इस्लामोफोबिया ही नवी समस्या नाही, कट्टर भाजप/RSS समर्थकांशी वाद घालताना आपल्याला हा मुस्लिम द्वेष दिसून येतो. तेव्हा आपण वाद घालण्याऐवजी तिथेच थांबतो.
कोणाच्या मतांमध्ये परिवर्तन आणू शकतो व कसं हे आपल्याला कसं समजणार? पाच प्रकारचे इस्लामोफोबिक गट @taru_uniyal यांनी केलेत.
कोणाच्या मतांमध्ये परिवर्तन आणू शकतो व कसं हे आपल्याला कसं समजणार? पाच प्रकारचे इस्लामोफोबिक गट @taru_uniyal यांनी केलेत.
त्यांच्या इंग्रजीतील थ्रेडचा मराठी भाषांतर करतोय. आता या गटात तुमच्या इस्लामोफोबिक मित्रांना बसवून पहा आणि ठरवा की कोणत्या Intensity ने तुम्ही त्यांची मतं बदलू शकता. नक्कीच वाचा, बुकमार्क करा.
१ [थ्रेड] भारतात मुस्लिम-पूर्वग्रहांचे पाच प्रकार पडतात : गेल्या काही दिवसांपासून मी "बीजेपी मतदार आणि इस्लामोफोबिया" विषयी TL वर झालेल्या चर्चेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत होतो आणि माझं लक्ष वेधून घेणारी एक बाब म्हणजे आपण ट्विटरवर इस्लामोफोब हा शब्द कसा वापरतो?
2/19 यामुळे मला आश्चर्य वाटले की आपण या मुस्लिमविरोधी पूर्वग्रहांचे स्पेक्ट्रम किंवा प्रमाण तयार करू शकतो का? मला इतर Semitism विरुद्ध काही समानता सापडली आणि याला भारतीय संदर्भात अशाच एका लेखात बसवण्याचा माझा प्रयत्न आहे. (दुवा: http://research.policyarchive.org/9916.pdf )
3/19 "इस्लामोफोब" हा शब्द लोक वेगवेगळ्या हेतू, वागणूक आणि राजकारणाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी सहज वापरतात.
हे प्रकार/गट/अंश ओळखण्याने आपण या लोकांना कार्यक्षमतेने हाताळू शकतो व याची खूप मोठी मदत आपल्याला होते. इस्लामोफोबियाचे पाच अंश आहेत. (मूळ लेखाच्या आधारे):
हे प्रकार/गट/अंश ओळखण्याने आपण या लोकांना कार्यक्षमतेने हाताळू शकतो व याची खूप मोठी मदत आपल्याला होते. इस्लामोफोबियाचे पाच अंश आहेत. (मूळ लेखाच्या आधारे):
4/19 नाझी: हे ओळखणे सोपे आहे. या लोकांना किंवा गटांना मुस्लिमांना सक्रियपणे दुखवायचे आहे. त्यांचे वर्तन, विचार आणि कृती हानी करण्याच्या हेतूने आहेत. ते पूर्वग्रहदूषित विचाराने मुसलमानांना लुटतील, मारहाण करतील किंवा मारून टाकतील. त्यांना त्यांच्या वर्तनाची लाजही वाटत नाही आणि
त्यांना आपण न्याय करतोय असा (गैर)समज असतो.
5/19 हीच लोक तुमची राजकारणी, दक्षतावादी (जसे गोरक्षक), पत्रकार, सेलिब्रिटी असतील जे मुस्लिमांवर कायदे, धोरणे आणि सशस्त्र कृती करण्यासाठी सक्रियपणे आवाहन करत असतील. सहसा त्यांच्या वर्तनात systemic व्यवस्थितपणा असतो.

6/19
HOSTILE : या गटामध्ये नाझींचा सक्रिय हिंसाचार आणि पूर्वसूचना यांचा अभाव आहे परंतु ही लोक सक्रियपणे त्यांचे समर्थन करतात. ते नाझींना पैसे देतील, मुस्लिमांना धमकावतील, मुस्लिमविरोधी कारवायांचे कौतुक करतील, नाझींना न्याय (हिंसा) करण्यासाठी आपलं Vocal समर्थन देतील.

ते सहसा असंघटित असतात.
7/19
संशयास्पद : हा गट हिंसक नाही आणि त्यांच्याकडून द्वेषयुक्त अभिव्यक्तींचा कोणताही नमुना दिसून येत नाही. पण त्यांच्यात वैर आहे आणि त्यांची अभिव्यक्ती 'प्रसंगनिष्ठ' आहे.
7/19
संशयास्पद : हा गट हिंसक नाही आणि त्यांच्याकडून द्वेषयुक्त अभिव्यक्तींचा कोणताही नमुना दिसून येत नाही. पण त्यांच्यात वैर आहे आणि त्यांची अभिव्यक्ती 'प्रसंगनिष्ठ' आहे.
8/19 उदाहरणार्थ, ते काश्मीरमधील स्टेट स्पॉन्सरर्ड कारवाईचे औचित्य सिद्ध करतील, मुस्लिमांना नकारात्मक प्रकाशात आणणार्या कोणत्याही बातम्यावर विश्वास ठेवतील. ते इस्लामची थट्टा करण्यास मोकळे असतील. जेव्हा त्यांच्या पूर्वग्रहांबद्दल विचारले जाईल, तेव्हा ते Whataboutery करतील.
9/19 एकंदरीत, त्यांना हानी पोहचवायची नसते पण ते मुस्लिमांची बदनामी करण्यासाठी मोकळे असतात. हिंसाचारावेळी, दंगलीवेळी आपल्या परिचित मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी ते खुलेआम पुढे येतील.
10/19 चिंताग्रस्त: या गटात मुस्लिम आणि इस्लामबद्दल संमिश्र भावना आहेत. त्यांना इस्लामची विशिष्ट आवृत्ती आवडते परंतु दुसऱ्या पध्दती आवडत नाहीत. त्यांच्या आवडीनिवडीमध्ये फिट होणारे मुस्लिम कर्मचारी घनिष्ठ मित्र म्हणूनही असतील. पण त्यांच्या मनात मुसलमानांचा एक प्रकार (टाईप) असतो.
11/19 ते बर्याचदा "माझ्या प्रकारचे मुस्लिम ..", "मला कलाम आवडतात पण ..." यासारख्या गोष्टी बोलतील. ते मुस्लिम / इस्लामिक संस्कृतीच्या काही बाबींसाठी खुले असतील परंतु इतरांसाठी नाहीत. त्यांना मुस्लिमांच्या प्रचंड उपस्थितीत अस्वस्थता वाटेल परंतु हलक्या उपस्थितीने काही वाटणार नाही.
12/19 एकंदरीत, त्यांना मुस्लिमांना दुखापत करायची नसते किंवा त्यांची बदनामी करायची नसते. परंतु खासगीत (ज्यामध्ये त्यांचे मुस्लिम मित्रही समाविष्ट असतील) मुसलमांनाबद्दल नकारात्मक गोष्टी बोलण्याबद्दल ते ओके असतील.
13/19 निरुपद्रवी /अज्ञानी :
हा गट द्वेषपूर्ण नाही परंतु रूढीवादी आहे. आणि त्यांना ठाऊक आहे की ते फक्त रूढीवादी आहेत. कधी कधी त्यांची जीभ घसरू शकते जिथे ते असे म्हणतील की ते इस्लामबद्दल नकारात्मक आहेत परंतु त्यांना त्वरित त्यांची चूक लक्षात येईल आणि क्षमा / माफी मागतील.

14/19 हा गट मुस्लिम संस्कृतीबद्दल बर्याचदा अनभिज्ञ असतो. ते चित्रपट, कथा आणि त्यांच्या स्वत: च्या नजरेद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते इस्लामबद्दल सकारात्मक विचार करतात. हे सर्व पूर्वग्रहित लोकांपेक्षा कमीतकमी हानिकारक आहेत.
15/19 आम्ही त्यांना कसा प्रतिसाद करू शकतो?
नियमः नेहमीच मुस्लिमविरोधी टीकेला प्रतिसाद द्या. ते कोणत्या प्रकारातून येतात याची पर्वा न करता. असे न केल्याने सामाजिक असहिष्णुता वाढते. प्रतिसाद नक्की द्या परंतु प्रत्येकासाठी प्रतिसादाची तीव्रता बदलली पाहिजे.

नाझी आणि Hostiles मध्ये वाद घातला जाऊ शकत नाही.
16/19 त्यांना त्यांची चूक दाखवून द्या परंतु कोणत्याही सुधारणाची अपेक्षा करू नका. त्यांना केवळ नागरी व कायदेशीरप्रणाली वापरुन हाताळले जाऊ शकतात. इतर 3 प्रकारातील लोकांना दुरुस्त केले जाऊ शकते.
16/19 त्यांना त्यांची चूक दाखवून द्या परंतु कोणत्याही सुधारणाची अपेक्षा करू नका. त्यांना केवळ नागरी व कायदेशीरप्रणाली वापरुन हाताळले जाऊ शकतात. इतर 3 प्रकारातील लोकांना दुरुस्त केले जाऊ शकते.
पण प्रतिसादाची तीव्रता वर्तनानुसार असणे आवश्यक आहे.
17/19 सातत्याने उच्च-तीव्रतेच्या प्रतिसादात, केवळ आरोपांची विश्वासार्हता कमी होते. या सर्वांना नाझी म्हणून लेबल लावण्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. ही मंडळी आधीच पूर्वग्रहदूषित बहुसंख्याक असल्याने
17/19 सातत्याने उच्च-तीव्रतेच्या प्रतिसादात, केवळ आरोपांची विश्वासार्हता कमी होते. या सर्वांना नाझी म्हणून लेबल लावण्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. ही मंडळी आधीच पूर्वग्रहदूषित बहुसंख्याक असल्याने
आपल्या सततच्या आरोपांमुळे ते साहजिकच नैसर्गिक आणि अपेक्षित विरोधी मतेच मनात बनवत असतील. त्यामुळे लेबलिंग टाळायला हवं.
18/19 असे लेबलिंग करण्याने जे धोकादायक लोक आहेत ते वाचतील आणि वाढतील व सुधारण्यासारखी जी मंडळी आहेत ती मागे राहतील
18/19 असे लेबलिंग करण्याने जे धोकादायक लोक आहेत ते वाचतील आणि वाढतील व सुधारण्यासारखी जी मंडळी आहेत ती मागे राहतील
हा धागा माझ्या सामान्य मूलभूत वाचनावर आधारित आहे, कोणतेही academic मत नाही. निष्कर्षापर्यंत जाण्याऐवजी आधी फक्त संभाषण सुरू करण्याचे ध्येय आहे. आपल्या इनपुटसह हा धागा अधिक चांगला होईल अशी आशा आहे.
______________
संवाद सुरू करा, प्रतिसादाची intensity ठरवा. हेच एक मार्ग आहे.
______________
संवाद सुरू करा, प्रतिसादाची intensity ठरवा. हेच एक मार्ग आहे.