ट्विटर वर एक जण खूप व्हायरल होतोय. तो काय करतो तर गरीबांचे जे फोटो आहेत त्याला देवतांच्या ज्या सिरीयल असतात त्यात जशी वेशभूषा असते तसे बनवतो. म्हणजे गरीब मुलाला बरेच वेळा तो निळा बनवून कृष्ण बनवतो. दाग दागिने घालतो. अनेक लोक वाहवा करतात, त्यात पुरोगामी म्हणवणारे ही असतात. (१)
त्यातली मेख त्यांच्या लक्षातच येत नाही. असे करून त्या गरीबांच्या सामाजिक आयुष्यात काहीच फरक पडणार नसतो. मग गांधी 'हरीजन' शब्द वापरणार, नियतीवादाला खतपाणी घालणार. पण ह्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन कोणती व्यवस्था याला कारणीभूत आहे हे कोणी प्रश्न करत नाही. (२)
मागे असच एका पोस्ट वर जेष्ठांकडून 'कृष्णवर्णीय' (अनेक वर्षांपासून आफ्रो- अमेरिकन असा उच्चार केला जातो) या शब्दाला दुजोरा देण्यात आला. असे अनेक शब्द मराठीत आहेत. ज्यांचा अर्थाअर्थी त्या शब्दाच्या अर्थाशी संबंध नसतो. कृष्णवर्णीय मध्येही दैवतीकरण आहेच. (३)
परत त्याच्याच प्रतिमा साहित्यानुसार तो निळा असतो, दाखवला ही जातो. ह्या झाल्या अनुवाद शब्दांच्या बाबी. परत जागतिक चर्चेत नक्की त्या समुदायासाठी कोणते शब्द वापरले जातात याच्याकडे ही अनेकजण कानाडोळा करतात, मराठीत रुळलेल्या शब्दांना तशीच वाट करून देतात. (४)
बरेच शब्द हे संस्कृत मधून घेतलेले वा ब्राह्मणी सौंदर्याशी निगडीत असतात.
मुद्दा हाच की लिहताना आपल्याकडून एकाही शब्दाची गल्लत होवू नये ,चुकिचा जावू नये, कोणाच्या भावना दूखावू नये, शब्दाच्या इतिहासाचा संघर्ष झिडकाराला जावू नये असे अनेक घटक ही असतात. (५)
नियतीवाद, दैवतीकरण, दैवी भागदेय अशा संकल्पना यांच्या कडून वंचित घटकांबद्दलच का असतात असा प्रश्न पडतो. (६)
@gunvantsr
@rajkosambi @arvindgj @praveengavit10 @Nishigandha269 @akashmen10 @TyrionFukinLann @bharatua @nilzalte @azad_rk
You can follow @aviuv.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: