#Thread Series
#सावरकर आणि #आंबेडकर
यांची तुलना होऊ शकत नाही असं काही पुरोगाम्यांचे मत आहे,आणि ते "पाकिस्तान ऑर पार्टीशन ऑफ इंडिया" या पुस्तकातील मोजके संदर्भ देऊन 'बाबासाहेबानी सावरकरांची कशी मजा घेतली असे सांगतात'.या पुस्तकातील चौथ्या प्रकरणावर प्रकाश टाकणारा हा थ्रेड.
(1/25)
पाकिस्तान वर पार्टीशन ऑफ इंडिया या पुस्तकात बाबासाहेबांनी चौथ्या प्रकरणात 'हिंदू ऑल्टरनेटिव टू पाकिस्तान' यातसावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुराष्ट्र,पितृभू,पुण्यभू यावर त्यांचे विचार स्पष्ट केले आहेत आणि त्यांना न पटलेल्या गोष्टीवर 'टीका' केली आहे.

(2/25)
(टीका- म्हणजे मजा घेणे असा ज्यांचा गैरसमज आहे,त्यांच्या बुद्धीला साष्टांग दंडवत).या प्रकरणाची सुरवात होते ती 'लाला हरदयाळ' यांनी १९२५ मध्ये लाहोर मध्ये 'हिंदुस्थानाबद्दल' दिलेल्या वक्तव्यावरून,ज्यात त्यांनी पाकिस्तान ला पर्याय म्हणून हिंदुस्थानच्या स्थापने साठी तीन सिद्धांत दिले
लाला हरदयाळ यांनी 'हिंदुस्तानासाठी' मांडलेले तीन सिद्धांत कोणते ? १. हिंदू राज (HINDU GOVERNMENT ) २.मुसलमानांचे शुद्धीकरण ३.अफगाणी सीमेवर विजय आणि तिथल्या लोकांचे शुद्धीकरण.
या वर आंबेडकर असेही म्हणतात कि हे सिद्धांत कितीही ताकदवर असले तरी
(4/25)
त्याला पाठिंबा द्यायला किती हिंदू पुढे सरसावतील हा मोठा प्रश्न आहे.आंबेडकर असेही म्हणतात कि पहिल्यांदा आपण इथं असं लक्षात घेतलं पाहिजे 'हिंदू धर्म हा लोकांचे धर्मांतर करून वाढणारा धर्म नाही'. पुढे जाऊन त्यांनी मौलाना मोहंमद आली यांच्या एका भाषणाचा दाखल देतात. खालील प्रमाणे.
(/25)
पुढच्या ३ ४ परिच्छेदात लाला हरदयाळ यांनी मांडलेल्या सिद्धांताचे ते स्वतःच्या विचारशक्तीने आणि तथ्यांच्या आधारावर विच्छेदन करतात,ज्यात ते लाला हरदयाळ यांचे कौतुक देखील करतात आणि त्यांना वाटत असलेल्या 'अशक्य' अश्या गोष्टींवर प्रश्न विचारतात आणि टीका सुद्धा करतात.
(6/25)
या प्रकरणाचा अंत होताच ते सावरकरांनी मांडलेल्या सिद्धांतावर येतात आणि उत्तम रित्या त्यांनी मांडलेल्या प्रत्येक भाषणाचे,लेखाचे दाखले देत विषय उलगडत नेतात आणि या थ्रेड शृंखलेच्या च्या अंततः आपल्याला नक्की कळेल कि आंबेडकरांनी,सावरकरांची मजा घेतली, टीका केली कि कौतुक केले ?
(7/25)
आंबेडकर लिहतात,"हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले 'सावरकर' यांचा पाकिस्तान ला पूर्णपणे विरोध आहे हे स्पष्ट केले आहे आणि ते या फाळणी ला शक्यतितक्या मार्गानी अडवत हे निश्चित, ते मार्ग कोणते ते अजून स्पष्ट झालेले नाही,
(8/25)
परंतु जर ते मार्ग जबरदस्ती,सक्ती किंवा प्रतिकार असेल तर ते चुकीचे आहे आणि हिंदू महासभेलाच माहिती कि जर असे केले तर त्याचे काय पडसाद उमटतील".
"सावरकर 'मुस्लिम विरोधी आहेत' असं म्हणणं पूर्णपणे अयोग्य आहे,कारण
(9/25)
त्यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये मुसलमांसमोर पाकिस्तान च्या संदर्भात अनेक सकारात्मक प्रस्ताव सुद्धा मांडले आहे,पण या प्रस्तावांचा गाभा समजण्यासाठी आपल्याला सुरवातीला सावरकरांनी मांडलेल्या 'हिंदू'.'हिंदुत्व आणि 'हिंदुराज्य' या तीन शब्दांची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे.
(10/25)
सावरकर:-"हिंदुइझम हा इंग्रजी शब्द हा 'हिंदू' या शब्दापासून उगम पावतो,याचा अर्थ असा कि जी ज्या प्रणाली मधून हिंदू स्वतःचा धर्माचे अनुसरण करतात."
(11/25)
हिंदुत्व" हा शब्द सर्वव्यापी आहे, हा शब्द फक्त सांप्रदायिक दृष्टयाच नाही तर भाषा,संस्कृती,सामाजिक आणि राजकीय अश्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करणारा आहे आणि यात सगळे येतात ( HINDUNESS ).
(12/25)
आणि शेवट 'हिंदुराज्य' म्हणजे 'सर्व हिंदूंना एका छत्राखाली आणणारी परिभाषा,जसे इस्लाम म्हणले कि मुसलमान डोळ्यासमोर उभे राहतात तसेच 'हिंदू राज्य म्हणले कि हिंदू डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत'.
(13/25)
पुढे परिच्छेदात बाबासाहेब असे लिहतात कि सावरकरांच्या मते अनेकांनी हिंदुमहासभेला एका सांप्रदायिक संघटना समजली आहे,मुद्दाम काही बुद्धिजीव्यानी याची परिभाषा बदलली आहे परंतु मी या महासभेचा अध्यक्ष म्हणून सांगतो कि हि संघटना "सगळ्यांना सामावून' घेणारी आहे,
(14/25)
हि हिंदू धर्म महासभा नाही,'हिंदू राष्ट्रीय महासभा आहे". या सभेच्या संविधानातच असा कलम आहे कि कोणत्याही प्रकारे कोणाचीही जात पात मध्ये येऊ देणार नाही.
(15/25)
एक हिंदुमहासभा म्हणून कायमच 'हिंदूंचे प्रश्न' सगळ्यांसमोर मांडले जातील पण याचा अर्थ असा होत नाही कि दुसऱ्या सांप्रदायाचे प्रश्न इथे मांडले जाणार नाहीत.पूर्ण स्वराज्य हेच उद्धिष्ट आहे या महासभेचे आणि या साठी जे जे म्हणून आमच्यासोबत येतील
(16/25)
त्यांना त्यांना आपले म्हणून सामावून घेऊ, रंग,सांप्रदाय,धर्म काहीही न पाहता !"
(हे मी नाही,आंबेडकरांच्या पुस्तकातील सावरकर बोलत आहेत)
बाबासाहेब:-"सावरकर असेही म्हणतात,कि हिंदू महासभा फक्त मुस्लिम लीग चा आवाज दाबण्यासाठी काढलेली संघटना नाही
(17/25)
,तर स्वातंत्र्य काळानंतर सुद्धा ती 'हिंदुराज्य' हे मुख्य उद्दिष्ट ठेऊनच काम करेल आणि 'हिंदूंचा एक बुलंद आवाज म्हणून कायम हिंदूंचे प्रश्न सर्वांसमोर मांडत राहील'......'हिंदू महासभा आणि हिंदू राज्य म्हणजे नेमके काय हे खालील 'फोटो मध्ये स्पष्ट आहे'
(18/25)
याचा शेवट करत बाबासाहेब सावरकरांनी दिलेल्या व्याख्येवर काय म्हणतात ते लक्षात घ्या."सावरकरांच्या म्हणण्या नुसार, इथे जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा हिंदू आहे? असं असेल तर मग औरंगझेब चा जन्म दाहोद(गुजरात) मध्ये झाला,टिपू चा जन्म(कर्नाटकात) झाला तर मग ते हिंदू झाले?
(19/25)
ते धर्मांतरित झाले का?जरी ते जन्माने भारतीय असले तरी ते भारताचे शत्रू याच करिता होते कारण त्यांनी छत्रपती शिवाजी,राणा प्रताप,गुरु गोबिंद सिंग यांसारख्या भारत भुच्या पुत्रांना विरोधच केला,
(20/25)
आणि इस्लाम चे वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी हलकल्लोळ केला, तर मग "हिंदू महासभा' हिंदूंसाठी एकत्र येत आहे तर काय आक्षेप हवा?
या पुढे जाऊन 'सावरकरांना' या देशाचे नाव 'हिंदुस्थान' का हवे आहे याचे सुद्धा स्पष्टीकरण देण्यासाठी बाबासाहेबांनी दाखले दिले आहेत.
(21/25)
या दाखल्यामध्ये 'हिंदुस्थान' हे हिंदू ज्या भूभागात राहतात त्या भूमीचे नाव.अनेकांना, अगदी पारशी आणि यहुदी लोकांना या गोष्टी बद्दल काहीही आक्षेप नाही परंतु देशातील मुसलमानांना मात्र आक्षेप आहे ! असे का ?
(22/25)
मुसलमान सर्वत्र आहेत, ग्रीस,चीन तर तिथे ते स्वतःची ओळख करून देताना ग्रीसी मुसलमान,चिनी मुसलमान,पोलिश मुसलमान करून देतात पण इथे मात्र 'हिंदुस्थानी मुसलमान' अशी ओळख करून द्यायला काय आक्षेप आहे ?
(23/25)
आपण आपल्या मायभूमीशी दगा करून
चालणार नाही. जसे जर्मनी हे जर्मन लोकांचे, इंग्लंड हे इंग्रजांचे तसे हिंदुस्थान हे हिंदूंचे म्हणायला काय आक्षेप आहे ?"
To be continued......
Thread 1 of 4
(24/25)
या प्रकरणातील अनेक भागांवर प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचे आहे जे पुढील ३थ्रेड मध्ये समजेल आणि मग या प्रकरणाच्या शेवटी बाबासाहेबांनी सावरकरांनी मांडलेल्या सिद्धांनातवर काय मत मांडले आहे हे आपल्याला समजेल
संदर्भ-पाकिस्तान ऑर पार्टीशन ऑफ इंडिया (प्रकरण चौथे. )
@Hambhirao नमस्कार,काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने ह्या विषयी थ्रेड लिहला होता, तो त्याने डिलिट केला आहे याचे कारण तुम्हाला आणि मला दोघांनाही माहीत आहे !

तुम्ही whatsapp university वगैरे म्हणला होता ! तर त्याचे उत्तर म्हणजे वरील थ्रेड! https://twitter.com/Hambhirao/status/1303867554427932673?s=20
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: