हे आहेत दिवंगत वकील साहेब शाहिद आझमी,
वाचा यांची गोष्ट...
याच फोटोतल्या टेबल खुर्चीवर त्यांची गोळ्या घालून हत्या झाली होती
दशक ओलांडलं,आजही मारेकऱ्यांचा पत्ता नाही..
आणि हत्या का झाली ?
तर म्हणे हे अतिरेक्यांच्या केसेस लढतात...
त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतात..
असो,
शाहिद केसेस लढायचे मुस्लिम नाव असलेल्या अश्या गरीब मुलांचे ज्यांना सामाजिक दबावातून पोलिसांनी त्वरित कारवाईच्या नावाखाली & #39;सहजच& #39; उचलून आणले आहे..
जोपर्यंत शाहिद त्यांना निर्दोष सिद्ध करायचे
जनमानसांत नेरेटिव्ह पोचलेलं असायचं,
की हे अतिरेक्यांसाठी लढतात....
या देशात न्यायपालिकांचं महत्व आणि विशेषतः माइनोरीटीझ साठी त्यांची गरज ते लढून सिद्ध करायचे...
पण या देशातल्या सामान्य माणसांचं मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य त्यांचा बळी घेऊनच शांत झालं..
न्यायव्यवस्था जरी कोणाला निर्दोष सोडत असली तरी एकदा अतिरेकी म्हणवल्या गेलेला आणि त्यासाठी
कोर्टाची पायरी चढलेला माणूस शेलक्या भारतीयांसाठी कायमचा अतिरेकीच होऊन जातो...
काल काफिल खान सुटले,
NSA लागलेला डॉकटर माणूस...
यापुढील आयुष्याची कल्पना ही करवत नाही..
आता जेल मध्येतर दाढी पण वाढलीये..
कोणता उथळ त्यांना कधी काय टोमणा मारेल आणि कोणता उथळ कधी काय टोक गाठेल...
माल्कम x म्हणायचे
"देशातल्या समाजमाध्यमांवर सूक्ष्म लक्ष ठेवा,ते,ज्यांच्यावर अन्याय होतोय,
त्यांनाच अन्याय करणारे म्हणून सिद्ध करतील.."

काफिल खान यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
आणि एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून क्षमस्व https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="💐" title="Blumenstrauß" aria-label="Emoji: Blumenstrauß">
You can follow @uzernamezzzz.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: