#Thread

टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता वगैरे हास्यास्पद थापा आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात.वास्तवामध्ये टिपूच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात दारूचे बाण ( रॉकेट्स ) वापरात होती. याचं एक ठळक उदाहरणे म्हणजे १६५८ साली औरंगजेब आणि दारा-शुकोह
यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता.संदर्भ :- ट्रॅव्हलस इन द मुघल एम्पायर , फ्रांस्वा बर्निए , पृ. ४८) यावेळी टिपूच काय पण त्याचा बाप हैदर अली याचा देखील जन्म व्हायचा होता ! मराठेशाहीत देखील दारूच्या बाणांचा वापर होत असे
आणि यातली काही उदाहरणे टिपूच्या जन्माच्या आधीची आहेत.
पहिले उदाहरण आहे सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे.
पत्र पेशवा दफ्तर खंड २० मध्ये क्रमांक ८ वर छापलं आहे. संपूर्ण पत्र सोबत जोडत आहे.
दुसरे उदाहरण १७५४ साली श्रीगोंदे येथून पाठविलेल्या मराठा- निजाम यांच्यातील युद्धाच्या एका वृतांतातील आहे. या पत्रामध्ये, " दारू ( तोफखान्याची ) वीस मण सापडली व बाणाचे चोथवे काही सापडले." असे नमूद केले आहे.
चोथवे' म्हणजे "ज्यात दारू भरलेली नाही असे दारूच्या बाणाचे नळकांडे".
अशा चौवीस अग्निबाणांच्या जुडग्याला "कैची" असे संबोधित असत.

संदर्भ :-
१) पेशवा दफ्तर
२) ऐतिहासिक शब्दकोश , श्री य .न. केळकर
You can follow @Theprasad_2001.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: