#कान्होजीराजे_जेधे
एका हातात निखारा व दुसऱ्यत तुळशीपञ ठेवलेली महारांजांभोवती जी लोकं होती त्यात प्रामुख्याने सरदार कान्होजीराजे जेधे यांचा उल्लेख होतो.
कान्होजींचा जन्म कारीगावचा.जन्मापुर्वी वडिलांची हत्या, नंतर मात्रोश्रीची,काही दिवसाच्या लहान मुलाला पोरकं होण्याचा महाशाप मिळाला
कान्होजींचा जीवावर बेतलेल्या प्रसंगात जेध्यांचे इमानी स्वामीनिष्ठ चाकर देवजी महाल्याने तान्ह्या कान्होजीचे प्राण वाचवले.
पासलकर देशमुखांनी देखभाल केली,युद्धतंत्राचे शिक्षण दिले.कान्होजींनी कारीगावी येऊन आपल्या मातापित्यांच्या खुनाचा सुढ मिळवून रोहिड खोऱ्याची देशमुखी चालवली…
बारा मावळमध्ये पराक्रमाने व सचोटीने आपला दरारा बसविला.
मलिक अंबर या निजामशही वजीराशी त्यांचा संबंध आला.त्याच्या समवेत कान्होजीने अनेक लढायांत मर्दुमकी गाजवली
निजामशाही पासून कान्होजी नावांरुपास आले
सन १६१९च्या ऐतिहासिक निजामशाही कागदपत्रांमध्ये ‘कान्होजीराजे जेधे’ असा उल्लेख येतो
साधारण इ.स.१६३५ ला आदिलशाहचा सेनापती रणदुल्लाखानाने शहाजीराजांना कान्होजीचा परिचय करून दिला.
इ.स.१६३६ ला अहमदनगरची निजामशाही नष्ट झाली त्यानंतर शहाजीराजे पूर्णपणे आदिलशाहीकडे चाकरीस राहिले, तेव्हा शहाजीराजांनी कान्होजीस रणदुल्लाखानाकडून मागून घेतले.
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचे विश्वासू मित्र बनले.
“कान्होजी,तुम्ही आता माझ्या शिवबाची चाकरी करावी.स्वराज्याला तुमची गरज आहे. आपण शूर लढवय्ये आहात,अनुभवी आहात.
बाजी पासालकारांच्या निधनाने बारा मावळ खोऱ्यात आता तुम्हीच वडीलधारे, आपल्या मायेचे छत्र शिवबावर धरा.”
असे म्हणत, शहाजीराजांनी कान्होजींना शेवटचा निरोप घेताना अश्रुपूर्ण नयनांनी मिठी मारली.
कान्होजी शिवाजीराजांकडे येवून त्यांना म्हणाले, “शहाजी राजांनी शपथ देऊन साहेबाचे सेवेशी पाठविले तो इमान आपला खरा आहे. खास व पाच लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ(मृत्यू सुद्धा पत्करू)."
परंतु, कान्होजी अजूनही अदिलशाही च्या सेवेतच होते.
वतनवाडीचे देखील अधिकार त्यांच्याकडे होते. वतनवाडीची कोणतीही लालसा ना ठेवता कान्होजी स्वराज्याच्या कार्यात सहाय्य करत होते.
आदिलशाहीचा बराच मुलुख व किल्ले शिवाजीराजांनी स्वराज्यात दाखल केलेले असल्यामुळे आदिलशहा राजांवर चिडून होता.
आदिलशाहीतून अफजलखान शिवाजी राजांना धरून अथवा मारून आणण्याच्या प्रतिज्ञेचा विडा उचलून निघाला होता
१६जून १६६५,कान्होजी जेधेना आदिलशहाने पाठविलेले फर्मान असे,
“शिवाजी अविचाराने व अज्ञानाने पातशाही मुलुखातील रयतेस त्रास देऊन लुटुन,कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत.
यास्तव त्याचा पराभव करून निर्मूळ फडशा करावा. त्याचे निसवतीचे लोकास आश्रय न देता ठार मारून या दौलतीचे कल्याण इच्छिणे. खानच्या सांगण्यावरून…. तुमची योग्यता वाढविली जाईल. त्याचे सांगण्याप्रमाणे वागावे, तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही.”
आदिलशहाचे हे फर्मान म्हणजे त्यांच्या जीवनातील सत्व परीक्षेचा प्रसंग..
पण,त्यांनी या फार्मानास कुठलाच मुलाहिजा दिला नाही.आपले पुत्र व लष्करी जमाव घेऊन राजांकडे आले, “या पुढे खस्त होऊ(मरण पत्करू),तेव्हा वतन कोण खावे,आम्ही इमानानी अंतर करणार नाही"असे म्हणून बेल भंडार उचलून शपथ घेतली
पाण्याचा तांब्या उजव्या हातात घेवून डाव्या हाताने राजांच्या पायांवर पाणी सोडुन आपल्या वतनावर पाणी सोडले व आपल्या निष्ठेची व प्रामाणिकपणाची राजांना जाणीव करून दिली. शिवाजी महाराज व दरबारातील सर्व मंडळी कान्होजींच्या या कृत्याने भारावून गेली यावेळी राजांनी कान्होजीस हुकूम केला.,
कान्होजी पुढे महाराजांच्या मसलतीनुसार मावळातील देशमुखांना भेटून घडला वृतांत कथन करतात, “स्वामींच्या पायासी इमान धरून वातनास देखील पाणी सोडीले आम्ही व आपले लोक देखील राजश्री स्वामीपुढे खस्त होतो ऐसा आमचा दृढ विचार आहे. अफजलखान बेईमान आहे. कार्य जालियावर नस्ते निमित्य ठेऊन नाश करील
हे ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ आहे.अवधियांनी हिंमत धरून, जमाव घेवून,राजश्री स्वामीसंनिध राहोन,येक निष्ठेने सेवा करावी.” कान्होजी जेधे यांच्या बरोबर सर्व देशमुख मंडळी एकमुखाने संमती दिली. यावरून स्वराज्य कार्यामध्ये कान्होजी जेधे यांचा किती मोठा सहभाग होतो हे कळून येते.
अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी कान्होजी जेधे यांनी आपल्या साही मुलांसह अफजलखानाच्या सैन्याचा फडशा पाडला. कान्होजी जेधे यांनी नि:स्वार्थी बुद्धीने स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची तलवार व प्रथम पानाचा मान दिला.
दुसऱ्या एका संकटात बाजीप्रभू देशपांडे व बांदल बंधूंचे तीनशे सैनिक मारले गेले तेव्हा महाराज विशालगडावर सुखरूप पोचले. बांदलाच्या या कामावर प्रसन्न होऊन महाराजांनी त्यांना प्रथम पानाचा मान देण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना आपले मनोगत व्यक्त केले.
कान्होजी म्हणतात, “महाराज, केवळ बांदलाच्या पराक्रमामुळेच आज तुमचे पाय आम्हाला दिसताहेत. आम्ही आनंदाने पहिल्या पानाचा मान सोडतो. आपल्या पुढे आमच्या मानाची काय पत्रास ?”
कान्होजीनी आपला मान कृष्णाजी यास देऊन आपल्यातील औदार्य दाखवून दिले. याचा उल्लेख शाहीराने केलेलाच आहे.
जैसे हनुमंत अंगत रघुनाथाला |
तैसे जेधे - बांदल शिवाजीला ||

कान्होजींची समाधी आंबेवाडीस असुन एकवार दर्शनास जरुर जावे...
तेथे क्षणभर उभे राहिल्यास देव महालाचे कर्तुत्व, पासलकरांचे पितृत्व, कान्होजींचे नेतृत्व, ऐसे तिहेरी स्मृतींचा सुगंध दरवळलेला आपल्यास अनुभवास येईल……
संदर्भ:-कान्होजी जेधे (शीला रिसबूड)
शिवरायांचे शिलेदार : कान्होजी जेधे (प्रभाकर भावे)

@Nirmiti4Change
#unsung_heroes
#अपरिचित_मावळा
#निर्मिती
#चला_बदल_घडवूया
You can follow @Nilesh_P_Z.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: