(तु जय भीम आहेस वाटत तर नाही..)
असे शब्द ऐकायला मिळतात जेव्हा एक दलित चांगले कपडे घालून एखाद्या नवीन उच्च जातीच्या मित्रा समोर जातो...
माझ्या सोबत ही घडलंय दहावी पास झाल्यावर कॉलेजात गेल्यावर..,
तेव्हा मला अभिमान वाटायचा..
स्वताला भारी समजायचो..
१)
..असं वाटायचं की हे लोकं माझं कौतुक करताहेत आणि त्या वेळेस एवढं काही समजत पण नव्हतं..
पण आता ७ वर्षांनंतर जेव्हा त्या मित्रांनी बोललेल्या गोष्टी आठवतात तेव्हा लगेच डोक्यात येते की हा तर जातिवाद आहे..,
२)
आणि स्वताची लाज वाटायला लागते कि त्या गोष्टींना कौतुक समजून स्वताला हिरो समजायचो..आणि मग नंतर प्रत्येक वेळी बाहेर कुठे त्या मित्रांसोबत जायचे ठरले कि डोक्यात एकच विचार असायचा की आपण दलित आहोत ही गोष्ट लपवायची अडणाव नाही सांगायचे, कुठे राहतो ते नाही सांगायचे वैगरे वैगरे..
३)
कळायला लागल्यावर एक दिवस विचार केला गरीब लोकं तर सगळ्याच जाति धर्मात असतात.. त्यांना कोणी का विचारत नाही कि तु तर या अमुक तमुक जातिचा वाटत नाही..
मग ही विचारधारा फक्त आमच्यावरती
(दलितांवरती) का..?
तुझं घर चांगलं मोठं.. राहतो चांगला, कपडे.., गाडी.., फोन..या गोष्टी तुझ्याकडे-
४)
-आहेत.., म्हणून तु दलित वाटत नाही..
याचा अर्थ काय समजायचा ?
डोक्यात आता विचार येतो कि या उच्च जातिय लोकांना आपण दलित आहोत हे दाखवण्यासाठी काय करावं..?
गळ्यात मडके पाठिला झाडू घालून फिरावं..?
५)
काय करावं ?
कि आपण दलित आहोत हे त्यांना कळलं पाहिजे...
यांच्या मानसिकते, विचारधारे नुसार दलिताने चांगले कपडे घालावे नाही..
चांगले कपडे घातले कि ते तुम्हाला कोंप्लिमेंट देतील अरे.. तु तर दलित आहे वाटतंच नाही..
६)
आणि याच कारणांमुळे नविन हुडबुद्धी दलित समाजातील किशोर वयातील मुलं स्वताला उच्च जातीय दाखवण्याचा प्रयत्न करतात..
आणि मी दलित आहे हे लपवण्याचा..!
अशी आयडियोलोजी बनवून ठेवली आहे इथल्या जातियवादी लोकांनी..
७)
यांची अशी मानसिकता आहे की ज्या वेळेस एखादा दलित चित्रपटांत हिरो म्हणून आलाच तर हे चित्रपट बघायला नकार देतील...
मग तो कितीही देखणा आणि गुणवान असला तरीही..
८)
यांच्या मते दलित फक्त खालचे काम करू शकतो.. हिरो बनला तर कोंप्लिमेंट तयार
अरे तु तर दलित आहे पण वाटत नाही.👏🏼
आता जेव्हा या आठवणी येतात असं वाटतं आम्हाला या गोष्टी तेव्हा बोलायला का नाही सुचल्या.. का आम्हाला आमच्या जातिचा अभिमान वाटावा हे नाही शिकविले
९)
प्रत्येक आंबेडकरवादीने आपण आंबेडकरवादी आहोत हे अभिमानाने सांगायला हवे..
मी तर आता वाट बघून आहे की कोणी मला म्हणावं अरे तु दलित वाटत नाही..
६ महिने झाले मुद्दाम आणि अभिमानाने माझ्या फोनची कॉलरट्यून मी बाबासाहेबांचे गाणं ठेवलेले आहे.. आणि कायम राहील..
१०)
हे जे मित्र होते हे मोजके होते..
चांगले मित्र भरपूर आहेत ज्यांचा सोबत माझी मैत्री जातिच्या खुप पलिकडे आहे..
जिथे तु अमुक वाटत नाही तमुक वाटत नाही..
या गोष्टींना थोडी पण थारा नाही...
११)
जो मित्र तुम्हाला जातिच्या चष्म्यातून बघतो..
त्याला लांबूनच हाथ जोडा..
#जय_भिमच
You can follow @SwapneelGangaw1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: