देशात ६ वर्षात एकही मोठे विद्यापीठ उभे न करता पक्षाची भव्य दिव्य ५०० कार्यालये उभारली,त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही.

संपूर्ण देशात एखाद्याही मोठ्या हाॕस्पिटलचे भूमिपूजन न करता मंदिराचे भूमिपूजन केले त्याबद्दलही आमची नाराजी नाही.
हजारो कोटी निवडणूक प्रचारात खर्च केले पण IIT, IIM,AIIMS, ISRO, BARC यासारखी एकही उच्च शैक्षणिक संस्था उभारली नाही याबद्दलही आमचे म्हणणे नाही.

६ वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट न उभारता ७० वर्षात उभे राहिलेले अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट विकले तरीसुध्दा आम्ही बोलणार नाही.
दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याऐवजी २ कोटी लोकांचे रोजगार हिरावून घेतले त्याबद्दलही आम्ही अजिबात दुःखी नाही.

काळा पैसा भारतात वापस आणण्याऐवजी काळ्या पैशेवाल्यांनाच हजारो कोटींची कर्जमाफी दिली तरीही आम्ही तुम्हाला दोष देणार नाही.
५ ट्रिलीयनवर किती शून्य असतात हे माहित नसलेल्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न दाखवता दाखवता देशाची अर्थव्यवस्थाच पार उध्वस्त केली तरीही आम्ही टिका करणार नाही.

विदेशी दौऱ्यांवर हजारो कोटी खर्च केले,परंतु एकही मोठा कारखाना उभा केला नाही तरी आम्ही निषेध करणार नाही.
स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे वचन देवून शेतकरीच उध्वस्त करुन टाकला तरी कोणाला त्रास नाही.

*तुम्ही यापुढेही काहीच केले नाही तरी आमची कोणतीच तक्रार राहणार नाही.*

*फक्त हात जोडून,तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की,आता जेवढे काही देशात शिल्लक राहिले आहे, ते तरी कृपया विकू नका.
You can follow @JDhankikar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: