महत्वाची #थ्रेड👇

राजीव शर्मा आणि नोटबंदी..

मित्रांनो, हा लेख म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा आणलेला ऊत नाही तर एका निर्णयाचा समाजावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित करणारी घटना घडलीये, त्या अनुषंगाने जुन्या एका निर्णयाचा नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त करत आहे.. +
काही महत्वाची माहिती चीनला पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्याखाली राजीव शर्मा नावाच्या पत्रकाराला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट च्या अंतर्गत अटक करण्यात आलीये. ह्या पत्रकाराने युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, सकाळ टाइम्स, चीनच्या ग्लोबल टाइम्स ह्या अश्या पोर्टलसाठी काम केलंय. +
ह्या माणसाकडे काही  देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिमहत्वाची अशी कागदपत्रे मिळाली आहेत. मुळात ह्या व्यक्तीचा लिखाणाचा कलसुद्धा साधारण अश्याच बाबीमध्ये होता. 

तर... 

२०१६ मध्ये चीनच्या गुप्तचर यंत्रणेकडून ह्या राजीवशी संपर्क साधण्यात आला. +
तो सतत त्यांच्या संपर्कात असल्याचेसुद्धा सांगतात. दीडवर्षात ह्या मुक्तपत्रकाराला तब्बल ४० लाख मिळाले. त्याचसोबत प्रत्येक माहितीसाठी त्याला १०००$ मिळत म्हणजे काही महत्वाची माहिती दिली कि साधारण ६० ते ७० हजार रुपये मिळत असत.. काय कमावलं असेल विचार करा. +
अर्थात ह्याला एवढी महत्वाची माहिती कशी मिळत असेल? त्याचे नेमके कोणते डीप असेट्स संरक्षण क्षेत्रात पेरले गेले होते? त्याने आत्तापर्यंत कोणती माहिती चीनला पुरवली? हे काळाच्या ओघात कळेलच.. 

पण मला इथे वेगळा मुद्दा मांडायचाय ज्यावरून बऱ्याच विचारवंत लिब्राडूंची नेहमीच जळत असते.. +
ह्या राजीवला एवढे पैसे कसे मिळत असत? तर एक चिनी महिला आणि तिचा एक नेपाळी सहकारी ह्यांनासुद्धा ह्यासंदर्भात अटक झालीये कारण एका शेल कंपनीमार्फत हे सगळे पैसे ह्या राजीवला मिळायचे.. 

https://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-journalist-rajeev-sharma-arrested-officials-secret-act-police-china-6602303/

शेल कंपनी? काही आठवतंय? नोटबंदीमुळे झालेल्या असंख्य फायद्यांपैकी एक +
अतिमहत्त्वाचा फायदा म्हणजे शेल एक लाखाहून अधिक शेल कंपन्यांचा बाजार उद्धवस्त करण्यात आला. शेल कंपनी म्हणजे केवळ कागदावरची कंपनी जिला काहीच अस्तित्व नसतं जिचा उपयोग बऱ्याचदा काळ्याचं पांढरं करायला होतो. अश्या लाखाहून अधिक कंपन्या हटवल्या गेल्या म्हणजे ज्यांचे स्टेक, हितसंबंध +
ह्या अश्या कंपन्यांमार्फत जुळले गेले होते त्यांची जळणारच कि ओ. सगळ्याच शेल कंपन्या बाहेर आल्या असे माझे म्हणणे नाही पण मजबूत बांबू नक्कीच लागलेत. ह्यात शंका नाहीच. केवळ एका छोट्या फ्लॅट मध्ये शेकडो अश्या कंपन्या सुखाने नांदत होत्या. त्या जाळल्या ह्या नोटबंदीने.. +
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/over-1-lakh-shell-companies-deregistered-this-fiscal-government/articleshow/67285309.cms

आज एक राजीव शर्मा बाहेर आलाय.. असे अजूनही कित्येक राजीव शर्मा असतीलच कि? अश्या कित्येक राजीव शर्मांचा बाजार ह्या नोटाबंदीने उदास केला असेल? उगाच ठरावीक लोकं काही काळानं जाहीररीत्या नोटबंदीच्या नावानं उगाच बोटं मोडत नाहीत.. आणि हे सर्व तथाकथित विचारवंत
एकाच विचारसरणीचे.. हाही केवळ योगायोगच कि? 

नोटबंदीने सर्वसामान्यांना त्रास झाला हे मी नाकारत नाहीच. पण त्याचे दूरगामी चांगले परिणाम आहेतच, ज्याचा विचार आधी कधीही झाला नव्हता.

कितने राजीव छुपाओगे.. सारे राजीव निकालेंगे..
You can follow @chetandixit9.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: