गुरु आज्ञा

देव माणसाला पोटासाठी काय करायला लावील सांगता येत नाही, माझे आजोबा नेहमी म्हणायचे. मी त्यात अजून भर टाकली, एका ठराविक स्टेज पर्यंत. नंतर तो बरेचदा स्वत़ःचं नाव राखण्यासाठीच कष्ट करत राहतो.

आता माझंच पहा ना, एवढ्या रात्रीच्या वेळी, आडवाटेला असलेल्या कारखान्यात
ब्रेकडाउन अटेंड करायला धडपडत मी निघालोय, पैशासाठी नव्हे, फक्त गेल्या २४,२५ वर्षांत मी ट्रान्सफॉर्मर च्या सर्व्हिस क्षेत्रात जे नाव कमवलं ते राखण्यासाठीच.

जाणं भाग होतं, कारखाना त्याशिवाय चालू शकणार नव्हता, आणि माझे सर्व्हिस इंजिनीअर बाहेर गावी गेले होते.

रस्ता माहिती होता
पण खात्री नव्हती,जीपीएस चालू करुन मी गाडीला स्टार्टर मारला. पाऊण तासांचा प्रवास होता. गावातून बाहेर पडून रस्त्याला लागलो. जंगल ओलांडून पलीकडे कारखाना होता.जंगल सुरू झालं आणि जीपीएस नी मान टाकली डेटा स्पीड बोंबलला होता. थोडं पुढं आल्यावर एक वस्ती दिसली. तिथं कोणी भेटलं तर पुढच्या
रस्त्याची माहिती घ्यावी म्हणून मी गाडीचा वेग कमी केला. अपेक्षेप्रमाणे पारावर बसलेले गावकरी दिसले. त्यांनी रस्ता सांगितला पण इतक्या रात्री जाऊ नका असा अगाऊ सल्ला पण दिला.
पारावर बसून तंबाखूचे तोबरे भरण्यासाठी जन्म असलेल्यांना, कमिटमेंट शब्द समजणं शक्य नसल्याने मी फक्त मान डोलावली
आणि पुढे निघालो. अशिक्षित, अडाणी गावकरी. त्यामुळे हे गरीबाघरी जन्माला येतात, गरीबीत आयुष्य घालवतात आणि गरीबीतच मरुन जातात, तीन वेळा खायचं आणि रात्री झोपायचं यापलिकडे आयुष्य नसणाऱ्या अशा लोकांचा मला आधी राग यायचा आता कीव येते.
विचारांच्या या नादात त्यांनी सांगितलेल्या खुणा मी विसरलो.पुढच्या वळणावर मी अडखळणार होतो, डाव्या की उजव्या बाजूने जायला सांगितलं? या विचारातच मी त्या वळणाजवळ पोहोचलो. पण आज दैव खरंच माझ्या बाजूने होतं, एक माणूस तिथं रस्त्याच्या कडेला उभा होता आणि तो मलाच थांबवायला हातवारे करत होता
गाडी त्याच्या जवळ थांबवत मी काच खाली घेतली.
"कारखान्याकडे कोणता रस्ता जातो?" त्याने खिडकीवर एक हात ठेवत दुसऱ्या हाताने रस्त्याकडे बोट केलं.
"मलाही तिकडंच जायचंय, सोडाल का?"
सोबत होईल म्हणून मीही हो म्हणालो. तो गाडीत बसला, एक थंड शिरशिरी माझ्या छातीतून हाताकडे गेली.
गेल्या १५ दिवसात ही तिसरी वेळ, उद्या डॉक्टर ला दाखवायचंच हा निर्धार करत मी गाडी सुरू केली.
" एवढ्या रात्री कुठून येताय?" मी.
"साहेब, डोंगरावरच्या मंदिरात गेलो होतो.गुरुजीं बरोबर बोलताना वेळ कसा गेला कळलंच नाही." वाटाड्या उत्तरला.

मी भेटल्यानंतर खूपच खूष होता तो,
आणि बरंच काही बडबडत होता पण आता माझं लक्ष कारखान्यात माझ्या साठी काय वाढून ठेवलंय, तिकडे होतं. मी नावाला हं, हं, चं पालुपद चालू ठेवलं होतं. काही वेळाने लांबवर कारखान्याचे दिवे दिसू लागले. थोडं पुढं गेल्यावर एका पायवाटेजवळ त्याने गाडी थांबवायला सांगितली.

गाडी थांबल्या वर
त्याच्या बरोबर मीही उतरलो. जेवल्यानंतर आलेल्या झोपेचा अंमल दूर करण्यासाठी एक दोन झुरके मारावेत आणि थंडी पळवावी या विचाराने मी सिगारेट पेटवली.
"तुझं घर कुठं आहे?" मी
"या वाटेने गेल्यावर अर्धा मैल.त्याचा आनंद अजूनही मावळला नव्हता, कारण विचारल्यावर तो म्हणाला,
आज मी माझ्या गुरुच्या आज्ञेतून मुक्त झालो?"
"कसा?"
"आयुष्यात मी खूप पापं केली, त्यापायी जेव्हा माझी बायको मुलं मला सोडावी लागली तेव्हा मी सुधारण्याचं ठरवलं आणि मला माझे गुरु भेटले, त्या डोंगरावर. त्यांनी सांगितलं तू १०० लोकांना पापातून मुक्त केलंस किंवा मदत केलीस तर तुझी यातून
सुटका होईल.

आज तुम्ही १०० वे.

तुम्हाला देखील मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही देखील असंच १०० लोकांना मुक्त करा, पापातून."

एवढं बोलून तो निघून गेला. तो नक्की काय बोलला याचा विचार करत मी सिगारेट संपवली आणि गाडीत बसण्यासाठी ड्रायव्हींग सीट कडे वळलो.
सीटवर कोण बसलंय? माझ्या सारख्या कपड्यात, मीच? 😳😳

जवळ जाऊन पाहिलं तर तो मीच होतो छातीत एक खुपसलेला मोठा सुरा मी अलगद काढून टाकला आणि स्थानापन्न झालो.

आता फक्त एकच विचार मी करत होतो, सुरुवात कुठून???
You can follow @jayant_rokade.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: