माध्यमिक शाळे मध्ये मासिक पाळी सुरू होण्याच्या किंवा सुरू झालेल्या मुली असतात..आणि गावाकडच्या ,तालुक्याच्या शाळा या गोष्टींना डोक्यात ठेवून बनविलेल्या असतात का?? सकाळी चार lecture नंतर जरी मधली सुट्टी किंवा दहा मिनिटांचा ब्रेक असेल तर या दोन किंवा दीड तासात या मासिक पाळी च्या
नवीन वेदना वगैरे अनुभवणाऱ्या आणि आपल्या शरीरात वेगळं काही घडतंय या भीतीत असणाऱ्या मुलींसाठीसाठी ही अशी दोन तासाची सलग बैठक योग्य आहे का? Counselling हा प्रकार घडतो का आपल्या शाळांमध्ये ...
.एखाद्या च्या तुटक्या चपलेकडे अन फाटक्या दप्तराकडे बघून हसणारे ते आवाज ती आपण फार लहान आहोत सगळ्यांन पेक्षा ही भावना शाळेतच येते ना?.त्या मुली च्या गरिबी नं हरवत चाललेल्या त्या बालपणा ला जपते का हो शाळा ??
बर टॉयलेट वॉशरूम ची परिस्थिती तर सांगायलाच नको? पोटं दुखत असेल तर मुलीला घरी सोडण्यासाठी शाळे कडे काय सुविधा असते.. अचानक गणवेशवर लागलेल्य टाय लाल डाग लपवत ,मुला मुलींच्या नजरे पासून वाचत स्वतः पाच
किलोमीटर सायकल चालवून रडत घाबरत घरी जाणारी लहान मुलगी ची मनस्थिती किती जणांना कळली किंवा कळते ??तीच्या शरीरात होणाऱ्या बदलांची..आपल्या वयाच्या मैत्रीणी पेक्षा
आपल्याला लवकर शरीरात झालेल्या या बदलांन विषयी शाळा ही संस्था बोलते का?? एखादी वेगळी शिक्षिका या सगळ्या गोष्टी समजावण्यासाठी शाळेत असते का?
की
खेळाचे शिक्षक या मुलींना तुम्ही घाबरून वर्गात बसू नका खेळात उतरा असं पोट तिडकीच्या काळजीने सांगणारा शिक्षक असतो का शाळेत???
आपल्या शाळा या त्या पेपर वर किती मार्क आहेत या पूरत्याच मर्यादित आहेत....
काही शिक्षक खूप छान शिकवतात अगदी आयुष्यभर त्यांचे उपकार वाटतात पण ही बोटांवर मोजण्याऐवढी असतात..सगळे विषय तितक्या शिस्तीत शिकवतात का? प्रश्न विचारायचा नाही हा पायदंड कुणी घालून दिला आयुष्यात ?? शाळांनीच ना??
लहान मुलींच्या शरीराला होणाऱ्या घाणेरड्या स्पर्शाला अन घाबरलेल्या त्या मनाला आवाज देते का ही शाळा???
एवढ्या सगळ्यातून जर मला पुस्तकातून माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असेल ..ते पुस्तक सुद्धा शाळेला देत आलं नसेल तर???
शाळा
जर फक्त ज्ञान देणारी संस्था असेल ना तर ते तरी काम व्यवस्थित करते का शाळा?? माझी शाळा तरी अपयशी ठरली....
You can follow @MEENALE11.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: