फरक : आपल्यात आणि त्यांच्यात !

आजकाल पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे मुलांचे वाढदिवस कवक कापून व मेणबत्त्या विझवून अनेक घरांतून साजरे केले जाऊ लागले आहेत.

#म #मराठी #Birthday #वाढदिवस #जन्मदिवस
आयुष्य एकेका वर्षाने कमी होत आहे - जीवनाचा इतका भाग कापला गेला आहे, आयुष्यातील प्रकाश संपत आला आहे असा निराशाजनक भाव यातून व्यक्त होतो.

#म #मराठी #Birthday #वाढदिवस #जन्मदिवस
अन तोंडाने मात्र म्हटले जाते 'Happy Birthday to you' कृती व उक्ती यात केवढे ते अंतर !!
दिवा विझवणे तर आपल्याकडे अशुभ मानले जाते.

#म #मराठी #वाढदिवस #जन्मदिवस #Birthday
आम्हा हिंदूंची पद्धती दीपप्रज्वलनाची आहे.
• भा:रत - म्हणजेच आम्ही तेजाचे पूजक आहोत. वाढदिवसाच्या दिवशी सुंदर रांगोळी काढून, पाट मांडून त्यावर सुंदर शाल, त्यावर गव्हाचा व तांदळाचा चौक तयार करून त्यावर त्या व्यक्तिला बसवायचे व +

#मराठी #Hindu #हिंदू #हिंदुत्व #भारतीय_संस्कृति
कुंकूमतीलक लावून अक्षता - ज्यांना क्षती नाही त्यांना अक्षता - लावायच्या व दिपज्योतीने ओवाळायचे, अशी आपली हिंदू पद्धती आहे.

#मराठी #म #वाढदिवस #जन्मदिवस #Birthday
जीवन अक्षत - अक्षय आहे व दिपज्योतिप्रमाणेच ते स्वतः उजळून निघो व इतरांना प्रकाश देवो, अशी मंगल कामना त्यामागे आहे. औक्षणानंतर वडील माणसांचे आशीर्वाद घ्यायचे. त्याआधी त्यांना वाकून, लिन होऊन नमस्कार करायचा.
#म #मराठी #जन्मदिवस #वाढदिवस #Birthday
मग सुंदर रांगोळी काढून मिष्टान्नचे जेवण सर्वांसह घ्यायचे व नव्या उत्साहाने 'कीर्ती मागे उरावी' या संकल्पाने जीवन जगायचे !

असे अनेक सुरेख संस्कार उथळ परानुकरणापायी व आधुनिकतेच्या खोट्या हव्यासापायी 'जुनाट' म्हणून झिडकारणे आपल्या कल्याणाचे नाही.
जीवनाकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोनच परंपरागत संस्कारांतून अंकुरित होतो. आजही आमचे खासगी व सार्वजनिक कार्यक्रम दिपप्रज्वलनानेच सुरू होतात.

#Hindu #Hindutva #Bharat #Birthday
'प्रकाश उजळो दिगदिगंती' हा भाव जागृत राहिल्यानेच आमची संस्कृती कितीतरी आक्रमणांना तोंड देत, विरोधी शक्तींशी झगडत जिवंत राहिली आहे व आपण जागे राहू तर ती चिरंजीव होईल. तमातून प्रकाशाकडे जाण्याची आज गरज आहे !
- @malhar4you
You can follow @malhar4you.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: