मित्रांनो आजचा माझा थ्रेड आहे technology विषयी...नुकतेच एक पुस्तक वाचून संपवले त्याचा हा सारांश....यातील मते लेखकाची आहेत....तुम्हाला सल्ला द्यावा अशी माझी योग्यता नाही पण तुमच्या मन स्वास्थ्याची काळजी आहे.पुस्तकाचे नाव आहे Digital Minimalism in Everyday Life.
या पुस्तकात Williams आणि White या लेखक द्व यी ने डिजिटल साधनांचा त्यात फोन....इंटरनेट आणि इतर समाज माध्यमं या पासून काहीसे अंतर कसे राखावे यावर लिहिले आहे..याला आपण मराठीत डिजिटल उपवास असेही म्हणू शकतो.
तू काही बोलत नाहीस सारखा फोन फोन घेऊन बसते बसतो...असे अनेक लोक म्हणत असतात....आठवा कधी तुम्ही मोबाईल न घेता एखाद्या रम्य स्थळी गेले आहात आणि तिकडचे वातावरण तुम्ही मनापासून एन्जॉय केले आहे....एकही फोटो आणि सेल्फी न काढता
आणि लगेचच FB insta आणि ट्विटर वर न टाकता....नाही आठवत?? जाऊदे शांत पणें तुमच्या घरच्या बाल्कनीत बसून विचार केलेला आठवतो आहे का?
नाहीतर झोपी जायच्या आधी आजचा दिवस कसा गेला...काय बदलू शकलो असतो असा विचार केलाय...की मोबाईल च्या स्क्रीन कडेच बघत झोपी गेला?
लक्षात घ्या मोबाईल तुमच्यासाठी आहे....मोबाईल साठी तुम्ही नाही आहात...काय होतंय तुम्हाला काय वाटते ते बाहेर येत नाही आहे....प्रसार माध्यमे तुम्हाला देतात त्यावरच तुम्ही कायम विचार करत राहता
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😁" title="Grinsendes Gesicht mit lächelnden Augen" aria-label="Emoji: Grinsendes Gesicht mit lächelnden Augen"> आणि स्वतः बद्दल नाही
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙄" title="Gesicht mit rollenden Augen" aria-label="Emoji: Gesicht mit rollenden Augen">
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="☺️" title="Lächelndes Gesicht" aria-label="Emoji: Lächelndes Gesicht">
लेखक यावर एक उपाय सुचवतात....दिवसाचे काही तास व आठ वड्याचे काही दिवस....डिजिटल डिस्कनेक्ट म्हणजेच उपवास करायचा
त्याने तुम्ही एक माणूस म्हणून अधिक परिपूर्ण व्हाल...आणि जीवनातील अनेक गोष्टींवर दूरगामी विचार कराल.
यावर लेखकांचे म्हणणे असेही आहे की तुमची एक सोशल इमेज तुम्ही तयार करता आणि तुम्ही फोलॉवर आणि लाईक्स चे भुकेले होता.
ही परिस्थिती काहीशी नशा करणाऱ्या व्यक्ती प्रमाणे असते...ज्यात मेंदूमध्ये खूप सारे dopamine तयार होते आणि सुख संवेदना जागृती होते.
अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असे वाटत असेल तर समाज माध्यमे व इंटरनेट चा किमान वापर त्याच बरोबर डिजिटल उपवास करणे आवश्यक आहे.
लहान मुलांना सुद्धा अशा वाईट सवयी लागू नये असे वाटत असेल तर त्यावर लेखक काही उपाय सांगतात.. मोठ्या माणसांसाठी....लेखक मेडीटेशन चा सल्ला देतात.
एखादी कला जसे गायन वाचन गिटार वाजवणे अशा गोष्टी करण्याचा सल्ला देतात...मुळात मनापासून वाचावे असे हे पुस्तक...
लेख आवडला तर सांगा काही सुधारणा हव्या असतील तरी सांगा...एखादे भन्नाट पुस्तक सुचवा...मी वाचून परीक्षण लिहिण्याचा प्रयत्न करेन...
पुन्हा भेटूया नवीन पुस्तक परीक्षण घेऊन पुढील आठवड्यात. धन्यवाद
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Folded hands" aria-label="Emoji: Folded hands">