आज ख्रिस्त असता तर तो काहीसा राहुल गांधींसारखा वाटला असता. हसू येईल कदाचित हे वाचताना, पण तोच मुद्दा आहे. ख्रिस्त त्याच्या काळात जे करू पाहत होता ते तेव्हाच्या समाजासाठी, सत्तेसाठी आणि पॉलिटी साठी हास्यास्पद, भाबडंच होतं.

त्याला कुठली क्रांती करायची नव्हती किंवा परिवर्तन करायचं नव्हतं. त्याला तत्कालीन प्रश्नांनी सामान्यांना झालेल्या वेदनेवर फुंकर घालायची होती फक्त.

गेल्या वर्ष दोन वर्षात राहुल गांधी ती निरागसता, भाबडा आशावाद आणि तत्कालीन प्रश्नांना त्याच निरागस आकांक्षेनं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तसं दुसरं कोणीच दिसत नाही. बाकीच्या राजकारणानं रोमन साम्राज्याच्या साम्राज्यवादाची अजस्त्र आणि हिंस्त्र मूल्यं स्वीकारली आहेत, आणि

हा भाबडा येशू त्याच्या घोळक्याला घेऊन कुठल्यातरी कुष्ठरोग्याला स्पर्श करून बरा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला तेवढंच करायचं आहे.
येशू त्याच्या जिवंतपणी काहीच नव्हता, असला तर थट्टेचा विषय होता आणि काही गोर-गरिबांचा आधार होता.
येशू त्याच्या जिवंतपणी काहीच नव्हता, असला तर थट्टेचा विषय होता आणि काही गोर-गरिबांचा आधार होता.

त्यानं काही ओल्ड टेस्टामेन्टशी विद्रोह केला नाही आणि न्यू टेस्टामेन्ट त्याच पायावर उभा राहून फक्त काही पावलं पुढचं पाहत होता, जसा नेहरू किंवा काँग्रेसच्या कल्पनेतला भारत.

शेवटी क्रुसावर चढवल्यावर मात्र येशू अचानक मसीहा झाला, त्यानं अवघं जग व्यापलं आणि जिवंत माणसांपेक्षा मृत रूपकांची काय ताकत असते ते दाखवून दिलं.

त्याला रोमनांनी मारला तेव्हा उपहासानं त्याच्या क्रुसावर लिहिलं, INRI, हा पहा ज्यूंचा राजा....पण काहीच वर्षांनी त्यांचाच राजा कॉन्स्टंटीन येशूचा अनुयायी झाला...काळाच्या पटलावर येशू श्रेष्ठ ठरला...पण अपेक्षांचा आणि निरागसतेची शिक्षा म्हणून वाहीलेला क्रूस पेलल्यावरच...
