धर्मांतरण करणारी देशातील सर्वात मोठी एजेंन्सी 'कम्पॅशन इस्ट इंडिया' भारतातुन पळ काढण्याच्या मार्गावर आहे. मोदी सरकारने मागील दोन वर्षापासुन स्वयंसेवी संस्थांचे ऑडीट काय सुरु केले एक एक घबाड समोर येऊ लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे 'कम्पॅशन इस्ट इंडिया
ही एजेंसी भारतात आदीवासी क्षेत्रात व विशेषत: पुर्वांचलात अनेक वर्षापासुन तळ ठोकुन होती. तेथील गरीबांना मदत व सेवाकार्य करण्याच्या नावाखाली कपटाने धर्मांतरण करण्याचे उपदव्यापही त्या संस्थेमार्फत सुरु होते. खरं तर मुख्य काम 'धर्मांतरण' हेच होतं, पण सेवाकार्याचा मुलामा दिल्याशिवाय
सरकारकडून हिरवा कंदिल व निधी मिळण्यात अडचण आली असती ना? म्हणुन सेवाकार्याच्या नावाखाली आजपर्यंत हजारो लोकांचे ख्रिश्चनीकरण या एजन्सीच्या माध्यमातून केले गेल्याची शंका आहे. विशेष म्हणजे या एजन्सीला अमेरीकेतून फंडींग चालू असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच या संस्थेचं मुळ अमेरिकेत आहे
व तेथूनच या संस्थेचे सुत्र हलविले जात होते. मोदी सरकारच्या दूर्बीण लावून केलेल्या ऑडीटमध्ये हिशेबाचे ताळे जुळत नसल्याने आता या संस्थेने भारतातून काढता पाय घेतल्याचे बोलले जात आहे. मोदी सरकारच्या निष्पक्ष व लांगूलचालनविरहीत कामाचे हे ताजे उदाहरण आहे.
यापुर्वीही केरळमधील *'मिशनरीज आॅफ चॅरीटी' द्वारा संचालित 'निर्मल हृदय संस्था'* चर्चेत आली होती. ही 'निर्मल हृदय संस्था' मुले तयार करणारा जणू कारखानाच बनली होती. मदर टेरेसांच्या या संस्थेतून नवजात शिशूंची खरेदी विक्री करण्याचा धंदा चालू होता.
या संस्थेतील कागदपत्रांवरुन हेच सिद्ध होते की २०१५ ते २०१८ दरम्यान या शिशूभवनमध्ये ४५० गर्भवती महिला भरती झाल्या होत्या. पण जन्माला आलेल्या केवळ १७० बालकांचीच माहिती बालकल्याण समितीला देण्यात आली होती. बाकी २८० शिशूंचे काय झाले याची काहीच माहिती नव्हती.
परंतु जेव्हा उच्चस्तरीय चौकशी झाली तेव्हा हादरवुन सोडणारे सत्य समोर आले. या संस्थेतील दोन नन्सनी कबूल केले की अनेक जोडप्यांना मोठ्या रकमा घेऊन मुलांची विक्री केली आहे. ज्यांची नोंद संस्थेच्या रजिस्टरमध्ये नव्हती. तसेच एका संस्थेत ननवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
अश्या संस्थांचे काळे धंदे समोर आल्यामुळे त्यांनी आपले बोऱ्याबिस्तर उचललेच होते. परंतु, त्यांचे पोशिंदे मिशनरी व चर्चच्या पाद-यांचा जळफळाट झाला व ते त्यांच्या मदतीला उतरले होते. सरकारच्या निष्पक्ष वृत्तीमुळे व पुर्वीच्या सरकारसारखे सहकार्य होत नसल्यामुळे या धर्मांतरण करणा-या
संस्थांची गोची होऊ लागली. म्हणुन मागील वर्षी मुंबई, ठाणे, पालघर व आसपासच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंनी भाजपाला मत न देण्याचे आव्हान खुले केले होते. तसेच देशात असुरक्षित वाटल्याचा बोभाटा केला होता.
याचप्रकारचे दोन वर्षापुर्वी मदरश्यांबाबतही असेच प्रकरण समोर आले होते. योगी सरकारने उत्तरप्रदेशातील मदरश्यांना आधार लिंक करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा तब्बल लाखो मुले केवळ नावानिशी कागदोपत्री मदरश्यात असल्याचे समोर आले. मग या मुलांना मिळणारे अनुदान
त्यांना शिकवणारे मौलवी व मदरश्याचे अनुदान कुठे व कोणासाठी वापरले जात होते असा सवाल उपस्थित झाला होता. तेव्हाही योगी सरकारविरोधात काँग्रेससह देशभरातील मुस्लीम नेत्यांनी राग व्यक्त केला होता. पण हा एवढा मोठा घोटाळा समोर आल्याची शरम इतके वर्ष डोळे मिटून पोसणा-याना काँग्रेसला वाटली
ना आताच्या विरोधी पक्षातील नेत्यांना. पण सरकारच्या या निर्णयामुळे मदरश्याच्या नावावर पोट भरणा-या मौलवींना गाशा गुंडाळावा लागला. यातुन वाचलेला पैसा सरकारने मुस्लीम मुलांच्या आधुनिक शिक्षणावर खर्च करण्याचे ठरवुन पैश्याचा अपव्यय व गैरवापर रोखला.
मोदी सरकारच्या कामाचे कौतुक सामान्य जनतेतून का होते व मोदी लाट का ओसरत नाही, हे त्याचे छोटेसे उदाहरण. परंतु मोदी सरकारच्या माॅस्कीटो बॅटमुळे देशविघातक काम करणा-या आतंकवाद्यांपासुन ते जनतेला वेठीस धरणा-या व सेवेच्या व शिक्षणाच्या नावाखाली धर्मांतरण व धर्मांधता वाढीस लावणा-या
टोळ्यांना बरोबर फटकारले जात आहे. म्हणुन या टोळ्या देश सोडून माहेरी परतताना दिसत आहेत, तर त्यांचे पोशिंदे 'साले' त्यांच्या बचावासाठी हर त-हेने प्रयत्न करताना दिसत आहे. यावर _'टोळ्या चालल्या माहेरी, साले आले दरबारी'_ असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. अनेकांना 'देशात असुरक्षित'
वाटल्याचा व देशात लोकशाही संकटात आल्याचा साक्षात्कार होतो हा त्याचाच भाग समजावा.तथाकथीत धर्मोपदेशक *झाकीर नाईक* त्यातलाच एक माथेफिरू. प्रबोधनाच्या नावाखाली हिंदू धर्माची व हिंदूंच्या देवतांची टिंगल उडविणारा हा मुस्लीम धर्मोपदेशक. मोदी सरकार सत्तेच आल्याबरोबर याच्या मुसक्या
आवळायला सुरुवात झाली होती. आता आपले काही खरे नाही असे समजताच त्याला खुदाने साक्षात्कार दिला व अरब देशात बोलावुन घेतले. पण मोदींनी सौदी अरबच्या युवराजासोबत मैत्री केली होती.त्यामुळे त्याला पुन्हा ईश्वरी साक्षात्कार झाला व तो मलेशियात पळाला. मलेशिया सरकारने त्याला आता पनाह दिली आहे
१८ जानेवारी रोजी काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये टाच आणण्यात आली आहे. त्याची मुंबई व पुण्यातील १६ कोटी ५० लाख रुपयाची संपत्ती सक्त वसुली संचालनालयाने जप्त केली आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन व हार्मनी इंडिया या दोन त्याच्या संस्थाांनी त्याच्या भाषणाचा प्रसार व प्रचार केला.
त्याच्या खात्यातील ३४.०९ कोटी व ४९.२० कोटी अश्या रकमा आधीही गोठवण्यात आल्या आहेत. त्याचा एवढा पैसा अज्ञात स्त्रोतातून आल्याचे सांगितले आहे. परंतु, अज्ञात म्हणजे नेमके कोण? हे आपण समजु शकतो.अश्या सर्व घटनांमुळे मोदी सरकारची 'सज्जनांना आधार व दुर्जनांना वचक' बसेल
अशी ओळख निर्माण झाली आहे. म्हणुन लोक मोदी सरकारला अजुनही तितकाच पाठिंबा देताय, जितका २०१४ मध्ये दिला होता आणि आता परत 2019 ला देऊन 2024 ला ही ह्याहून ही मोठा पाठिंबा देण्याचे वचनच जणू हिंदू समाजाने दिलेय
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: