#थ्रेड

मराठा साम्राज्याचे झेंडे अटकेपार रघुनाथरावाने, बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) पेशवा असताना लावले, बाजीरावांनी म्हणजेच राऊंनी नाही. रघुनाथराव हे याच बाजीरावांचे चिरंजीव. बाजीरावांबद्दल काही सांगायचं असेल तर खूप काही आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'बाजीरावांच' अस्तित्व फक्त 'बाजीराव-मस्तानी' या गोष्टीसाठी नसून 'हिंदवी स्वराज्याला ' महत्वाकांक्षाचे पंख लावून नर्मदेपार नेणारा हा पेशवा होता. ४२ लढाया लढून एकही लढाई न हरणारा हा पेशवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या साठी स्वराज्य यज्ञ सुरु केला
आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यासाठी आपल्या प्राणच बलिदान केलं त्याच चीज करणारा हा पेशवा होता. बंगश, निझाम यांच्यासारख्यांना मराठ्यांच्या तलवारीचं पाणी चाखवणारा हा पेशवा होता.
बाजीरावाचा जन्म १८ ऑगस्ट १७०० ला झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ' होते. अशी आख्यायिका आहे कि १८ ऑगस्टला
बाळाजीपंत 'बाजी' नावाचे जितके वीरपुरुष होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती वाचत होते त्याचवेळी हे पुत्ररत्न झाल्याने याचेही नाव बाजीराव ठेवण्यात आले. परंतु या आख्यायिकेला कोणतेच लिखित संदर्भ नाहीत. याच बाजीरावांना घर 'राऊ' असं संबोधत असत.
१७२० साली बालाजी विश्वनाथ कैलासवासी झाले.
यापुढे #साताऱ्याला बरीच राजकारण सुरु झाली. चिमणाजी मोघेंना आता पेशवाई द्यावी असं म्हणणारा एक गट उभा राहिला आणि बाजीरावांस पेशवाई द्यावी असं म्हणणारा दुसरा. पुरंदरे, पवार, जाधवराव हे सगळे बाजीरावांच्या बाजूने उभे राहिले. अखेर छत्रपती शाहूंनी त्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी यांची
भेट घेतली आणि नंतर 'बाजीरावांना' पेशवा म्हणून घोषित केले. बाजीरावांचा दिल्लीतील पराक्रम, त्यांची सैन्यावरची पकड हे सर्व छत्रपतींना ज्ञात होतेच. दिल्लीतून बाळाजी विश्वनाथ यांनी ज्यावेळी सनदा आणल्या त्याही वेळी बाजीराव त्यांच्यासोबत होते, हा सर्व इतिहास छत्रपतींना माहित होता
त्यामुळे तसेही छत्रपती स्वतःही हे पद बाजीरावांनाच द्यावे या पक्षाचे होते.
अवघ्या विसाव्या वर्षी बाजीराव पेशवा झाले. छत्रपतींना बाजीरावांबद्दल जो विश्वास होता तो त्यांनी कधीच खोटा ठरू दिला नाही. १७२१ ते १७२५ बाजीरावांनी नाशिक, गोंडवन, खान्देश, माळवा, औरंगाबाद, गुजरात या प्रांतातून
छत्रपतींना सरदेशमुखी आणि चौथाई वसूल करून दिली. दिल्लीतून सनदा मिळाल्या होत्या पण प्रत्यक्षात वसुली कोण देतो? ती वसुली मिळवावी लागते ती बाजीरावांनी सैन्यबळावर प्रथम मिळवून दिली.
नोव्हेंबर १७२५ ते एप्रिल १७२७ बाजीरावांच्या सेनेने कृष्णा नदी ओलांडली आणि दक्षिणेतील गुत्तीचे मुरारराव
घोरपडे, म्हैसूरचा वाडियार, अर्काट, गदग, कनकगिरी, चित्रदुर्ग, सुरपूर, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण, बिदनूर येथील सर्व राजांना छत्रपतींचे मंडलिक राजे बनवले. या सर्वांना सरदेशमुखी आणि चौथाई देण्यास भाग पाडले. पुढे तंजावर आणि मदुरै पर्यंत जायचा बाजीरावांचा विचार होता पण त्यांच्या
हितशत्रूंनी केलेल्या कारस्थानांमुळे त्यांना परत फिरावे लागले.
पुढे १७२७-२८ ला निजामाबरोबर झालेल्या युद्धात तर बाजीरावांनी फारच मोठा पराक्रम केला. या 'पालखेडच्या' लढाईवर तर एक अख्ख वेगळं उत्तर लिहावं लागेल. 'स्ट्रॅटेजिक वॉरफेर'चा एक उत्तम नमुना होतं हे युद्ध.
या युद्धामुळे निजामसारख्या मुरब्बी राजकारण्याने बाजीरावांसमोर सपशेल शरणांगती पत्करली. तारण्याताठ्या बाजीरावांनी औरंगजेबाकडून धडे घेतलेल्या निजामाला लोळवलं. हा बाजीरावांच्या आयुष्यातील परमोच्च बिंदू होता.
आता बाजीरावांनी आपली नजर उत्तरेकडे वळवली.
राजा छत्रसाल हे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवतच मानायचे. याच छत्रसाल राजांनी दिल्लीवर हल्ला करायची तयारी केली. हे समजल्यावर दिल्लीच्या बादशहाने आपला सरदार बंगश याला राजा छत्रसाल यांच्यावर पाठवलं. बंगशची फौज मोठी होती. यावेळी छत्रसालांनी बाजीरावाकडे मदत मागितली. बाजीराव वायुवेगाने
बुंदेलखंडात पोहोचले आणि त्यांनी बंगशचा पराभव केला. इथे मराठ्यांना झाशी आणि सागर हे दोन आणखीन सुभे मिळाले. बाजीरावांनी गोविंदपंत बुंदेले (हे तेच गोविंदपंत जे पुढे पानिपतच्या आधी पडले) यांना सागर आणि नेवाळकर (हेच झाशीच्या राणीचे पूर्वज (सासरकडून) यांना नेमले.
बाजीरावांच पुढच एक वर्ष आपल्याच माणसांशी लढण्यात गेल. १७३१ हे वर्ष निजामाने चिथावल्यामुळे बाजीराव आणि छत्रपती शाहूंविरुद्ध जाणाऱ्या त्र्यंबकराव दाभाड्यांशी लढण्यात गेलं. १७३३ मध्ये बाजीरावांनी कोकणावर मोहीम काढली. नागोठणे, पेण, पनवेल, दंडा-राजपुरी, महाड, पाचाड, बिरवाडी, दाभोळ,
गुहागर, श्रीवर्धन वगैरे ठाणी जिंकून घेतली.
आता पाळी दिल्लीची. हीच मग्रूर दिल्ली जिने पदोपदी आपल्या छत्रपतिंचा शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. १७३७ मध्ये बाजीरावाने थेट दिल्लीवरच हल्ला केला. आज छत्रपतींचे स्वप्न बाजीरावांनी पूर्ण केले. याचा बदला घेण्यासाठी बादशहाने निजामाला
चिथावले. १७३७ च्या अखेरीस निजामाने युद्धाची तयारी केली. पुन्हा एकदा आपल्या युद्धकौशल्याने बाजीरावांनी निजामाला पाणी पाजले. जो निजाम 'काफर बाजीरावला नर्मदेवर कधीच पाऊल ठेऊ देणार नाही असं म्हणत होता' त्याने स्वतःच बाजीरावांशी नाक मुठीत धरून तह केला आणि "नर्मदा आणि चंबळ नद्यांमधला
प्रदेश आणि पन्नास लक्ष रुपये युद्धखर्च बादशाहाकडून द्यायचे कबुल केले.
या आणि अश्या कित्येक लढाया या मराठी वाघाने आपल्या बुद्धिकौशल्यावर आणि युद्धकौशल्यावर जिंकल्या. या सर्व लढायांवर एक एक असे वेगळे उत्तर होऊ शकेल यांचे संदर्भसुद्धा मी खाली देतो आहे. पण बाजीरावांच्या पराक्रमाची
आणि दराऱ्याची प्रचिती यावी म्हणून खाली २ प्रसंग देतो आहे.

राधाबाईंची काशी यात्रा:

१४ फेब्रुवारी १७३५ ला बाजीरावांच्या माता राधाबाई या कशी यात्रेला निघाल्या. सोबत दीडशेची फौज, जावई आबाजी नाईक आणि महादजीपंत पुरंदरे एव्हढेच होते. पण बाजीरावांचा दरारा पहा कि उदयपूरच्या राण्याने
राधाबाईंना आठवडाभर थांबवून घेऊन त्यांचा आदरसत्कार केला. जयपूरचा राजा सवाई जयसिंग यांनी तर राधाबाईंना दोन महिने आपल्याकडे पाहुणचारासाठी ठेवले. पुढे बादशहाने स्वतः आपल्या सरदारांना राधाबाई आपल्या मुलुखातून जातील तर त्यांना जराही तोशिष पोहोचवू नये अशी तंबी दिली. १७ ऑक्टोबर १७३५ ला
राधाबाई काशीला पोहोचल्या जे त्यावेळी बंगशच्या ताब्यात होते. हा तोच बंगश ज्याने छत्रसालांवर हल्ला केला म्हणून बाजीरावांनी त्याला हरवले होते. बाजीरावांचा पराक्रम त्याच्या इतका लक्षात होता कि त्याने आपल्या दिवाणाबरोबर (हरिप्रसाद) राधाबाईंना नजराणा पाठवला आणि त्यांच्या यात्रेचा खर्च
उचलला. पुढे राधाबाई गया, सागर येथे जाऊन अखेर तब्बल दीड वर्षांनी मे १७३६ ला पुण्यात पोहोचल्या. राधाबाईंना मुघलांकडून मिळालेली हि वागणूक म्हणजे त्यांचा चांगुलपणा नसून बाजीरावांची जरब हेच त्याचे कारण होते.

बाजीरावांची राजपुतान्यात भेट:

बाजीराव १७३५ मध्ये राजपुतान्याकडे निघाले.
उद्देश सोपा होता राजपुतांना मुघलांविरुद्ध एकत्र करणं. यावेळी जयपूर,उदयपूर, बिकानेर अश्या राजपुतांकडे बाजीराव जाऊन आले. उदयपूरच्या राण्याने बाजीरावांच्या स्वागतासाठी दोन सोन्याची सिंहासन ठेवली होती राण्याने बाजीरावांना बसण्याची विनंती केली परंतु तिथे न बसता बाजीराव चक्क खाली जाऊन
चांदीच्या स्थानावर बसले. राणा आश्चर्यचकित झाला यावेळी बाजीराव म्हणाले' महापराक्रमी महाराणाप्रताप यांची हि गादी आहे, मी सातारकर छत्रपतींचा सेवक मी या सिंहासनावर बसू शकत नाही'. हे ऐकून जयपूरच्या जयसिंगानेही अशीच दोन सोन्याची आसन ठेवली. यावेळी बाजीराव सरळ जाऊन त्या सिंहासनावर बसले.
जयसिंगाला हे थोडे अपमानास्पद वाटले परंतु यावेळी बाजीरावांनी त्यांना सांगितले कि 'ती उदयपूरची गाडी महाराणा प्रतापांची होती त्यांनी अकबराच्या कुठल्याही आमिषांना आणि धमक्यांना न जुमानता मुघलांचा विरोध केला. आपल्या पूर्वजांनी तर स्वतःच्या मुली मुगलांना देऊन त्यांची गुलामगिरी पत्करली
या गादीचा काय त मान?" या पुढे राणा जयसिंगांची समजूत काढून बाजीरावांनी त्यांना आपल्या आगमनाचे उद्दिष्ट सांगितले. असो पण एका पेशव्याला एव्हढा मान राजपुतान्यांतील राण्यांनी देणं हे बाजीरावांच्या पराक्रमच प्रशस्तिपत्रकच आहे.

बाजीरावांना काशीबाईंपासून बाळाजी (नानासाहेब), जनार्दनपंत
आणि रघुनाथराव हि तीन अपत्ये होती. तर मस्तानीबाईंकडून समशेरबहाद्दर हा मुलगा. याशिवाय काशीबाईंना आणि बाजीरावांना 'रामचंद्र' हा मुलगा होता परंतु तो लहानपणीच वाराला आणि दुसरा मुलगा जन्मताच वारला. या बाजीरावाने ज्या मराठ्यांनी २७ वर्ष औरंगजेबाला' या महाराष्ट्रात खिळवून ठेऊन इथेच गाडलं
त्या सर्व मराठ्यांची ताकद दिल्लीला आणि समस्त भारताला दाखवून दिली. एकही लढाई न हरणारा हा मराठा 'मराठ्यांच्याच' नाही तर भारताच्या इतिहासात अमर होऊन गेला. २८ एप्रिल १७४० रोजी हा अपराजित सेनानी जीवनाची लढाई हरला. या अश्या वीरश्रीने भरलेल्या पेशव्याचा बॉलीवूडने केलेला देवदास पाहून
याचा हा पराक्रमाने भरलेला इतिहास जगासमोर यावा हीच माझी इच्छा आहे. ज्याप्रमाणे मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वराज्य स्थापना करणारे थोर संकल्पक लाभले, या स्वराज्यासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज लाभले त्याचप्रमाणे याच स्वराज्याला गरुडभरारी देणारा या उमदा
पेशवा लाभला हे आपलं भाग्यच.

माहिती चा स्त्रोत्र

१. पेशवाई: कौस्तुभ कस्तुरे

२. बाजीराव पेशवे यांची छोटी बखर

३. मराठ्यांच्या इतिहासाची साधने: राजवाडे

४. पेशवे घराण्याचा इतिहास: प्रमोद ओक

लेखक:- सुयोग शेंबेकर
You can follow @ShriRajTripute_.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: