सर्वांच्या आठवणीतील दूरदर्शनचा आज ६१ वा वाढदिवस! त्या विषयीचा हा धागा....





दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले.





दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले.

१९५५ साली दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणीच्या वास्तूत उभारल्या गेलेल्या दूरदर्शन केंदाने निर्मिलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झाले ते १५ सप्टेंबर १९५९ रोजी. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी "दूरदर्शन" असे नाव सुचवले होते.
पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी जो एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता, त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाप साधणा-या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचं हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस

दिल्ली परिसरातच पाहता येत होतं- पण ते पाहायला खुद्द दिल्लीकरांकडेही टीव्ही सेट होते कुठे ! त्यामुळे टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते तीच सुरवात मानली जाते. रंगत खरी वाढली ती १९८२ नंतर, जेव्हा टिव्ही खरोखर रंगीत दिसू लागले.

तोपर्यंत 'कश्मीर की कली' आणि 'नवरंग' सुद्धा 'ब्लॅक अँड व्हाइट'मध्येच पाहावे लागले होते. १९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. ८२ मध्ये भारतात झालेल्या
एशियाड' या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की ! "हमलोग" ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या
वाटचालीतला हा पहिला टप्पा! त्यानंतर बुनियाद, ये जो है जिंदगी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड दिस विक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. रामायण, महाभारत या मालिका तर अजरामर ठरल्या. रविवारी सकाळी या मालिकांवेळी देशभर जणू कर्फ्यु

लागल्यासारखी परिस्थिती असायची. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले व उंच अँटेना ऍडजस्ट करत "मुंग्या-मुंग्या" हा नवा शब्द मराठीला देत टिव्ही मोजक्या का होईना पण मराठी घरांमधून दिसू लागला. मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. अनेक मालिका ज्ञान, माहिती तसेच निखळ मनोरंजन

देण्याचं काम करत होत्या, जसे की चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, बंदिनी, गोटया, एक शून्य शून्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं! ज्यांच्या घरी चाळीत टीव्ही असेल त्यांची घरे सार्वजनिक बनू लागली. आठवड्यातून एकदा रविवारी दिसणारा

सिनेमा व गुरुवारी दिसणारे अर्ध्या तासाचे छायागीत म्हणजे पर्वणीच! १९९२ मध्ये "स्टार इंडिया" चं पदार्पण झालं, ९२ मध्ये झी वाहिनी आली व अशाप्रकारे विविध चॅनेल्सनी घरात प्रवेश केला. त्यापाठोपाठ पेपरवाला, दूधवाला, किरानेवाला, घरमालक या महिन्याच्या जमाखर्चाच्या हिशेबात

केबलवाल्याने स्थान मिळवले. आज त्याच्याही पुढे जाऊन "डायरेक्ट टू होम" आले आहे. त्याकाळातील दूरदर्शन वरील मालगुडी डेज, चंद्रकांता, व्योमकेश बक्षी, तेनालीरामा, जंगलबुक, विक्रम और वेताल, सर्कस, फौजी अशा सर्व मालिकांची सर आजकालच्या हायफाय कपडे घालून श्रीमंतीचा थाट
