मित्रानो शुभ संध्याकाळ,आज राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन आहे जो मोक्षगुंडम विश्वेशवर्या यांच्या जयंती निमित्त आपण साजरा करतो,
पण आजचा हा धागा आजच्या खास दिनी एका खास व्यक्तीला समर्पित आहे ज्याच्या ऋणात मुंबई आणि मुंबईकर आहेत असे म्हंटले तर वावगे ठरू नये
@gajanan137 @Amruta39117837
हा लेख मूळ ज्यांनी लिहिलाय ती व्यक्ती हि एकअवलिया आहे जी शिक्षणाने आहे सिव्हिल इंजिनिअर
पण क्रिकेटच्या मैदानातून आणि
सिने कलावंतांवर खुमासदार लेख लिहिण्यासाठी
जो प्रसिद्ध झाला तो म्हणजे द्वारकानाथ संझगिरी
@TheDarkLorrd @kul_anagha
आणि ती महान व्यक्ती आहे "श्री नारायण विनायक मोडक"
लेख पुढे सरकता सरकता ह्या मोडकांचे मोठे कार्य आपल्यालाही समजेल व
मुंबईकरांनी ह्यांच्या ऋणात रहायला हवे हे हि पटेल
नमनाला घडाभर तेल जरा जास्तच झालेय
सुरु करू या हा "मोडक धागा "
@Vishakh50862352
दादर परिसरात तेव्हा मोडक इंजिनीयर यांचा बंगला प्रसिद्ध होता.
हे मोडक इंजिनीयर नेमके कोण होते, त्यांचं काम,
याबदद्ल आजच्या पिढीला माहिती असणं कठीणच आहे.
पण आजची मुंबई या एका माणसामुळे पाणी पिऊ शकते
एवढं एक वाक्य सांगितलं
तरी मोडक या माणसाच्या कर्तृत्वाची पुरेशी कल्पना येईल.
जवळपास रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला जाताना मी ‘उद्यम’ नावाच्या एका बंगल्यावरून जातो.
माझ्या लहानपणापासून तो बंगला आमच्या शिवाजी पार्कमधे मोडक इंजिनीयरचा बंगला म्हणून प्रसिद्ध आहे.
लहानपणी कोण हे मोडक इंजिनीयर हा प्रश्न मनात यायचा
@RajeGhatge_M
माझ्या वडिलांनी ह्य प्रश्नाचं उत्तर मला एका वाक्यात दिलं होतं, ‘‘अरे तू रोज वैतरणाचं पाणी पितोस ना, ते ह्यंच्यामुळे.’’
त्या वेळी वैतरणा हा मुंबईपासून साधारण
पाऊणशे मैलावर एक तलाव आहे.
तिथे धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी मुंबईत येतं
@shivajirao29
एव्हढंच नागरिकशास्त्र किंवा भूगोलाच्या पुस्तकातून मला कळलं होतं. इंजिनीयर व्हायचं बीज माझ्या मनात रुजलं
ते मोडकांच्या कानावर पडत असलेल्या नावामुळे
अचानक मोडकांबद्दल मला लिहावंसं वाटलं,
त्याला अनेक कारणं आहेत
नव्या पिढीला त्यांची माहिती कमी आहे.
इतिहासाबद्दल, तो जोपासण्याबद्दल आपल्याला प्रेम नाही.
राजकीय मंडळी इतिहास त्यांच्या स्वार्थापुरता वापरतात.
राजकीय किंवा सामाजिक व्यक्तिमत्त्वाएव्हढेच
समाजाच्या दृष्टीने इंजिनीयर्स, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ महत्त्वाचे असतात
पण आपल्याकडे वलय फक्त राजकीय पुरुष, क्रिकेटपटू आणि सिनेमातल्या मंडळींना असतं
रस्ता, चौक,गल्ल्या, स्टेशन्स ही आपल्याकडे बहुतेक पुढाऱ्यांसाठीच किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी राखून ठेवलेली असतात
वैतरणा तलावाला मोडकसागर म्हणतात
पण मोडकांचं कॉन्ट्रिब्युशन फार थोडय़ा मंडळींना ठाऊक आहे
त्यांना नानासाहेब म्हणत. त्यांचं नाव नारायण!
ते अभ्यासात हुशार होते हे सांगायची गरज नाही.
पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कधी गरीब विद्यार्थी फंडातून मदत घेऊन तर
नंतर काणे स्कॉलरशिप मिळवून ते मॅट्रीक झाले
मॅट्रीकमध्ये चांगले गुण मिळाल्याने पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश त्यांना स्कॉलरशिपसह मिळाला.
पुढे पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून ते १९११ साली बी.ई. झाले. मग सरकारी नोकरी,
पण त्यानंतर त्यांची पडणारी पावलं ही वामनाची पावलं होती
माथेरानच्या पाणीपुरवठय़ाची सूत्रं त्यांच्या हातात आल्यावर त्यांनी तिथल्या प्रसिद्ध शारलॉट लेकमध्ये ऐन पावसाळ्यात पाइपलाइन टाकली.
मी पावलं वामनाची का म्हणतो,
कारण एक सरकारी कर्मचारी असून
कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कुठच्या कुठे भरारी मारली
त्यांच्या बुद्धीचे पंख हे गरुडाचे होते.
त्यामुळे त्यांना जमूनही गेले.
भारत सरकारची स्कॉलरशिप मिळवून ते इंग्लडला गेले.
पण परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी डॉ. टर्नर ह्यंच्या हाताखाली देशातल्या कितीतरी मोठमोठय़ा शहरातला पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची कामं केली
इंग्लंडमधली त्यांची स्कॉलरशिप फक्त दोन वर्षांची होती,
पण तिथल्या प्रायर ह्य इंजिनीयरने त्यांची स्कॉलरशिप एका वर्षांने वाढवली.
अर्थात त्या वेळी इंग्लडमध्ये राहाणं म्हणजे
सुखसोयीत लोळणं नव्हतं.
ते समुद्राजवळील हेस्टिंग नावाच्या गावात राहात.
१९१८ ते २१ची गोष्ट आहे
त्या वेळी तिथे गावात वीज आलेली नव्हती.
घरात बाथरूम नसे. सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करावी लागे.
प्रवास ट्राम आणि घोडागाडीचा होता.
पण तिथे त्यांना पाणीपुरवठा, पूलबांधणी, रस्ते बांधणे,
ड्रेनेज वगैरे सिव्हिल इंजिनीयरिंगमधल्या वेगवेगळ्या कामाचा अनुभव मिळाला
त्यांना स्वतंत्र अधिकारसूत्रे दिल्यामुळे
थोडक्यात जबाबदारी टाकल्याने त्यांची बॅग अनुभवाने भरून गेली.
तिथून परतल्यावर ते जी.आय.पी. रेल्वेत (आत्ताची सेंट्रल रेल्वे) एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर झाले.
आजच्या सरकारी भाषेत सांगायचं तर कार्यकारी अभियंता
त्या वेळी रेल्वे खासगी होती,
पण हिंदी माणूस रेल्वेत एकदम कार्यकारी अभियंता
झाल्याचं ते पहिलं उदाहरण होतं
तिथून त्यांच्या कारकीर्दीचा आलेख फक्त वरच चढत गेला.
जिथे जिथे त्यांनी काम केलं, तिथे तिथे त्यांनी आपला ठसा असा उमटवला की पुढच्या पिढय़ा त्यांना दुवा देतील
रेल्वेत असताना रेल्वेसाठी दौंड, पुणे, कल्याण, भुसावळ, जुन्नर वगैरेंच्या पाणीपुरवठा योजना केल्या.
कल्याणच्या ड्रेनेजचं काम करून त्यांनी कल्याणचं कल्याण केलं. माणसाला पाणी प्यायला देणे अतिशय पवित्र काम आहे. पाण्याला उगाचच जीवन म्हणत नाहीत. आणि ज्यांनी पाण्यासाठी पायपीट केली आहे
पाण्याने भरलेल्या कळशा उचललेल्या आहेत,
त्यांना नळाला पाणी येण्याचं सुख आणि पावित्र्य समजू शकतं
रेल्वेतून त्यांनी मुंबई महानगरपालिकेत जवळपास रेड कार्पेटवरूनच ‘एन्ट्री’ घेतली.
मुंबई महानगरपालिकेचे पहिले भारतीय कमिशनर (आयुक्त हा शब्द त्या वेळी जन्माला आला नसावा)
अर्देसर यांनी त्यांना अर्ज करायला सांगितलं.
त्या वेळी महानगरपालिकेत, पारशांचं वर्चस्व होतं.
तरी मोडकच डेप्युटी सिटी इंजिनीयर झाले.
आणि नंतर १९३२ पासून ४७ पर्यंत ते सिटी इंजिनीयर होते. महानगरपालिकेतही त्यांना रेड कार्पेटवरून जमिनीवर पाय ठेवायला लागलाच नाही
१९४८साली स्वराज्यानंतर ते 4महिने महापालिका आयुक्त झाले,
पण मग सरकारची भूमिकाहोती कीआयुक्त हाआयसीएस(आता आयएएस)असावा.मग काय करायचं?खास कायदा करून स्पेशल इंजिनीयरम्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आणि त्यांना कमिशनर इतकाचपगार दिला गेला महानगरपालिकेच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण नसावं
आणि मग त्यांनी मुंबईला अद्ययावत शहर बनवायला सुरुवात केली. दादर सुवेज डिस्पोजल स्कीम त्यांचीच.
महामुंबईचा मास्टर प्लॅन त्यांचाच!
आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वैतरणा-तानसा पाणी योजना. मुंबईहून ७५ मैलांवर असलेल्या वैतरणा नदीवर धरण बांधणे आणि तिथून तानसा तलावाद्वारे थेट
अशा दोन मार्गानी पाइप्स टाकून मुंबईत पाणी आणणे. वैतरणा धरण हे भारत स्वतंत्र झाल्यावर मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं धरण होतं. त्यात नानासाहेबांचा वाटा सिंहाचा! आता धरण बांधायचं म्हटलं की, जगभरातून भरपूर पैसे घेऊन धरण बांधण्याचं ज्ञान वाटायला कन्सल्टंट तयार असतात
तेव्हा योजना मोडकांनी तयार केली आणि त्यात काही त्रुटी राहू नये म्हणून ते ‘स्वखर्चाने’ युरोपला गेले आणि तिथल्या तज्ज्ञांशी विचारविनिमय करून आले.स्वखर्चाने’ हा शब्द लक्षात ठेवा.
सिव्हिल इंजिनीयरिंगचे शहेनशहा सर विश्वेश्वरय्यांनीसुद्धा मोडकांच्या स्किमचं कौतुक केलंय
ही गोष्ट म्हणजे सर डॉन ब्रॅडमनने सचिनला सर्वोत्कृष्ट फलंदाजीचं सर्टिफिकेट देण्यासारखं आहे. बरं हा उद्योग करत असताना, त्यांनी चंदिगढ आणि उज्जन शहरांचा पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या योजना तयार केल्या होत्या
सामान्य माणसाला पाणी देणं ही त्यांची जीवननिष्ठा असावी असं वाटतं
पण नानासाहेब जेव्हा हे कार्य निष्ठेने करत होते तेव्हा नियती वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या तोंडचं पाणी पळवत होती. त्यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यात घरचे किती मृत्यू पाहिले असावेत? त्यांचे आईवडील गेले तेव्हा ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्यावर भावंडांची जबाबदारी होती
त्यांची दोन भावंडं लहानपणी गेली. नंतर त्यांच्या लग्न झालेल्या तीन बहिणी एकापाठोपाठ एक गेल्या. त्यांचा लाडका भाऊ विष्णू संधिवाताने १५व्या वर्षी गेला. त्यांची स्वत:ची तीन मुलं गेली. पण प्रत्येक वेळी मनावर दगड ठेवून त्यांनी कारकीर्दीत पुढचं पाऊल टाकलं
मोडकसाहेबांवर महानगरपालिकेतून निवृत्त झालेले डेप्युटी म्युनिसिपल इंजिनीयर मनोहर सोहनी यांनी "‘वैतरणेचे सुपुत्र" असं छोटेखानी चरित्र लिहील आहे
असे हे अफाट कर्तृत्व असलेले नारायण विनायक मोडकआणि त्यांचा मोडकसागर डॅम
खरंच, तेथे ‘कर माझे जुळती’ असं म्हणावं असा हा मुंबईकरांचा जलदाता
You can follow @rajrajsi.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: