श्री
विचार करत आहे सुरूवात कुठून करावी.अगदी परवाचाच प्रसंग.कोविड सेंटर हून दमून घरी आले होते ,अंघोळ करून जेवायल बसणार इतक्यात फोन वाजला ,आमचेचं सहकारी म्हणे मँडम तुमच्या भागात एक पेंशट आहे आणायचा आहे जा तिथं लेडीज आहे.डिपार्टमेंटच्या माणसाची आई आहे.
विचार करत आहे सुरूवात कुठून करावी.अगदी परवाचाच प्रसंग.कोविड सेंटर हून दमून घरी आले होते ,अंघोळ करून जेवायल बसणार इतक्यात फोन वाजला ,आमचेचं सहकारी म्हणे मँडम तुमच्या भागात एक पेंशट आहे आणायचा आहे जा तिथं लेडीज आहे.डिपार्टमेंटच्या माणसाची आई आहे.
जरा कुरकुरतचं तयार होऊन बाहेर पडले, गाडी जेव्हा दिलेल्या पत्यावर थांबवली.समोर त्या पेशंटचा मुलगा होता वय वर्ष 45.दुसर्या ठिकाणी राहत होता, त्या घरी आई एकटीचं,मी विचारलं काय कंडिशन? तर म्हणाले टेस्ट निगेटिव्ह आहे.न्यूमोनिया आहे.श्वास घ्यायला त्रास होतो आहे.म्हणटलं चला सर बघूया.
तर म्हणे तुम्हीचं जा मी बाहेर हाँस्पिटलची व्यवस्था करतो आहे.आत आजी शांत बसल्या होत्या विचारलं बोलू शकता का तर म्हणे श्वास घ्यायला त्रास होतोय.बाहेर आले मुलगा अजून फोनवरचं.मी सरळ 108 ला काँल केला अँब्यूलन्स आली.मुलगा अँम्ब्यूलन्स मध्ये बसायला तयार नाही.मी माझे सहकारी बसलो.
आजीना आँक्सिजन चालू केला अँम्ब्यूलन्स बरोबर डाँ होते.त्यांनी रिपोर्ट बघून अँडमिशनची गरज असल्याचं सांगितलं .गाडी हाँस्पिटलला आणली.तिथं नाँन कोविड ,कोविड यांच्यावरून नमनाला घडाभर तेल घालून आजीना अँडमिट केलं.एव्हाना रात्रीचे 1 वाजले होते.आजी आता ठीक होत्या .मी आजीना सांगून घरी आले .
दूसर्या दिवशी परत ड्यूटीवर आले.नशीब बघा..आजी माझ्याचं हाँस्पिटलं ला अँडमिट .निरोप आला परवाचा पेशंट तूला बोलवतो आहे.एक तर समोर ढीगभर रांग होती लोकांच्या शंका,राग ,काळजी,यांची भेळ मिसळ.मनात आलं काय आहे आता समोर एवढं काम आहे.तरी गेले.आजी बोलल्या तुझ नाव?मला तुला पाहायचं आहे.
अंगावर ppi कीट होतं म्हणाले आजी हे नाही काढू शकतं फोटो दाखवू का..बरं म्हणाल्या आयडी वरचा फोटो दाखवला बराच वेळ निरखून बघत होत्या .मला म्हणाल्या मी ऐकून आहे हाँस्पिटल मधून घरी बाँडी देत नाहीत.आणि मुलगा मला हात ही लावणार नाही.तू पाहिलसं ना रात्री .माझ्या अंतीम क्षणाची जत्रा नको .
अतीमसंस्कार तू कर.ह्या बांगड्या आहेत खर्च म्हणून हवं तर ठेव.मी खालीचं बसले.सगळचं अनपेक्षित होतं एका रात्रीच्या ओळखीतआजी एवढा विश्वास टाकायला निघाल्या होत्या.आजी आशेनी माझ्याकडं पाहतं होत्या ,खोल गेलेले डोळे आणि त्यात अपेक्षा स्पष्ट दिसत होती.आजी मी दोन मिनिटात आलेचं ,
म्हणून खाली आले,डाँ. विचारलं ते म्हणाले खात्री नाही.परत आजीनकडे गेले .म्हणलं आजी धीर का सोडता आहात? यातून तुम्ही बर्या होणार आहात .आजी बोलल्या तूला नसेल करायचं तर तसं सांग बळजबरी नाही बाळा.मी आजीचा हात हातात घेतला आणि ठीक आहे आजी मी करीन इतकं बोलले आजी रडायला लागल्या
कसं बसं त्यांना शांत करून खाली आले .वाटलं यांचे नातेवाईक काय बोलतील.त्यांना काँल केला,4,5 वेळा फोन केल्यावर फोन उचलला गेला.म्हणाले ,सर तुमच्या आईंची तब्येत खराब आहे.म्हणाले हो ठाऊक होतं असचं काहीतरी होणार.तुम्ही करा सगळे सोपस्कार मी पैसे देतो. लागेल तिथं सही देतो.
मला कळायचं बंद झालं. दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजून गेले होते काम सुरू करण्याआधी म्हणटलं जरा आजी न कडे जाऊन येऊ.आजी उठून बसल्या ,पाणी मागितलं मी पाणी पाजलं आणि दोन मिनीटात बोलता बोलता आजीनी मान टाकली.बाबांना काँल केला सगळं सांगितलं आणि उत्तराची अपेक्षा न ठेवता सरळ निर्णय सांगितला.
बाबा मी हे करते आहे.आमची टीम कामाला लागली .दोन तास सगळे सोपस्कार करायला लागले.बाँडी .( लगेच आजी बाँडी झाल्या )पँक करून अँम्ब्यूलन्स मध्ये घातली.स्मशान जे नेमून दिलं आहे तिथं गेलो.फाँर्मवर मानलेली मुलगी म्हणून सही केली.त्यांच्या नातेवाईकांनी आधीचं हाँस्पिटलं व म्यूनसिपलं
लिहून दिलं होतं .अंतिम संस्काराचे हक्क suspected म्हणून .समोर पाहिलं बाबांची गाडी उभी होती,त्याचे सहाय्यक निमकर काका समोर आले.मी म्हणाले काका मी येणार नाही, मी शब्द दिला आहे.पाळणार.ते बोलले दिदी आधी आत चलं तू दिलेला,शब्द पूर्ण करं अग्नि दिला .मग बाबांनकडे पाहिलं .
घरी गेल्यावर बाबा बोलले,पोरगी मोठी झाली. ती काहीतरी चागलं काम करत होती ,पाहण्याची इच्छा झाली म्हणून आलो.अचानक धाकटा भाऊ गेल्यानंतर धीरानं उभी राहिलेली मी बाबांच्या कुशीत ढसाढसा रडले .मघाशी आजीचा मुलगा आला होता ,आजीच्या बांगड्या घेऊन गेला.वर विचारलं मँडम ती राख देतात काय
रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम करायचा आहे..
वाटलं बेगडी नाती आहेत का? जगाला घाबरून सांभाळली जात आहेत.की या आजाराने माणसातली खरी रूपे बाहेर यायला लागलीत.आणि कुठं तरी आतून राग ही उफाळून येत होता .
वाटलं बेगडी नाती आहेत का? जगाला घाबरून सांभाळली जात आहेत.की या आजाराने माणसातली खरी रूपे बाहेर यायला लागलीत.आणि कुठं तरी आतून राग ही उफाळून येत होता .
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे ,खात्री तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे ,लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले... पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले ,घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे ..
हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे ..