तो मी नव्हेच, शरद पवारांचं एक काल्पनिक पण विनोदी आणि मजेशीर स्वगत.....
(ज्यांनी व्हिडीओ पाहिला नाही त्यांच्यासाठी)
मिलॉर्ड,
कोणी काहीही म्हणालं तरी तो मी नव्हेच, तो मी नव्हेच, तो मी नव्हेच. मिलॉर्ड ८० गेले आणि ८ राहिले. त्यामुळं मी जे काही सांगेन ते खरं सांगेन.
(ज्यांनी व्हिडीओ पाहिला नाही त्यांच्यासाठी)
मिलॉर्ड,
कोणी काहीही म्हणालं तरी तो मी नव्हेच, तो मी नव्हेच, तो मी नव्हेच. मिलॉर्ड ८० गेले आणि ८ राहिले. त्यामुळं मी जे काही सांगेन ते खरं सांगेन.
तसं खरं सांगण्याचा माझा स्वभाव नाही. परंतु आता मी जे काही सांगेन ते तुम्ही खरं मानून घ्यावं मिलॉर्ड. मला लोक साहेब म्हणतात, जाणता राजा म्हणतात, तेल लावलेला पहिलवान म्हणतात, सदा भावी म्हणतात. परंतु मी खरंच सांगतो मिलॉर्ड, 'तो मी नव्हेच.'
अहो मी बारामती भागातला एक सामान्य शेतकरी आहे. काबाडकष्ट करून, मोलमजुरी करून पोट भरायचो. 'मी जनतेच्या कल्याणासाठी राजकारणात आलो' असं लोक म्हणतात. पण मी जनतेचं कल्याण बिल्ल्याण काही केलेलं नाही मिलॉर्ड. खरंच, मी तसा कोणताही अपराध केलेला नाही.
मुळात राजकारणात जनतेच्या कल्याणासाठी यायचंच नसतं याची मला पूर्ण जाणीव आहे मिलॉर्ड. आता सध्याचे पंतप्रधान जनतेचं कल्याण करतात. परंतु त्यांचं काय हो, आगा ना पिछा. माझं तसं नव्हतं ना मिलॉर्ड. मला बायको आहे. मुलगी आहे. पुतणे आहेत. नातवंडं आहेत. यांना वाऱ्यावर सोडून जनतेचं कल्याण करत
बसायला मी काही खुळा नाही ना मिलॉर्ड.
आणखी एक सांगतो मिलॉर्ड, सुभद्रेच्या गर्भातल्या अभिमन्युला जसं चक्रव्यूहात कसं शिरायचं एवढंच बाळकडू मिळालं होतं तद्वत आईच्या गर्भात असणार्या मला राजकारणात कसं शिरावं एवढंच ऐकू आलं. जनतेचं कल्याण कसं करावं हे श्रवण करताना आमच्या मातोश्री

झोपी गेल्या असाव्यात बहुदा. त्यामुळंच जनतेचं कल्याण कसं करावं हे मी ऐकलंच नाही मिलॉर्ड. मिलॉर्ड, नेहमी स्वतःच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या मला जनता 'जाणता राजा' का म्हणते? हे मला कसं सांगता येईल. जनतेला अभिप्रेत असलेला जाणता राजा दुसरा कोणीतरी असावा. परंतु तो मी नव्हेच, मिलॉर्ड.
होय होय तो मी नव्हेच.
मिलॉर्ड, मी जनतेचं कधीच कल्याण केलं नाही. त्यामुळेच मतं मिळवण्यासाठी मला नेहमी पदरमोड करावी लागली. सहाजिक ज्या वयात हातात काठी घेऊन फिरायचं त्या वयात मला माझ्या नातवाकडून कर्ज घेण्याची वेळ आली मिलॉर्ड. लोक ज्याला जाणता राजा म्हणतात तो मी नव्हेच मिलॉर्ड.

जाणत्या राजाचं सिंहासन सोन्याचं होतं. परंतु माझ्या नावावर स्वतःची बैलगाडी नाही, टेम्पो ट्रक्स नाही. त्यामुळेच इनोव्हा, मर्चडीस अशी अन्य कोणतीही महागडी गाडी माझ्या नावावर असण्याची शक्यताच नाही मिलॉर्ड. बारामती भागातला कधीकाळी सायकलवरून फिरणारा मी एक सामान्य शेतकरी आहे.
आता सायकल कोणत्या कोनाड्यात पडली आहे ते स्मरणात नाही मिलॉर्ड. पण मी खरंच सांगतो मिलॉर्ड गाड्या घोड्या घेवून फिरणारा राजकारणी इतर कोणी असेल. तो मी नव्हेच.
लोक मला जाणता राजा म्हणतात. पण ते मला जाणता राजा का म्हणतात? हे मला पडलेलं एक कोडंच आहे मिलॉर्ड. कारण मी शपथेवर सांगतो,
लोक मला जाणता राजा म्हणतात. पण ते मला जाणता राजा का म्हणतात? हे मला पडलेलं एक कोडंच आहे मिलॉर्ड. कारण मी शपथेवर सांगतो,
माझ्या ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी माझ्या हिताच्या पलिकडे कसलाही विचार केला नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति हे सुभाषित मला तोंडपाठ आहे मिलॉर्ड. परंतु मी संत नाहीच. कोणी मला संत समजत असेल तर तो मी नव्हेच हे मी गीतेच्या शपथेवर सांगतो मिलॉर्ड.