक सुरक्षा संहिते मधे PF चा पर्याय देण्यात आला आहे .

२०१९ मधे असंघटीत कामगारांना किमान वेतन ६००० वरून ८००० करण्यात आले होते

@HinduAajKa
You can follow @Hindurashtra91.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: