#Thread : 'मराठवाडा मुक्ती संग्राम'.

भारताच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जिथे या देशाचे विभाजन करण्याची इच्छा ठेवणाऱ्या अनेकांच्या स्वप्नाचे भंजन झाले. तसाच एक ऐतिहासिक,भौगोलिक आणि सामाजिक दृष्टया अत्यंत महत्वाचा प्रसंग म्हणजे 'मराठवाडा मुक्ती संग्राम'.
(1/16)
भारत स्वतंत्र होण्यासाठी खरंतर हिंदूंनी भलीमोठी किंमत मोजली आहे,पहिली मोठी किंमत म्हणजे आपल्या देशाचे विभाजन आणि दुसरे म्हणजे ज्या भागाचे विभाजन झाले (पाकिस्तान) तिथे हिंदूंवर झालेला अत्याचार.सरदार पटेल जर नसते तर कदाचित भारत अखंडित राहिला नसता !
(2/16)
१९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ५६५ संस्थानांमध्ये विस्तारलेला होता आणि त्या पैकी ५६२ संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.काश्मीर,जुनागढ आणि हैद्राबाद हि अशी तीन संस्थाने होती ज्यांनी हा निर्णय घेतला होता.
(3/16)
नेहरूंनी स्वतःहून पुढाकार घेऊन काश्मीर चा मुद्दा ते हाताळतील असे सांगितले आणि पुढे काय घडले हे सर्वश्रुत आहे.जुनागढ चा किस्सा सरदार पटेलांनी अगदी हुशारीने सोडवला आणि जुनागढ चा नवाब पाकिस्तान ला निघून गेला ! ती सुद्धा एक मोठी कहाणी आहे जी नंतर कधी बघू.
(4/16)
राहिला विषय, हैद्राबादचा. हैद्राबादचा निजाम,मीर उस्मान अली खान,याला भारतात कोणत्याही परिस्थिती मध्ये विलीन व्हायचे नव्हते आणि जीनांच्या हातात तो व्यवस्थित खेळात होता.
(5/16)
हैद्राबाद ची बहुतांश लोकसंख्या (८०%) हि हिंदू होती आणि बाकी मुसलमान आणि इसाई ! लोकांच्या मते त्यांना केव्हाही हिंदुस्थानातच विलीन व्हायचे होते, पण धर्मांध निजामाला तसे करण्यापासून रोखायचे होते.
(6/16)
निजाम ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जायचे,पण त्याच्या धनाचा मार्ग होता कुठून? त्याच्या संस्थानातील हिंदूंवर त्याची रझाकार सेना दिवसागणिक अत्याचार करत,त्यांना लुटत, स्त्रियांवर अत्याचार करत !
(7/16)
या सगळ्या गोष्टीला कंटाळून स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या अनुयायांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामाची सुरवात केली. येत्या काळात या सगळ्यांवर रोख लावण्यासाठी म्हणून निजामाने कासीम रझवी याला सेनापती केले.
(8/16)
कासीम रिझवी का अत्यंत क्रूर आणि धर्मांध असा सेनापती ठरला आणि हळू हळू करत सगळी ताकद निजामाकडून त्याच्या कडे आली. याच वेळेला तेलंगणातील कम्युनिस्टांनी रझवी सोबत हातमिळवणी केली आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला पाठिंबा दिला.
(9/16)
दुसऱ्या ठिकाणी पटेल पूर्ण तयारी करत होते तर आतून स्वामी रामानंद तीर्थ आणि त्याचे अनुयायी या निजामाच्या विरोधात विद्रोह करण्याच्या पूर्ण तयारीत होते.
स्वामींच्या नेतृत्वाखाली अनंत भालेराव,गोविंदभाई श्रॉफ,रविणारयण रेड्डी आणि अजून अनेकांनी महत्वाचे कार्य केले.
(10/16)
दिवसेंदिवस हैद्राबाद संस्थानात वाढत चाललेली अशांतता आता परिसीमेवर पोहोचली होती,निजाम काही केल्या ऐकायला तयार नव्हता. अनेक वेळेला शांतपणे पटेलांनी त्याच्या समोर प्रस्ताव मांडले परंतु त्याने ऐकले नाही आणि १३ सप्टेंबर १९४८ ला पटेलांनी ऑपरेशन पोलो ची घोषणा केली.
(11/16)
हैद्राबाद संस्थानाच्या चहू बाजुंनी भारतीय सैन्याला तैनात केले.आणि या रात्री आपले सैन्य संस्थानात घुसले. २००,००० लाख धर्मांध रझाकार मुसलमानांच्या विरुद्ध भारतीय सैनिक, अनेक हिंदूवीर धारातीर्थी पडले आणि शेवटी १७ सप्टेंबर १९४८ ला
(12/16)
जेव्हा निजाम ला त्याची ताकद पुरात नाही असे लक्षात आले तेव्हा त्याने माघार घेतली आणि भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. सरदार पटेल आणि अनेक हिंदूवीर हे भारताला एकसंघ ठेवण्याच्या या युद्धात खर्यार्थाने अजरामर झाले.
(13/16)
धर्मांध निजामाच्या कचाट्यात अडकलेला महाराष्ट्राचा मराठवाडा याच दिवशी स्वतंत्र झाला आणि भारत देश एक म्हणून पुढे चालू लागला. या नंतर निजामशाही हि अधिकृत रित्या सरकारकडून संपवण्यात आली,रझाकारांना बंदी बनवण्यात आले
(14/16)
.हा देश एकत्रित ठेवण्यासाठी जेवढे कार्य आणि जेवढी बलिदान हिंदूंनी दिली असतील तेवढी क्वचितच कोणत्या दुसऱ्या धर्माच्या लोकांनी दिली असतील !या मुक्तिसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या अनेक वीरांना मानाचा मुजरा ! आणि सरदार पटेलांना साष्टांग दंडवत !
#marathwadamuktisangram
(15/16)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: