Thread : कधीतरी जागृत होणारी #मराठीअस्मिता.
मला कायम असा प्रश्न पडतो, कि एवढा ढोंगी पणा या कलाकारांकडे कसा येतो ? 'आम्ही मराठी', हे वर्षभर ओरडत राहतात, परंतु जेव्हा यांचे टुकार अवॉर्ड शो असतात तेव्हा मात्र हिंदी गाण्यांवरच नाचतात,तेव्हा कुठे गेलेली असते मराठी अस्मिता ?
(1/15)
स्वतः किती मोठे आहोत,सुशिक्षित आहोत हे दाखवण्याची यांना इतकी हौस असते कि मराठी मुलाखती मध्ये सुद्धा अनेक वेळेला बळच असं काही इंग्रजी घुसवतात कि इंग्रजांनाही यातलं व्याकरण ऐकून ह्रिदयविकाराचा झटका येईल,पण नाही !
(2/15)
कसही बोल पण रेटून बोल, यानेच आम्ही चालतो आणि यावेळेला आमची मराठी अस्मिता कुठेतरी बाजूला कोपऱ्यात खितपत पडलेली असते.
जेव्हा करिष्मा भोसले सारख्या भोसले कुळातील व्यक्ती जीवाचा आटापिटा करून त्यांचे भोंगे काढण्यासाठी लढत होती....
(3/15)
तेव्हा तिच्या बाजूने उभा होता तुमच्यामते असलेला अमराठी नेता 'किरीट सोमैया', पण तिला मदत केली असती तर आपण एका समाजाला दुखावले असती हि भावना ठेऊन आम्ही मराठी अस्मिता कधीही जागृत केलीच नाही,का?
कारण या प्रसंगात आपल्याला कुठे फुटेज मिळणार होतं?
(4/15)
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच आमच्यातली मराठी अस्मिता तात्पुरती जागी होते पण त्यांची तत्व,त्यांचे विचार अंगिकारायचे असतील तेव्हा मात्र मराठी अस्मिता कुठे लपून बसते काही कळत नाही .
महाराजांचे नाव फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापरणं म्हणजेच मराठी अस्मिता जागृत करणे असा काही लोकांचा समज झाला आहे.
पण महाराजांबद्दल एखाद्या 'मराठी अस्मिता' वाल्याला विचारलं तर त्याला काही ठराविक ३ ४ प्रसंग सोडून दुसरं काही सांगता येणार नाही आणि
जर महाराजांच्या जीवनातील एवढेच प्रसंग आपल्याला माहित असतील तर आपण आहोत का 'मराठी अस्मितेचे' रक्षक असे स्वतःच्या मनाला विचारा....

मराठी साठी अमूल्य शब्दांचा संग्रह देऊन गेलेल्या सावरकरांच्या नावाने जोशी सारखे पत्रकार 'नायक किंवा खलनायक' असे कार्यक्रम ठेवतात,तेव्हा मात्र ....
आमची मराठी अस्मिता गाढ झोपेत असते ! का ? "अहो सावरकरांवर समजा मला माहित असून जरी बोललो तर मला जातीयवादी,मनुवादी,संघी असं काही बोलून हिणवतील...."-एक बेगडी मराठा अस्मिता प्रेमी.
आम्ही मराठी आम्ही मराठी करणारे आम्ही,आमच्यातल्याच एखादा मराठी माणूस वर जात असेल तर त्याला खाली खेचायला आम्ही कमी करत नाही, मग तेव्हा कुठे जाती आमची मराठी अस्मिता ?
फक्त आम्ही मराठी आम्ही मराठी म्हणून काही होणार नाही, तर समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना दिलेले मंत्र जर खरंच पाळले तर शंभर टक्के मराठी माणूस वर जाईल.
पण पुन्हा,समर्थ रामदासांना,साक्षात शिवाजी महाराजांच्या गुरूंचा अपमान आमचे ८० वर्षांचे तरुण आणि त्यांचे कार्यकर्ते करतात..
तेव्हा सुद्धा आमची मराठी अस्मिता झोपलेली असते. काय उपयोग असल्या मराठी अस्मितेचा. काल अनेक कलाकारांचे खरे रूप कळले. हे लोक मराठी अस्मितेचे रक्षक नाहीत, फक्त स्वतःच्या प्रतिमेचे आणि बँक अकाउंट चे रक्षक आहेत हे निश्चित समजलं.
एखादा अमराठी माणूस,अस्खलित मराठी बोलत असेल तर त्याला बाहेरून आलेला,बिहारी असे म्हणून हिणवणे म्हणजे मराठी अस्मिता ? अहो मराठी अस्मिता हि फक्त बोलायची गोष्ट आहे ? ती अंगिकारायची गोष्ट आहे.
मराठी अस्मिता हि भावना आहे जी शिवरायांनी जागृत केली,टिळकांनी जतन केली आणि त्याची मशाल धधगत ठेवली ती सावरकरांनी.
या मराठी अस्मितेला जर खरंच वाचवायचे असेल तर अश्या ढोंगी मराठी प्रेम्यांपासून तिला लांब ठेवणं गरजेचं आहे.
या साठी तुम्ही आम्ही,ज्यांचा श्वास मराठी आहे,ध्यास मराठी आहे आणि गर्व मराठी आहे,यांनी एकत्र येऊन महाराजांनीच जागृत केलेली मराठी अस्मिता पुढे चालवली पाहिजे.
शेवटी समर्थानी महाराजांना दिलेला मंत्र सांगतो आणि संपवतो :
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे।'
याचा अर्थ असा की, महाराजांनी सर्व मराठी जनतेला एकत्र आणावे. मराठी संस्कृतीचा विस्तार करावा. राज्य जतन करून ते हळूहळू वाढवावे.

बघा जमतंय का ?
(/15)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: